नवी दिल्ली : पाकिस्तानमध्ये गाढवांच्या संख्येत वाढ झाली आहे. चालू आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये पाकिस्तानमधील गाढवांची संख्या 1 लाखांनी वाढून 56 लाखांवर गेली आहे. मागच्या वर्षी ही संख्या 55 लाख होती. पाकिस्तान चीनमध्ये गाढवांची निर्यात करतो. गाढवांची त्वचा औषधासाठी वापरली जाते. दरम्यान, चीनमध्ये गाढवांची मागणी इतकी जास्त आहे की, यामुळे गाढव प्रजाती नष्ट होण्याची भीती वैज्ञानिकांना वाटू लागली आहे.
China Wants Pakistan Donkeys For This Reason … pic.twitter.com/2QFgOwmESM
— prasad_perla(Modi Ka Parivar) (@prasad_perla) June 12, 2021
गेल्या तीन वर्षांत पाकिस्तानमध्ये गाढवांची लोकसंख्या दरवर्षी एक लाखांनी वाढली आहे. आर्थिक सर्वेक्षण 2020-21 मध्ये हे दिसून आले आहे. पाकिस्तानमध्ये गाढव हा एकमेव प्राणी आहे ज्याची लोकसंख्या 2001-2002 पासून दरवर्षी एक लाखांच्या दराने वाढत आहे. त्याच वेळी, पाकिस्तानमध्ये घोडे आणि खेचरांचा विकास दर जवळजवळ स्थिर आहे. तीन वर्षात देशात तीन लाख गाढवांची वाढ झाल्यानंतर इथल्या गाढवांची लोकसंख्या 56 लाखांवर पोहोचली आहे. तर आता प्रश्न पडतो की, पाकिस्तान या गाढवांचे करतो तरी काय? ही गाढवे पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेमध्ये मोठे योगदान देत आहेत.
अभिनेत्री, खासदार नुसरत जहांचा 'बेबी बंप' फोटो व्हायरल, पतीने बाप नसल्याचं केले जाहीर https://t.co/LAgSAuylGm
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
सर्वेक्षणानुसार म्हशी, घोडा, गाढव, बकरी, मेंढ्या आणि उंट यासह शेतातील प्राण्यांची संख्याही 50.7 लाखांवर गेली आहे. आर्थिक सर्वेक्षणात असे म्हटले आहे की, 2019-20 च्या तुलनेत 2020-21 दरम्यान देशात प्राण्यांची संख्या सुमारे 10.9 लाखांनी वाढली आहे.
संयुक्त किसान मोर्चाची मोठी घोषणा, सर्व राजभवनांसमोर निदर्शने https://t.co/elQfKyculo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
* कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक
पाकिस्तान देशातील गाढवे चीनला पाठवितो, तिथे त्याची किंमत खूप जास्त आहे. चीनमध्ये गाढवांची कातडी अनेक प्रकारे वापरली जाते. चीन औषध तयार करण्यासाठी गाढवाच्या कातड्यातून घेतलेले जिलेटिन वापरतो. पाकिस्तान चीनला मोठ्या प्रमाणात गाढवांची निर्यात करत असल्याने देशात त्यांची संख्या जास्त आहे. एएनआयच्या अहवालात म्हटले आहे की, गाढवांपासून त्यांचे मालक दिवसाला साधारण हजार रुपये मिळवतात. तसेच त्यांच्या विक्रीमधूनही मालकांना मोठ्या प्रमाणात फायदा होतो. म्हणून येथील गाढवांचा व्यवसाय तेजीत चालला आहे.
बिल गेट्स आहेत अमेरिकेतील सर्वात मोठे शेतकरी ? https://t.co/SccTatcDhe
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
अनेक चिनी कंपन्यांनी पाकिस्तानात गाढवांचा व्यापार करण्यासाठी कोट्यावधी डॉलर्सची गुंतवणूक केली आहे. पाकिस्तानमधील गाढवांच्या जातीनुसार त्यांच्या किंमती निश्चित केल्या जातात. यासह, पाकिस्तान जगातील तिसरा मोठा देश आहे जेथे गाढवांची लोकसंख्या सर्वाधिक आहे. गाढवांपासून होत असलेल्या फायद्यामुळे पाकिस्तानमध्ये खास गाढवांसाठी वेगळी रुग्णालये स्थापन झाली आहेत.
देव तारी त्याला कोण मारी!; माळशेज घाटात काटा आणणारा अपघात, दोघांचा चहामुळे वाचला जीवhttps://t.co/yTltQ6gWKH
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021