मुंबई : गेल्या वर्षीप्रमाणे यंदाही पंढरपूर वारी सोहळ्यातील पालख्या बसनेच नेण्यात येणार आहेत. यासंबंधीचा आदेश ठाकरे सरकारने आज सोमवारी काढला आहे. कोरोना संकटामुळे हा निर्णय घेण्यात आला आहे. सुधारित नियमावलीनुसार फक्त वाखरी ते पंढरपूर असे दीड किलोमीटर अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायीवारी करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. मानाच्या दहा पालख्यांना वारी प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येणार आहे.
जनहितार्थ जारी #surajyadigital
– पावसाच्या दिवसात ही खबरदारी नक्की घ्या आणि सर्वांना सांगा #खबरदारी #सुराज्यडिजिटल #Rain #पाऊस #जनहितार्थ pic.twitter.com/9Rxc8uP7Rt— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
पंढरपूर येथे आषाढी एकादशीसाठी पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे. आषाढीला पालख्या बसमधूनच येणार असल्याचं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे. केवळ वाखरी ते पंढरपूर दीड किलोमीटर दिंडी पायी येणार असून एकादशी दिवशी शहरातील 195 महाराज मंडळींना देवाचे मुखदर्शन मिळणार आहे. यंदाच्या आषाढी वारीसंदर्भात शासन आदेश निघाला असून पायी वारीला मंजुरी न देण्यावर शासन ठाम आहे.
तलावात तरंगत होते पैसे, अनेकांनी लुटल्या 200 अन् 500 च्या नोटा https://t.co/iTFW2J9MAR
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
मानाच्या 10 पालखी सोहळ्यांच्या प्रस्थान सोहळ्याबाबत शासनाच्या आदेशात म्हटलं आहे की, देहू व आळंदी येथील प्रस्थान सोहळ्यासाठी प्रत्येकी 100 तर उर्वरित 8 सोहळ्यांसाठी 50 वारकऱ्यांना प्रस्थान सोहळ्यात सहभागी होता येईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
"लोकशाहीतील राजे नीट वागत नसतील तर त्यांना आडवा आणि गाडा" https://t.co/eSZfPmZePF
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
मानाचे पालखी सोहळे प्रस्थान ठिकाणाहून विशेष वाहनाद्वारे वाखरी येथे पोहोचल्यानंतर तिथून पंढरपूरकडे दीड किमी अंतर प्रातिनिधीक स्वरुपात पायी वारी करण्यात परवानगी देण्यात आली आहे.
यंदाच्या वर्षी सर्व मानाच्या पालखी सोहळ्यांचे पंढरपूरमध्ये दशमीच्या दिवशी आगमन होईल तप पौर्णिमेच्या दिवशी प्रस्थान करण्यास मान्यता देण्यात आली आहे. शासकीय महापूजा, विठ्ठलाशी संतांच्या भेटी गेल्यावर्षीप्रमाणेच करण्यात येणार आहे. तर नित्योपचार परंपरेनुसार सुरु ठेवून आषाढी यात्रा कालावधीत भाविकांसाठी दर्शन बंद ठेवण्यात येणार आहे.
छ. संभाजीराजेंच्या नेतृत्वाखालीच सोलापुरातील मराठा समाजाचं आंदोलन; दोन संघटना, मात्र एक निर्णय
https://t.co/Hmair0edR8— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
एकादशी दिवशीचा रथोत्सवासाठी रथाऐवजी स्वतंत्र वाहनाने 10 मानकरी आणि मंदिर समितीचे 5 कर्मचारी असे 15 व्यक्ती येतील. यावेळी सोशल डिस्टन्सिंग पाळलं जाईल. संताच्या पादुका भेटीदरम्यान मानाच्या पालखी सोहळ्यातील 40 वारकऱ्यांना परवानगी देण्यात आली आहे. तर वारीसाठीच्या 2 बसमध्ये प्रत्येकी 20 असे 40 वारकऱ्यांची संख्या निश्चित करण्यात आली आहे.
वीटभट्टीसाठी खणलेल्या खड्ड्यात बुडून बहिणभावाचा मृत्यू https://t.co/o5BHFDOP6p
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021