मुंबई : देशात पेट्रोल-डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यातच डोंबिवलीत पेट्रोल 1 रूपये लीटरने विकले जात आहे. याला कारण आहे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा वाढदिवस. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त 13 जूनला सकाळी 10 ते 12 या वेळेदरम्यान डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपवर पेट्रोल अवघ्या एक रुपयात एक लीटर या प्रमाणानं विकलं जाणार आहे.
शरद पवार आणि प्रशांत किशोर यांच्यात काय चर्चा झाली? राष्ट्रवादीचा खुलासा, पहा व्हिडिओhttps://t.co/boMdwxaLrW
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
शिवसेनेचे युवा नेते आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा आज रविवारी (13 जून) वाढदिवस आहे. ठाकरे कुटुंबातूनच राजकारणाचा वारसा मिळालेल्या आदित्य ठाकरे यांनी कायमच सर्वांचं लक्ष वेधलं. आदित्य ठाकरे यांच्या वाढदिवसाचं औचित्य साधत युवासेनेतर्फे एक रुपया लीटर दरानं पेट्रोलची विक्री होणार आहे. डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपावर पेट्रोल अवघ्या एक रुपयात एक लीटर या दराने विकलं जाणार आहे. याबाबतचं एक पोस्टर सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
प्रकाश आंबेडकर-संभाजीराजे एकत्र आल्यास शिवशाहीला नव्हे, पेशवाईला फटका, भाजपची मोठी लिस्ट तयारhttps://t.co/j5oEOQCZlf
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
इंधन दरवाढीमुळे सर्वसामान्य नागरिक त्रस्त आहेत. राज्यभरात पेट्रोलच्या दरानं शंभरी पार केली आहे. पुढील काही दिवसांत डिझेलही शंभर रुपयांच्या पुढे जाईल असं चित्र आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दिवसागणिक वाढणाऱ्या या किमतींमुळे सर्वसामान्य नागरिकांना पेट्रोल परवडेनासं झालं आहे. मुंबईत आणि उपनगरांमध्ये सध्या पेट्रोल प्रति लीटर 102 रुपये दरानं मिळते. या दरवाढीपासून दिलासा देण्याचा प्रयत्न युवासेनेनं केला आहे.
'सहा महिन्यांत कोपर्डी खटल्याचा निकाल लागला पाहिजे' https://t.co/ZNlNFR6uaB
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
कल्याण युवासेना विधानसभा अधिकारी योगेश म्हात्रे आणि नगरसेविका पूजा म्हात्रे यांनी डोंबिवलीत एक रुपया प्रति लीटर या दरानं पेट्रोल देत नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. 13 जून रोजी सकाळी 10 ते 12 यादरम्यान डोंबिवली एमआयडीसी येथील उस्मा पेट्रोल पंपवर युवासेनेकडून अवघ्या एक रुपयात पेट्रोल एक लीटर दिलं जाणार आहे.
अंबरनाथ येथील युवासेनेच्या पदाधिकार्यांनीही पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या वाढदिसानिमित्त पेट्रोल कमी दरानं विकून सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. अंबरनाथ पश्चिमेकडील येथील विमको नाक्यावरील पेट्रोल पंपावर सकाळी 11 ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास येणाऱ्या वाहनचालकासाठी 50 रुपये लीटरने पेट्रोल देण्यात येणार आहे.
झेड दर्जाची सुरक्षा, ज्योतिरादित्यांचा ताफा अडवून दिले 'बेशरमा'ची फुले https://t.co/lecRiqo2a1
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021