मुंबई : नवी मुंबईतून एक धक्कादायक बातमी समोर आलीय. येथील ऐरोलीत एका पित्याने आपल्या दोन्ही मुलांना गोळ्या घातल्या आहेत. निवृत्त पोलीस कर्मचारी भगवान पाटील यांनी हा गोळीबार केला आहे. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर त्यांनी गोळीबार केला. यात विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या तर दुसरा मुलगा सुजयला गोळी घासून गेली आहे. विजय याची प्रकृती चिंताजनक असून उपचार सुरु आहेत. गोळी झाडणाऱ्या पित्याची चौकशी सुरु आहे.
तलावात तरंगत होते पैसे, अनेकांनी लुटल्या 200 अन् 500 च्या नोटा https://t.co/iTFW2J9MAR
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
तुला गिफ्ट द्यायचं आहे असं सांगून घरी बोलावलेल्या आपल्याच मुलावर एका निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने गोळ्या झाडल्या आहेत. ही धक्कादायक घटना नवी मुंबईतील एरोली भागात घडली असून गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव भगवान पाटील आहे.
जनहितार्थ जारी #surajyadigital
– पावसाच्या दिवसात ही खबरदारी नक्की घ्या आणि सर्वांना सांगा #खबरदारी #सुराज्यडिजिटल #Rain #पाऊस #जनहितार्थ pic.twitter.com/9Rxc8uP7Rt— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
धक्कादायक घटना नवी मुंबईतील एरोली भागात घडली असून गोळ्या झाडणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याचे नाव भगवान पाटील आहे. तर गोळीबारामध्ये जखमी झालेल्या मुलाचे नाव विजय पाटील असे आहे. तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे विजयची प्रकृती चिंताजनक आहे. सध्या विजयवर ऐरोलीतील इंद्रावती रुग्णालयात उपचार सुरु आहेत. तर भगवान पाटील याला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काळा दिवस ! आज काही क्षणात अदानी ग्रुपचे करोडो रुपये बुडाले, पत्रकार सुचेता दलालने केले होते भाष्यhttps://t.co/hzgypRQROQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
मिळालेल्या माहितीनुसार नवी मुंबईतील एरोली भागात भगवान पाटील नावाचे निवृत्त पोलीस अधिकारी वास्तव्यास आहेत. विजय पाटील हा त्यांचा मुलगा असून तो सध्या वसईला राहतो. त्याला भगवान पाटील यांनी तुला गिफ्ट द्यायचे आहे असे सांगून घरी बोलावले. त्यानंतर मुलगा घरी आल्यानंतर भगवान पाटील यांनी विजय पाटील तसेच दुसरा मुलगा सुजय पाटील या दोघांवर रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. यामध्ये विजयच्या पोटात एक आणि खांद्यावर एक गोळी लागली. तर एक गोळी हाताला घासून गेली. तर सुजयच्या अंगाला गोळी घासून गेली. तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे विजयची प्रकृती चिंताजनक आहे. यावेळी भगवान पाटील या निवृत्त अधिकाऱ्याने आपल्या पत्नालीसुद्धा मारहाण केली.
ठाकरे सरकारचा आदेश, वाखरी ते पंढरपूर असं दीड किलोमीटरच 'पायीवारी' https://t.co/n9R4RcTcds
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
भगवान पाटील हे माजी नगरसेवक राजू पाटील यांचे नातेवाईक आहेत. भगवान पाटील यांनी याआधीही अशाच प्रकारचे कृत्य केलेले आहे. त्यांनी राजू पाटील यांच्यावर रिव्हॉल्व्हर रोखली होती. या प्रकारामुळे तक्रार दाखल केल्यानंतर भगवान पाटील यांच्याकडून रिव्हॉल्व्हर जप्त करण्यात आली होती. मात्र, आता रिव्हॉल्वहर परत मिळाल्यानंतर भगवान पाटील यांनी आपल्याच मुलांवर गोळ्या झाडल्या आहेत. या प्रकारामुळे सध्या नवी मुंबई परिसरात खळबळ उडाली आहे.
"लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा" https://t.co/eSZfPmZePF
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
भगवान पाटील या निवृत्त पोलीस अधिकाऱ्याने आपल्या मुलाला घरी बोलावल्यानंतर त्याच्यावर अचानकपणे रिव्हॉल्व्हरने गोळ्या झाडल्या. या हल्ल्यामध्ये विजय पाटील या तरुणाला तब्बल तीन गोळ्या लागल्यामुळे तो गंभीर जखमी झाला आहे. त्याची प्रकृती सध्या चिंतानजक असून दुसऱ्या मुलाच्याही अंगाला गोळी लागून गेली आहे. भगवान पटील याने आपल्याच मुलावर गोळीबार का केला, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी त्याला तब्यात घेतले आहे. पोलीस भगवान पाटील यांची चौकशी करत असून लवकरच नेमके कारण समजेल.
छ. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच सोलापुरातील मराठा समाजाचं आंदोलन; दोन संघटना, मात्र एक निर्णय
https://t.co/Hmair0edR8— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021