मुंबई : रायगड जिल्ह्यातील कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी शेकापचे माजी आमदार आणि या बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना अटक करण्यात आली आहे. मनी लाँडरिंगच्या आरोपाखाली ईडीने ही कारवाई केली आहे. ‘कर्नाळा नागरी सहकारी बँकेत’ 512 कोटी रुपयांचा गैरव्यवहार झाल्याचा आरोप आहे. दरम्यान ठेवीदारांनी त्यांचे हक्काचे पैसे परत मिळावे, यासाठी आंदोलनही केले होते.
आंदोलन सुरूच राहणार, पुणे ते मंत्रालय लाँगमार्च शेवटचे अस्त्र – संभाजी छत्रपती, पंतप्रधानांनी ठरवलं तर मराठा आरक्षण मिळू शकतं – छत्रपती शाहू महाराजhttps://t.co/tcQwWuKja4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
रायगड जिल्ह्यातील प्रसिद्ध कर्नाळा नागरी सहकारी बॅंकेत 1 हजार कोटी रुपयांचा घोटाळा झाल्याचा आरोप भाजप नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केला होता. माजी आमदार आणि बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांनी हा घोटाळा केल्याचा आरोपही सोमय्या केला होता.
कोल्हापूर मराठा आरक्षण आंदोलन – अपडेट्स #updates #कोल्हापूर #MarathaReservation #मराठा #आरक्षण pic.twitter.com/mnX6OZZ5nI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
किरीट सोमय्या, भाजपचे पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर, उरणचे आमदार महेश बालदी यांनी पत्रकार परिषद घेत रिझर्व्ह बॅंकेने केलेल्या स्पेशल ऑडिटमध्ये विवेक पाटील दोषी असल्याचं सांगितलं होतं. विवेक पाटील यांनी कार्यकर्त्यांच्या नावाने 63 बेनामी खाती उघडली. या खात्यांत 700 कोटी रुपयांवर रक्कम कर्जरुपी टाकण्यात आली. तेथून ती रक्कम विवेक पाटलांच्या मालकीचे असलेले कर्नाळा स्पोर्टस क्लब आणि कर्नाळा चॅरिटेबल ट्रस्टमध्ये या वळती करून हडप करण्यात आली आहे, असा आरोपी भाजप नेत्यांनी केला होता.
कोल्हापूर : खासदार धैर्यशील माने सलाईन लावून आंदोलन ठिकाणी दाखल, आंदोलनाची रुपरेषा #मराठा #आरक्षण #maratha #surajyadigital #kolhapurcity #कोल्हापूर #MarathaReservation #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/u609xCPImE
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
शेतकरी कामगार पक्षाचे माजी आमदार आणि कर्नाळा बँकेचे अध्यक्ष विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे. कर्नाळा बँकेत 512 कोटी रूपयांच्या घोटाळ्या प्रकरणी विवेक पाटील मुख्य आरोपी असल्याची माहिती मिळत आहे. फेब्रुवारी 2020 मध्ये कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी 17 संचालकांवर पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गेल्या दीड वर्षांपासून महाराष्ट्र गृह खातं कर्नाळा बँक प्रकरणात चौकशी करण्यात चालढकल करीत असल्याने अखेर पनवेल भाजप आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण भाजप आमदार महेश बालदी यांच्याकडून ईडीकडे मार्च 2020 रोजी लेखी तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर ईडीनं याप्रकरणी तपसा सुरु केला. चौकशी अंती अखेर विवेक पाटील यांना ईडीकडून अटक करण्यात आली आहे.
चिमुकल्या वेदिकाला मिळालं 16 कोटीचं इंजेक्शन https://t.co/zeYHCtF1yh
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
कर्नाळा बँकेत कोट्यवधी रुपयांचा घोटाळा झाल्याचा उघडकीस आले होते. त्यानंतर बँकेच्या व्यवहारांवर मर्यादा आली होती. यामुळे ठेवीदार आणि बॅंक खातेदारांचे पैसे पर मिळावे, यासाठी पनवेल मतदार संघाचे आमदार प्रशांत ठाकूर आणि उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांनी खातेदार आणि ठेवीदार संघर्ष समितीच्या माध्यमातून जनतेचा आवाज शासनापर्यंत पोहोचवला होता. बँकेच्या विरोधात ठेवीदारांसोबत आंदोलनही केले होते. तसेच गुन्हे दाखल होऊनही ठेवीदारांच्या पैशांबाबत कुठलीही हालचाल दिसत नाही, म्हणून आम्ही ईडी कार्यलयात गेलो होतो. ठेवीदारांचे कष्टाचे पैसे परत मिळावे, हाच आमचा उद्देश आहे. आम्हाला राजकारण करायचे नाही. पण यात खूप मोठे मनी लॉड्रिंग झाले आहे, असा आरोप प्रशांत ठाकूर यांनी याप्रकरणी केला होता.
युरो कप – ख्रिस्तियानो रोनाल्डोचा विक्रम, पोर्तुगालचा विजय https://t.co/fLW6zLKUrW
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
दरम्यान, विवेक पाटील यांच्या मालमत्तेवर या आधीच टाच आणण्यात आली होती. त्यांच्या गाड्यादेखील जप्त करण्यात आल्या होत्या. सहकार खात्यामार्फत या गैरव्यवहाराची चौकशी गेल्या 2 वर्षांपासून होती. शेतकरी कामगार पक्षाने महाविकास आघाडीला पाठिंबा दिला असल्याने त्यांना वाचवले जात होते, असा आरोप भाजपकडून वारंवार करण्यात येत होता.
सोलापूरच्या पालकमंत्री बदलाच्या चर्चेला पूर्णविराम https://t.co/nKr2okUdrK
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 15, 2021