पुणे : डोक्याचे केस आणि दाढी वाढवत साधूची वेशभूषा करून देशाच्या समस्या सुटणार नाहीत. वाढवायचेच असेल तर लसीकरण वाढवा, आरोग्याच्या सोयी वाढवा, मागील दीड वर्षांपासून टाळेबंदीच्या नावाखाली रोजगार बुडाल्यांना रोजगार द्या. अशा आशयाचे पत्र लिहून बारामतीतील एका चहावाल्याने चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दाढी व कटिंग करण्यासाठी १०० रुपयांची मनीऑर्डर पाठवली आहे.
अनिल संभाजी मोरे असे या चहा विक्रेत्याचे नाव आहे. बारामती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा स्मारका समोर रस्त्याच्या कडेला मोरे अनेक वर्षांपासून एका छोट्याशा स्टॉलवरून चहाची विक्री करतात. या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे.
खरीप पिकांच्या आधारभूत किमतीत वाढ, पहा पिकांची सविस्तर किंमत https://t.co/Kby0OXtRdo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
मात्र, वारंवार होत असलेल्या टाळेबंदीमुळे अनेक दिवस चहाचा स्टॉल बंद असल्यामुळे कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. देशातील अनेक नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे. टाळेबंदीमुळे नागरिकांना मूलभूत गरजा भागवणे ही मुश्कील बनले आहे. याकडे लक्ष वेधण्यासाठी मी माझ्या व्यवसायातून कष्टाने कमावलेले शंभर रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मनीऑर्डर केले असल्याचे मोरे यांनी सांगितले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबईत इमारत कोसळली, 11 जणांचा मृत्यू तर 8 जण गंभीर जखमी https://t.co/acr2dpt60m
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
अनिल मोरे पुढे म्हणाले की, ‘ पंतप्रधान मोदींनी लोकांसाठी आरोग्य सुविधांसह लसीकरणामध्ये वेग आणायला हवा. अनिल मोरे पुढे म्हणाले की, लोकांच्या समस्यांचे समाधान होईल या गोष्टींकडे लक्ष ठेवायला हवे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे पद देशातील सर्वात मोठे पद आहे. मी माझ्या कमाईमधून १०० रुपये पंतप्रधान नरेंद्र मोदींना दाढी करण्यासाठी पाठवत आहे.’
अनिल मोरे पुढे म्हणाले, ‘नरेंद्र मोदी हे देशाचे महान नेते आहेत आणि आम्ही त्यांचा सन्मान करतो. त्यांना दुखावणे आमचा हेतू नाही. मात्र ज्या प्रकारे कोरोना महामारीमुळे लोकांच्या अडचणी वाढत आहेत, त्यामुळे लोकांसाठी रोजगार वाढवले पाहिजे.’
राष्ट्रवादी पक्षाच्या वर्धापन कार्यक्रमात ज्येष्ठ नेते शरद पवार संबोधित करताना #ncp #surajyadigital #sharadpawar #राष्ट्रवादीhttps://t.co/7UwVW6JSZs
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 10, 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदींना पाठवलेले पत्र
आदरणीय पंतप्रधान जी,
भारतातील जवळपास सर्व जिल्हे, शहरी आणि ग्रामीण क्षेत्रांमध्ये २० मार्च, २०२० पासून मे २०२१ पर्यंत म्हणजेच मागच्या १५ महिन्यांमध्ये कोविड संक्रमणाचा प्रकोप एक राष्ट्रीय संकट बनून समोर आले आहे. यासाठी केंद्र आणि राज्य सरकारद्वारे योग्य योजनांची कमतरता हे एक मोठे कारण आहे. लॉकडाऊनमुळे रोजगार गेले आहेत आणि लोकांना भीक मागून जगावे लागत आहे.
आम्हाला ना राशन मिळत आहे, ना औषध आणि ना उपचारांसाठी सुविधा मिळत आहे. अशा परिस्थिती तुम्ही तुमची दाढी वाढवून काय सिद्ध करु इच्छितात. जर तुम्हाला काही वाढवायचे असेल तर निःशुल्क उपचारांच्या सुविधा वाढवा, लसीकरण वाढवा, रुग्णालयात उपचारांसाठी उपकरण आणि गुणवत्ता वाढवा, लोकांपर्यंत मोफन राशन पोहोचवा.
२०२२ पर्यंत सर्वांचे वीज बील माफ करा. भारतीयांसाठी मदत योजना वाढवा. 30 हजार रुपये प्रति कुटुंबाच्या हिशोबाने आर्थिक मदत प्रदान करा. कोविडमध्ये जीव गमावणाऱ्या सर्व कुटुंबांपर्यंत ५ लाखांची आर्थिक मदत प्रदान करा.
सर्व भारतीयांना टॅक्सच्या वसूलीमध्ये दोन वर्षांची सूट द्या. लॉकडाऊनच्या दरम्यान ज्यांना नुकसान झाले आहे, त्यांना नुकसान भरपाई द्या. त्यांना व्याज मोफत दीर्घकालिक कर्ज उपलब्ध करुन द्या.
आम्हाला आत्मनिर्भर बनवण्यासाठी जिल्हा प्रशासनामध्ये संवेदनशीलतेची गुणवत्ता वाढवा, छोट्या आणि इतर उद्योग, शेतकऱ्यांना मदत द्या, कोणत्याही प्रकारचे शैक्षणिक नुकसान होऊ देऊ नका, महागाईवर पूर्णपणे नियंत्रण ठेवा.
सर्व जीवनावश्यक वस्तू आणि इंधनाचे दर कमी करा, काळाबाजार बंद करा, सर्व स्तरावर शासन व पोलिस प्रशासन, जिल्हा प्रशासनाची रिक्त पदे लवकरात लवकर भरा.
आपण देशातील जबाबदार प्रथम नागरिक आहात. तुमच्यावर सर्वांची जबाबदारी आहे. राजकारण सोडून तुम्ही पहिले दाढी आणि कटिंग करा, तुमचे चांगले दिसणे महत्त्वाचे आहे. तुम्हाला देश हितामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय घ्यायचे आहेत.
तुम्ही चहावाले होते आणि मी देखील चहावाला आहे. यामुळे मी माझ्या मेहनतीच्या कमाईमधून १०० रुपये तुम्हाला दाढी आणि केस कापण्यासाठी पाठवत आहे. मी एक भारतीय नागरिक असल्याच्या नात्यानं तुम्हाला विनंदी करतो की, भारतीय नागरिकांच्या आवश्यक गरजांमध्ये सहयोग करा.