लंडन : ब्रिटनमध्ये कोरोना रूग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान बोरिस जॉनसन यांनी इंग्लंडमधील निर्बंध इतक्यात हटवले जाणार नाहीत, असं सांगितलंय. तसेच हे निर्बंध साधारण एक महिन्यासाठी वाढवले असून 19 जुलैपर्यंत लॉकडाऊन संदर्भातील सर्व निर्बंध लागू असणार आहेत. याआधी हे निर्बंध 21 जूनपर्यंत होते. ‘फ्रीडम डे’ 19 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे.
Now is the time to ease off the accelerator because by being cautious now we have the chance – in the next four weeks – to save many thousands of lives by vaccinating millions more people. 3/4
— Boris Johnson (@BorisJohnson) June 14, 2021
बोरिस जॉनसन यांनी बोलताना सांगितलं की, “कोरोना व्हायरसच्या डेल्टा स्ट्रेनमुळे संसर्गाचा दर आणि रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांमध्ये होणाऱ्या वाढीमुळे चिंता वाढली आहे.” बोरिस यांनी केलेल्या या घोषणेसोबत आता ‘फ्रीडम डे’ 19 जुलै रोजी साजरा केला जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
72 हजारांहून अधिक आशा वर्कर आजपासून संपावर https://t.co/XHC7qXsB1k
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
जॉनसन यांनी पुढे बोलताना सांगितलं की, निर्बंध हटवण्यासाठी आणखी थोडी वाट पाहणं उत्तम ठरेल. तसेच त्यांनी आशा व्यक्त केली आहे की, 19 जुलै हा निर्बंधांचा अखेरचा दिवस असेल. पुढे बोलताना ते म्हणाले की, आता देशात 40 वर्षांहून अधिक वयाच्या नागरिकांना लसीचा दुसरा डोस देण्यासाठी लसीकरण मोहीम आणखी जलद करणार आहोत.
ब्रिटनमध्ये शनिवारी 7738 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच 6 जूनपासून कोरोनाची लागण झालेल्यांची संख्या 47,868 इतकी झाली आहे. यामध्ये गेल्या सात दिवसांत 52.5 टक्के रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. शनिवारी जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, 28 दिवसांत 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
काळा दिवस ! आज काही क्षणात अदानी ग्रुपचे करोडो रुपये बुडाले, पत्रकार सुचेता दलालने केले होते भाष्यhttps://t.co/hzgypRQROQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 14, 2021
दरम्यान, सौदी अरेबियामध्ये पुढच्या महिन्यात होणाऱ्या हज यात्रेवरही निर्बंध लादण्यात आले आहेत. या यात्रेसाठी भारतासह इतर देशांमधून येणाऱ्या भाविकांना बंदी असणार आहे. हज यात्रेसाठी केवळ सौदी अरेबियातील नागरिकांना परवानगी देण्यात आली आहे.