अक्कलकोट : अक्कलकोट तालुक्यातील ममनाबाद येथे ३२ वर्षीय तरुणावर प्राणघातक हल्ला करून तीक्ष्ण हत्याराने डोक्यावर पाठीत वार करून भरदिवसा गावात निघृण खून करण्यात आला आहे. या हल्ल्यात पाचजण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार चालू आहेत. ही घटना काल शनिवारी (१२ जून) साडेपाच वाजता घडली. काल रात्री उशिरा अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्यादी दाखल झाली आहे.
मराठा आरक्षणासाठी आता गुळगुळीत आंदोलन नको, मंत्र्यांच्या गाड्या फोडा, मराठा मंत्री तोंडात गुटखा खाऊन बसलेत का? https://t.co/4EruBnYNVt
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 12, 2021
विश्वनाथ बसण्णा पाटील (वय ३२) असे निघृण खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. पूर्वी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून ही हाणामारी झाल्याचे वृत्त आहे. अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याकडून मिळालेली माहिती अशी की, रामचंद्र बिराजदार हे रेशन दुकानदार एका शाळेत धान्य ठेवून सार्वजनिक रित्या वाटप करत होते. मागील दोन दिवसांपूर्वी कोळी उपसरपंच यांनी हे धान्यवाटप ठिकाण तेथून हलविण्याबाबत सांगितले होते.यावरुन दोघांमध्ये शाब्दिक चकमक उडाली होती.
वृद्धाला बेदम मारहाण, विटा पोलिस ठाण्याचा पोलीस हवालदार निलंबित https://t.co/IrT8gQdUW6
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
या स्वस्त धान्य दुकानाचे धान्य ठेवण्याच्या कारणावरून झालेल्या भांडणाचा राग मनात धरून व म्हशीचे दूध रस्त्यावर काढण्याच्या कारणावरून चंद्रकांत मसण्णा गायकवाड, धोंडिबा मसण्णा गायकवाड, मसण्णा धोंडिबा गायकवाड,अंबादास शंकर कोळी, निंगप्पा शंकर कोळी, सूर्यकांत शंकर कोळी, बलभीम शंकर कोळी (सर्व रा – सर्व ममनाबाद ता.अक्कलकोट ) यांनी विश्वनाथ बसण्णा पाटील (वय ३२) यास डोक्यात कु-हाडीने जबर घाव घालून व पाठीवर तलवारीने वार करून ठार मारले.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
याचवेळी सिद्धाराम हणमंत पाटील, रामचंद्र हणमंत बिराजदार व त्यांची मुले संजय बिराजदार व अजय बिराजदार भांडण सोडवण्यासाठी गेले असता त्यांना या लोकांनी लाकडी काठी, दगड व कु-हाडीने मारहाण करून गंभीर जखमी केले. तसेच तिथे थांबलेल्या स्विफ्ट गाडीचे नुकसान केले आहे, अशी सिद्धाराम हणमंत पाटील यांनी अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मोदींनी 'मन की बात'मध्ये कौतुक केलेल्या शेतकऱ्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश, त्यांच्या अनेक कार्याची काँग्रेसने घेतली दखलhttps://t.co/s9k9ru9fhD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
या घटनेची नोंद शनिवारी रात्री उशिरा दाखल झाली. दुसरी बाजू चंद्रकांत गायकवाड यांनी देखील विश्वनाथ पाटील ,संजय बिराजदार, सिध्दप्पा पाटील व अन्य तीन अनोळखी व्यक्ती विरोध कु-हाडी व तलवारीने मारुन जातिवाचक शिवागाळी करत जीव मारण्याची धमकी दिल्याबाबत फिर्याद दिली आहे. या घटनेतील सर्व जखमींना अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी पाठवण्यात आले असून गंभीर जखमी असलेले संजय बिराजदार (वय २१ ) यांना सोलापूर येथे दाखल करण्यात आले आहे.
या घटनेची माहिती मिळताच सोलापूर ग्रामीणचे अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे, उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड, पोलीस निरीक्षक गोपाळ पवार व पोलीस कर्मचारी घटनास्थळी भेट दिली. या गुन्ह्याचा पुढील अधिक
तपास अक्कलकोट उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोपाळ पवार हे करीत आहेत. यातील ३०२ कलमातील सहा आरोपींना अटक करण्यात आली असल्याचे माहिती पोलीस निरीक्षक गोपाळ पवार यांनी दिली.
"2024 च्या निवडणुकीत जयंत पाटील यांना घरी पाठवू" https://t.co/IeUy9VEMww
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021