कोल्हापूर : मराठा समाजाला आरक्षण मिळावे म्हणून खासदार संभाजीराजे यांनी 16 तारखेला कोल्हापुरात मोर्चा काढण्याची घोषणा केली आहे. अशातच उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी श्रीमंत शाहू छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी संभाजीराजे यांचे बंधू मालोजीराजे सुद्धा उपस्थितीत होते. या भेटीत नक्की काय चर्चा झाली हे अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दरम्यान, यावेळी मराठा संघटनेचे काही नेते सुद्धा उपस्थितीत होते, अशी माहिती मिळाली आहे.
सोलापूर : डॉक्टराने पेशंटना मारुन टाकले, घरी येऊन दिली धमकी, कोणत्या डॉक्टरावर आरोप, जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न #solapur #surajyadigital #आत्मदहन #सुराज्यडिजिटल #सोलापूर #doctor #धमकी https://t.co/STtdGvAeD7
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
मराठा आरक्षणाचा विषय हा केंद्र सरकारशी निगडीत आहे. त्यांनी याबाबत कायदा केल्यास आरक्षणाचा विषय सुटू शकतो, असा पुर्नउच्चार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते.
कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर जिल्हा दौरादरम्यान आज कोल्हापुरातील नवीन राजवाडा येथे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांची भेट घेतली व संवाद साधला. यावेळी छत्रपती मालोजीराजे, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत आदी मान्यवर उपस्थित होते. pic.twitter.com/Um5x0ibprc
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) June 14, 2021
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारची भूमिका काय? असे विचारले असता इतर कोणत्याही आरक्षणाला धक्का न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावे अशीच आमची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेताना एकूण बारा मुद्यांवर चर्चा करण्यात आली. यातील पहिला मुद्दा हा मराठा आरक्षणाचा होता. सुप्रीम कोर्टाने जो निर्णय दिला त्याची माहिती आम्ही दिल्याचे अजित पवार म्हणाले.
सोलापूरसह राज्यातील हे जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल #surajyadigital #solapur #सुराज्यडिजिटल #सोलापूर #शिथिल #निर्बंध pic.twitter.com/TbDSHY0eyH
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने निर्णय घेतला होता. पण सुप्रीम कोर्टाच्या आदेशामुळे या निर्णयाला स्थगिती मिळाली. आता अहमदाबाद उच्च न्यायालयाचे निवृत्त चीफ जस्टिस दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी समिती नेमली आहे. या समितीने मुख्यमंत्री यांच्याकडे अहवाल दिला आहे. या अहवालात ज्या काही सूचना आहेत त्यावर चर्चा होईल.
सोलापूर जिल्हा उद्यापासून पूर्ण अनलॉक, सर्व व्यवहार आता सुरळीत होणार https://t.co/pP8PkkouuU
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
मराठा आरक्षणासाठी राज्याचे राज्यपाल तसेच पंतप्रधान यांची भेट घेतली आहे. केंद्राने लवकरात लवकर मराठा आरक्षणाबाबत विधेयक आणावे व ते मंजूर करावे आणि नंतर कायदा करावा अशी मागणी केली आहे. केंद्राने कायद्यात बदल केल्यानतंरच आरक्षणाचा प्रश्न सुटणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका, लसीकरणाशिवाय वारक-यांना पंढरीत प्रवेश नको https://t.co/0F3oymkaqy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021
दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर आज अजित पवार यांनी कोल्हापुरातील न्यू पॅलेस येथे शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेतली व संवाद साधला. यावेळी मालोजीराजे छत्रपती, वसंतराव मुळीक, इंद्रजीत सावंत आदी उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची साक्ष देऊन मराठा समाजाला भुरळ पाडण्याचा प्रयत्न नक्षलवादी संघटना करत असल्याचे मला वाचनात आले. ‘मराठ्यांनो, आम्ही तुमची वाट पाहत आहोत’ असेही ते म्हणाले. उलट मराठा समाजाचा घटक किंवा त्याच स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांचा वंशज या नात्याने, मी त्यांनाच आवाहन करतो. “माओवाद्यांनो या आम्हीच तुमची वाट पाहत आहोत. या सामील व्हा मुख्य प्रवाहात.” भारताने लोकशाही व्यवस्था स्वीकारली आहे, असं आवाहनच संभाजीराजेंनी केलं आहे.
वेळापूरकरांना मूसळधार पावसाने काढले झोडपून, सलग दोन तास पाऊस, ओढ्याला पुराचे स्वरूप, गावामधील वाहतूक बंद https://t.co/yjs3lKxHTg
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021