ठाणे : राज्यात सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे. सलग 2 दिवस पडत आलेल्या संथधार पावसाने माळशेज घाट खचलाय. 11 जून रोजी सायंकाळच्या सुमारास मुरबाड माळशेज घाटात असलेल्या शिव मंदिराच्या पुढे बोगद्याजवळ एका कारवर दरड कोसळली. विशेष म्हणजे योगायोगाने या अपघातात कारचे मालक विजय रत्नाकर म्हात्रे बचावले आहेत. प्रवासात ते गाडी थांबवून लघुशंखेसाठी बाजूला गेले. तेव्हाच हा अपघात झाला. यात गाडीचा चक्काचूर झाला आहे.
सोलापुरातील हॉटेल पॅराडाईज डान्सबारवर छापा; ८ नृत्यांगना, २९ इसमासह ४८ लाखांचा मुद्देमाल जप्तhttps://t.co/2ivv9yAFTw
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 11, 2021
गाडी मालक विजय म्हात्रे प्रवास करत असताना ते मुरबाड घाटात बोगद्याजवळ थांबले. त्यांनी आपली गाडी थांबवून लघुशंखेसाठी बाजूला गेले. त्याचवेळी अचानक गाडीवर दरड कोसळली. रस्त्याच्या बाजूला उभ्या असलेल्या 4 व्हिलरवर दरड कोसळल्याने एकच खळबळ उडाली. त्यात मोठं-मोठे दगड गाडीवर पडल्याने गाडीचा जागीच चक्काचूर झाला. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही.
मुसळधार पावसात माळशेज घाटात दरवर्षी दरड कोसळण्याच्या घटना घडत असतात. माळशेज घाट परिसरात मागील तीन दिवसांपासून पावसाने हजेरी लावली आहे. त्यातच दरड कोसळून दुर्घटना घडली, परंतु सुदैवाने यात कोणही जखमी झालं नाही अथवा जीवितहानी झाली नाही.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभिनेत्री, खासदार नुसरत जहांचा 'बेबी बंप' फोटो व्हायरल, पतीने बाप नसल्याचं केले जाहीर https://t.co/LAgSAuylGm
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
अहमदनगर इथे राहणारा मुकुंद बसवे हा तरुण काल आपल्या मित्रासह आपल्या वडिलांना आणण्यासाठी गाडीने कल्याणच्या दिशेने निघाला होता. संध्याकाळी पाचच्या सुमारास ते दोघे गाडीने माळशेज घाटात पोहोचला. यावेळी चहाची तल्लफ आल्याने त्यांनी आपली गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केली. कारमधून उतरुन चहाच्या दुकानजवळ पोहोचले असतानाच अचानक त्यांच्या गाडीवर दरड कोसळली.
शरद पवारांच्या वक्तव्यावर शिवसेना नेते संजय राऊत यांचे उत्तर, काँग्रेसच्या स्वबळाच्या ना-याला दिले उत्तर #surajyadigital #सुराज्यडिजिटल #SanjayRaut #Congress #NCP #SharadPawar #statment #politics #politicalhttps://t.co/rgij7VSfjj
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
या दुर्घटनेत गाडीचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. सुदैवाने मुकुंद आणि त्याचा मित्र गाडीतून उतरल्याने सुखरुप बचावले. काळ आला होता पण वेळ आली नव्हती याचा प्रत्यय या दोघांनाही आला. दरम्यान गाडी रस्त्याच्या कडेला पार्क केल्याने वाहतुकीवर फारसा परिणाम झाला नाही. दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी-कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि युद्धपातळीवर काम करुन दरड हटवली.
* दोघांचा चहामुळे वाचला जीव
चहामुळे दोन जणांचा जीव वाचला, वाचून आश्चर्य वाटेल पण हे खरं आहे. कल्याण-अहमदनगर महामार्गावर काल (11 जून) एका कारवर दरड कोसळली. माळशेज घाटात पोहोचल्यावर कारमधील दोघांना चहाची तल्लफ आली होती. कार रस्त्याच्या कडेला पार्क करुन चहा घेण्यासाठी हॉटेलजवळ पोहोचले. त्याचवेळी त्यांनी पार्क केलेल्या कारवर अचानक दरड कोसळली. त्यामुळे दोघेही अपघातातून बालंबाल बचावले.
पाच वर्षे, त्यापेक्षा कमी वयाच्या मुलांना मास्क घालावे का ? रेमडेसिवीर, स्टेरॉइडचा वापर कधी https://t.co/rua8cWF1Ai
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021