नवी दिल्ली : कोरोना रुग्णांची संख्या देशात सतत कमी होत आहे. ही बाब दिलासादायक आहे. पण तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर गंभीर परिणाम होऊ शकतो असं बोललं जात आहे. या पार्श्वभूमीवर लहान मुलांवरील उपचारासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
पाच वर्षे किंवा त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालणं आवश्यक नाही, असं देशाच्या आरोग्य सेवा संचालनालयाने नव्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्ट केलं आहे.
सोलापुरातील हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा; ८ नृत्यांगना, २९ इसमासह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्तhttps://t.co/2ivv9yAFTw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान सहा ते अकरा वर्षे वयोगटातील मुलांनी पालक आणि डॉक्टर यांच्या देखरेखीखाली मास्क वापरण्यास हरकत नाही. 18 वर्षे वयाखालील मुलांमध्ये कोरोनाचा होणारा फैलाव रोखण्यासाठी काळजी घेणं आवश्यक आहे, असं मार्गदर्शक तत्त्वांमध्ये म्हटलं आहे.
* रेमडेसिवीर, स्टेरॉइडचा वापर कधी
18 वर्षांहून कमी वय असलेल्या मुलांवर रेमडेसिवीरच्या वापरावर पुरेशी सुरक्षा आणि प्रभावी आकड्यांचा अभाव आहे. यामुळे त्यांचा उपयोग करण्यापासून वाचलं पाहिजे, असं सूचनेत म्हटलं आहे. तसेच लक्षणं नसलेल्या आणि सौम्य लक्षणं असलेल्या रुग्णांसाठी स्टेरॉइडचा वापर हा घातक असल्याचं या सूचनेत म्हटलं आहे.
हॉस्पिटलमध्ये दाखल गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांच्या उपचारात अतिशय बारकाईने देखरेख ठेवत स्टेरॉइड औषधाचा उपयोग करण्याची सूचना देण्यात आली आहे. ही सूचना फक्त गंभीर आणि अत्यंत गंभीर रुग्णांसाठीच आहे. स्टेरॉइडचा उपयोग हा योग्य वेळी केला पाहिजे, असं सांगण्यात आलं आहे.
आदेश ! कोरोना लस न घेतल्यास सिम कार्ड बंद होणार https://t.co/4lOipb8Bjv
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021