कोल्हापूर : राज्य सरकारने आम्हाला चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. ही सकारात्मक गोष्ट आहे. त्यामुळे आम्हीही सरकारला सकारात्मक प्रतिसाद देणार आहोत. मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी जाण्याकरीता आम्हाला काही मुद्द्यांचा अभ्यास करून जावं लागणार आहे. त्यामुळे उद्या मुख्यमंत्र्यांना भेटणार नाही. त्यांना कधी भेटायचं हे उद्या गुरुवारी ठरवू. परंतू आंदोलन सुरूच राहणार असल्याचं खासदार संभाजी छत्रपती यांनी सांगितलं.
कोल्हापूर : खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल, आंदोलनाची रुपरेषा #मराठा #आरक्षण #maratha #surajyadigital #kolhapurcity #कोल्हापूर #MarathaReservation #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/u609xCPImE
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
कोल्हापूरमध्ये मराठा क्रांती मूक आंदोलनाची सांगता झाली असून राज्य सरकारने खासदार संभाजीराजे यांनी चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. पण, ‘आमच्या इतर मागण्या जर मान्य झाल्या नाहीतर पुणे ते मंत्रालय लाँग मार्च हे शेवटचे अस्त्र असणार आहे’ असं म्हणत संभाजीराजे यांनी एकाप्रकारे सरकारला इशारा दिला आहे.
कोल्हापूरमध्ये आज संभाजीराजे यांच्या नेतृत्वाखाली मराठा क्रांती मूक आंदोलन पार पडले. या आंदोलनानंतर संभाजीराजे यांनी मराठा समन्वयकांचे आभार मानले. यावेळी बोलत असताना संभाजीराजेंनी पुणे ते मंत्रालय लाँग मार्चबद्दल सूचक विधान केलं.
आज कोल्हापुरात राजर्षी छत्रपती शाहू महाराज समाधीस्थळ येथे युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखालील झालेल्या मराठा क्रांती मूक आंदोलनात सहभागी होऊन पाठिंबा दिला. pic.twitter.com/TTxU0q6yvN
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) June 16, 2021
‘लाँग मार्च काढण्याचा हा आपला शेवटचा पर्याय आहे, शेवटचे अस्त्र आहे. मी पहिल्याच दिवशी स्पष्ट केलं आहे की, समाजाला वेठीस धरायचं नाही म्हणून आरक्षण हा वेगळा लढा आहे, तो सुरूच राहणार आहे. त्यात घटनादुरुस्ती असेल किंवा काही बदल असतील तर ते त्यांनी करावे. पण, आमच्या इतर ज्या मागण्या आहे, त्या जर मान्य करत नसतील तर कोणताही मार्ग काढत नसतील तर लाँग मार्च शिवाय पर्याय नाही. मी बोललोय, आमचा लाँग मार्च काढण्याचा विचार आहे, आम्हाला 36 जिल्ह्यांमध्ये सुद्धा जायचं नाही. जर तुम्ही सकारात्मक पद्धतीने मार्ग काढला तर आम्ही स्वागत करू’ असंही राजे म्हणाले.
* ‘संभाजीराजेंनी उद्या मुंबईला यावं, मुख्यमंत्री भेट देतील’
कोल्हापूरचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी मराठा मूक आंदोलनात संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा • सोडवण्यासाठी समिती स्थापन केली आहे. त्यामुळे चर्चेतूनच यावर आता तोडगा निघू शकतो. उद्याच राजेंनी मुंबईत यावं. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देतील. संभाजी राजेंनी मांडलेल्या मागण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, असं पाटलांनी म्हटलं आहे.
सतेज पाटील यांनी आंदोलकांशी संवाद साधत संभाजीराजेंना सरकारकडून चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. ‘महाविकास आघाडी सरकारने मराठा आरक्षणाचा तिढा सोडवण्यासाठी योग्य पाऊल उचलले असून समिती स्थापन केली आहे. केंद्र सरकारकडेही मागणी केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतील आहे. त्यामुळे चर्चेतूनच यावर आता तोडगा निघू शकतो. पालकमंत्री म्हणून माझं जाहीर निमंत्रण आहे की, उद्या राजेंनी मुंबईत यावं. उद्याच मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री भेट देतील. आपण आणि सरकार मध्ये चर्चा व्हावी’
* पंतप्रधानांनी ठरवलं तर मराठा आरक्षण मिळू शकतं – छत्रपती शाहू महाराज
मराठा आरक्षणासाठी सर्वांनी एकत्र आलं पाहिजे. समाजाने हा विषय दिल्लीपर्यंत ठामपणे नेला पाहिजे. संभाजीराजे काही ना काही करत राहतील, पण एकावर जबाबदारी शक्य नाही. तुमचं सहकार्य लाभेल. सर्व 48 खासदारांनी दिल्लीत ताकद लावावी असं खासदार संभाजीराजेंचे वडील छत्रपती शाहू महाराज म्हणाले. ते कोल्हापुरातील पहिल्या मराठा मोर्चात बोलत होते.
मुंबई तुमच्या बाजूने आहेच पण आता दिल्लीही सोबत आली पाहिजे. मराठा आरक्षण विषय पुन्हा पंतप्रधानांपर्यंत नेला पाहिजे. आरक्षणासाठी घटना दुरूस्ती व्हावी’ अस परखड मत श्रीमंत शाहू छत्रपती यांनी मत मांडलं. तसंच, ‘पंतप्रधान मोदी यांनी ठरवलं तर नक्कीच मराठा आरक्षण मिळू शकतं’ असंही त्यांनी स्पष्ट केलं.
इंजिनियरचा असाही सत्कार #vairalvideo #surajyadigital #सुराज्यडिजिटल #engineering #सत्कार #व्हायरल #व्हिडिओ #farmer #शेतकरी
– शेतकऱ्यांच्या शेतातील डीपी जळाली होती. नवीन डीपी बसविण्यासाठी पंधरा हजाराची लाच मागितल्या बद्दल इंजिनियरचा सत्कार केला.https://t.co/qlpCZDPapQ— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021
समाजाने हा विषय दिल्लीपर्यंत ठामपणे नेला पाहिजे. संभाजीराजे काही ना काही करत राहतील. पण एकावर जबाबदारी शक्य नाही. तुमचं सहकार्य लाभेल. तत्कालिन पारिस्थितीवरून शाहू महाराजांनी आरक्षण दिलं. आपण कमजोर आहोत असं समजू नका. आपण बलाढ्य आहोत हे दिल्लीपर्यंत गेलं पाहिजे. खचून जाऊ नका,पण कायद्याचं उल्लंघनही करू नका. तरंच आपल्या जे साध्य करायचं आहे ते साध्य होईल, असंही शाहू महाराज म्हणाले.
सर्वात आधी मराठा आरक्षण पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात आघाडी सरकारने दिलं. त्यावेळी नारायण राणे समिती नेमून मराठा आरक्षण देण्यात आलं. पण त्यावेळी आमच्याकडून जी चूक झाली, तीच चूक भाजप सरकारकडूनही झाली. आयोग न नेमता आम्ही समिती नेमून आरक्षण दिलं ही आमची चूक होती, त्यामुळेच हायकोर्टाने आरक्षण नाकारलं, असं ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितलं.
कोल्हापूर मराठा आरक्षण आंदोलन – अपडेट्स #updates #कोल्हापूर #MarathaReservation #मराठा #आरक्षण pic.twitter.com/mnX6OZZ5nI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
शाहू महाराज म्हणाले, “मला उपमुख्यमंत्री अजित पवार भेटून गेले. त्यांनी मागण्यांना तत्वतः मान्यता दिली आहे. घटनेत आतापर्यंत अनेक अमेण्टमेंट झाल्या. आता अजून एक करायला काय हरकत आहे? पंतप्रधानांसमोर आणखी एकदा हा विषय गेला पाहिजे. पंतप्रधानाचे विचार काय ते स्पष्ट झाले नाहीत. त्यांनी भूमिका स्पष्ट केली पाहिजे”.
मराठा समाजासाठी हा स्वाभिमानाचा लढा – प्रकाश आंबेडकर
10 वाजता वंचितचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शाहू समाधीचं दर्शन घेऊन आंदोलनात भाग घेतला. त्यानंतर संभाजी छत्रपती यांनीही शाहू महाराजांच्या समाधीस्थळी येऊन दर्शन घेतलं. संभाजी छत्रपती आल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनीही त्यांची भेट घेतली आणि आंदोलनाला भाजपचा पाठिंबा असल्याचं निवेदन दिलं.
कोल्हापूरात आज छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीला अभिवादन करून मराठा क्रांती मूक आंदोलनास सुरुवात झाली. वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर हेही या आंदोलनात सामील झाले. ‘ज्या समाजाने लढा दिला नाही, त्यांच्या हातात छत्रपती शिवाजी महाराजांनी तलवार दिली, लढायला शिकवलं. मराठा समाजासाठी हा स्वाभिमानाचा लढा आहे.’, असं आंबेडकरांनी यावेळी म्हटलं आहे. आंबेडकर कार्यकर्त्यांसह आंदोलनामध्ये सहभागी झाले.
चिमुकल्या वेदिकाला मिळालं 16 कोटीचं इंजेक्शन https://t.co/zeYHCtF1yh
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
* सलाईन लावून धैर्यशील माने आंदोलनात सामील
तब्येत ठीक नसताना हाताला सलाईन लावली होती, अशाही परिस्थितीत शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने आंदोलनात सहभागी झाले. खासदार धैर्यशील माने यांना काही दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. उपचाराअंती त्यांनी कोरोनावर मात केली आहे. पण, त्यांच्यावर अजूनही उपचार सुरू आहे. आंदोलनात सहभागी होण्यासाठी धैर्यशील माने आपल्या गाडीत सलाईन लावून आंदोलन स्थळी पोहोचले.
* भाजपचा आरक्षणाला पाठिंबा
मराठा आंदोलनाला भाजपनेही पाठिंबा दिला आहे. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील पाठिंब्याचं निवेदन संभाजीराजे छत्रपतींना देणार आहेत. तसेच, ते आज कोल्हापुरात मराठा मूक मोर्चातही सहभागी झाले आहेत. मराठा सरकारला पुन्हा आरक्षण मिळेपर्यंत आणि आधीच्या सरकारने दिलेल्या सर्व सवलती पुन्हा मिळेपर्यंत होणाऱ्या सर्व आंदोलनाला आमचा पाठिंबा, असं यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले. तसेच, मराठा आरक्षणावर भाजपची भूमिकाही मांडली.
नेता म्हणून नव्हे तर कोल्हापूरचा नागरिक म्हणून मोर्चात आलो आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी जो कोणी प्रयत्न करेल त्यांना माझा आणि भाजपचा पाठिंबा असेल’, असं चंद्रकांत पाटील त्यावेळी म्हणाले. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी मराठा समाजाला सगळ्या सवलती देण्याची मागणी करणार आहे.