नवी दिल्ली : बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी एका मुलाखतीत भारताच्या श्रीलंकन दौऱ्यावर भाष्य केले आहे. 13 ते 25 जुलैदरम्यान 3 वनडे व 3 टी-20 सामने खेळण्यासाठी भारताने येथे शिखर धवनच्या नेतृत्वात दुसरा संघ पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. या संघाचे कोच म्हणून राहुल द्रविड श्रीलंकेला जाणार आहेत, असे गांगुली यांनी म्हटले. दुसरीकडे विराट कोहलीच्या नेतृत्वात भारताचा प्रमुख संघ इंग्लंडमध्ये कसोटी सामने खेळणार आहे.
Finally Sir #RahulDravid will coach seniour TEAM INDIA
Hope to See him as a permanent Coach in Future for the Seniour Team pic.twitter.com/FHJBSgHSeg— Subham Chourasia polo (@SubhamPolo) June 15, 2021
भारतीय संघ श्रीलंकेसाठी 28 जूनला रवाना होणार असून श्रीलंकेत दाखल झाल्यावर त्यांना पुन्हा तीन दिवस कठोर क्वारंटाईन व्हावे लागेल. भारत आणि श्रीलंका यांच्यातील मालिकेला 13 जुलैपासून सुरुवात होईल.
भारताचा संघ पुढील महिन्यात श्रीलंका दौऱ्यावर जाणार असून मर्यादित षटकांच्या मालिका खेळणार आहे. या दौऱ्यात भारताचा माजी कर्णधार राहुल द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषणवणार असल्याची माहिती बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी दिली.
कोरोना पुन्हा वाढला; 19 जुलैपर्यंत ब्रिटनमध्ये कडक निर्बंध https://t.co/H4lsDLpIwA
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताचा एक संघ सध्या इंग्लंड दौऱ्यावर गेला आहे. त्यामुळे श्रीलंका दौऱ्यासाठी निवडण्यात आलेल्या भारताच्या संघामध्ये बऱ्याच युवा खेळाडूंचा समावेश आहे. अनुभवी सलामीवीर शिखर धवन पहिल्यांदाच भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. त्याच्या नेतृत्वात भारतीय संघ श्रीलंकेत तीन एकदिवसीय आणि तीन टी-20 सामन्यांची मालिका खेळणार असून हे सर्व सामने कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियमवर होणार आहेत.
The @BLACKCAPS have named a 15-member squad for the #WTC21 Final 👇 pic.twitter.com/g2T4XNCrMW
— ICC (@ICC) June 15, 2021
श्रीलंकेविरुद्धच्या मालिकेत राहुल भारतीय संघाचे प्रशिक्षकपद भूषवेल, असे बीसीसीआयचे सचिव जय शाह मंगळवारी म्हणाले. भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री, गोलंदाजी प्रशिक्षक भारत अरुण आणि फलंदाजी प्रशिक्षक विक्रम राठोड हे सध्या भारतीय संघासोबत इंग्लंडमध्ये आहेत. त्यामुळे त्यांच्या अनुपस्थितीत आता द्रविड भारतीय संघाचे प्रशिक्षणपद भूषवेल. भारतीय संघाला प्रशिक्षण देण्याची ही द्रविडची दुसरी वेळ असेल. याआधी त्याने 2014 सालच्या इंग्लंड दौऱ्यात भारतीय संघाचा फलंदाजी सल्लागार म्हणून काम केले होते.
ड्रोन करतील औषधांची घरपोच डिलीव्हरी, बंगळुरुपासून 80 किलोमीटरची ट्रायल https://t.co/iVbfE8rK7G
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 13, 2021