सांगली : विटा पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार सदानंद मारूती वाघमोडे यांना निलंबीत करण्यात आले. खानापूर तालुक्यातील करंजे येथील पोपट माने या ६० वर्षाच्या वृध्दाला विटा पोलीस ठाणे कार्यक्षेत्रातील खानापूर औट पोलीस ठाण्यात नेऊन बेदम मारहाण केल्याचे प्रकरण चांगलेच अंगलट आले.
खूशखबर ! पेट्रोल 1 रूपया लीटर, याला कारण काय https://t.co/RAslic2AzA
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीत गेडाम यांनी याबाबतचा आदेश काढून हवालदार वाघमोडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
करंजे येथील भगतमळा येथे वास्तव्यास असलेले पोपट माने व त्यांची पत्नी यांच्यात किरकोळ कारणावरून भांडण झाले. याची माहिती पोलीस हवालदार वाघमोडे यांना मिळाल्यानंतर यांनी सोमवारी रात्री १० वाजता माने यांना करंजे येथून खानापूर पोलीस ठाण्यात आणले.
2024 नंतरही शरद पवार भावी पंतप्रधानच असतील https://t.co/EKP7en7Eue
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
त्यावेळी त्यांनी वृध्दाला काठीने पाठीवर, पायावर व मांडीवर जबर मारहाण करून त्यांना जखमी केले. या प्रकरणाची जिल्हा पोलीस प्रमुख दिक्षीत गेडाम यांनी गंभीर दखल घेऊन पोलीस हवालदार सदानंद वाघमोडे यांच्यावर निलंबनाची कारवाई केली.