मुंबई : मुंबईतल्या दादर येथील शिवसेना भवनासमोर आज बुधवारी भाजप आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये जोरदार राडा झाला आहे. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्याचेही वृत्त आहे. राम मंदिर प्रकरणात करण्यात आलेल्या आरोपानंतर भाजपचे कार्यकर्ते शिवसेना भवनासमोर आंदोलन करण्यासाठी आले होते. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी त्यांची बाचाबाची झाली. यानंतर पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला.
पाकिस्तानच्या संसदेत राडा; शिवीगाळ करत झाली हाणामारी, पहा व्हिडिओ https://t.co/Ewp8lcNEww
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
राम मंदिर ट्रस्टवर झालेल्या घोटाळ्याच्या आरोपावरून शिवसेना-भाजपमध्ये चांगलाच वाद रंगला. मुंबई भाजप युवा मोर्च्याने शिवसेनेविरोधात थेट शिवसेना भवनावर फटकार मोर्चा काढण्याचा निर्धार केला होता. दुपारी भाजपचे कार्यकर्ते घोषणा देतच राजाराणी चौकात आले. यावेळी ‘सोनिया सेना हाय हाय’च्या घोषणा देत भाजप कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिवसेना भवनापासून तीन ते चार किलोमीटर अंतरावर हा मोर्चा येताच पोलिसांनी हा मोर्चा अडवला. त्यामुळे आंदोलक अधिकच आक्रमक झाल्याने पोलिसांनी या आंदोलकांची धरपकड करून त्यांना व्हॅनमध्ये कोंबले. शिवसेना भवनापासून काही अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना रोखलं आणि त्यांची रवानगी पोलीस ठाण्यात केली.
दुसरीकडे काही भाजप कार्यकर्त्यांना मारहाण झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिवसैनिकांनी भाजपच्या महिला पदाधिकाऱ्यांनाही काठीने मारहाण केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला. यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करून शिवसैनिकांनाही ताब्यात घेतले आहे. अयोध्येतील राम मंदिर बांधण्यासाठी भूसंपादनाबाबत खोटे आणि बनावट आरोप केल्याचा दावा करत भाजपने फटकार मोर्चा काढला होता.
शिवाजी महाराजांच्या कधीही न पाहिलेल्या फोटोंचा शोध https://t.co/zosxMh14Eo
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
भाजप युवा मोर्च्याचे तेजिंदर सिंग यांच्या नेतृत्वाखाली हा मोर्चा काढण्यात आला. मात्र शिवसेना भवनापासून पाच किमी अंतरावरच पोलिसांनी भाजप कार्यकर्त्यांना रोखले आणि ताब्यात घेतले. आंदोलन आणि संभाव्य वाद टळला असं चित्र दिसत असतानाच दुसरीकडे मोठा गोंधळ उडाला. शिवसैनिकांनी काही पदाधिकाऱ्यांना आणि महिला कार्यकर्त्यांना मारहाण केल्याचा आरोप भाजपने केला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
दरम्यान, पोलिसांची गाडी या आंदोलकांना घेऊन शिवाजी पार्ककडे निघाली. तेव्हा व्हॅन येताच काही शिवसैनिक व्हॅनच्या दिशेने धावले. मात्र, व्हॅन सुसाट निघून गेल्याने भाजप कार्यकर्ते शिवसैनिकांच्या हाताला लागले नाहीत.
शिवसेना भवनासमोर भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये राडा….
भाजपचा जाहीर निषेध.
शेनीकांना जरा कमी फोडला म्हणून..
😭🤣🤣— मी सुहास (@cooltalks01) June 16, 2021
मोर्चा संपला असं वाटत असतानाच अचानक शिवसेना आणि भाजपचे कार्यकर्ते आमनेसामने आले. शिवसैनिकांनी भाजपच्या काही कार्यकर्त्यांना चोप दिला. त्यामुळे पोलिसांनी तात्काळ हस्तक्षेप करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी काही शिवसैनिकांची धरपकडही सुरू केली. आम्ही गाडी करून चाललो असताना शिवसैनिकांनी आम्हाला मारलं असा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.
* शिवसेनेने औरंगजेबी वृत्ती दाखवून दिली
भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांना पोलिसांच्या आडून मारहाण करून शिवसेनेने आपली औरंगजेबी वृत्ती दाखवून दिली असून, यापुढे शिवसेनेला लाथांनीच उत्तर मिळेल, असा इशारा भाजप नेते आशिष शेलार यांनी दिला आहे. मारहाण करणार्या शिवसैनिकांवर गुन्हे दाखल न झाल्यास यापुढे आंदोलन अधिक तीव्र होईल, असेही शेलार यांनी सांगितले.
रामको बदनाम ना करो ! #Ram #surajyadigital #Shivsena #भाजपा #सुराज्यडिजिटल #मारहाण #बदनाम
मुंबई : शिवसैनिकांनी पोलिसांच्या आडून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण करून आपली औरंगजेबी वृत्ती दाखवली – ॲड. आशिष शेलारhttps://t.co/px3JOsbc0g— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
सोनिया आणि वधेरा आता शिवसेनेचे देव झाले असून, साठे, तेंडुलकर हे शत्रू झाले आहेत, अशी घणाघाती टीका करताना ‘लातों के भूत बातोंसे नहीं मानते, यापुढे त्यांना लाथांनीच उत्तर मिळेल,’ असे शेलार म्हणाले.
राम मंदिर जमीन घोटाळा भाजपने केला, तो लपवायला भाजप आंदोलन करतेय आणि शिवसेना भवनासमोर आंदोलन करणार तर राडा तर होणारच.
#राम_मंदिर_घोटाला_BJP_का #राममंदिर_घोटाला #जय_श्रीराम— Siddhesh Yerunkar UBT ( सिद्धेश येरुणकर ) (@Siddheshyerunka) June 16, 2021
* बाळासाहेबांच्या रणरागिणी, एकेकाला फाडून काढलं असतं
शिवसेना भवनासमोर शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्याही होत्या. या महिला कार्यकर्त्यांचे नेतृत्व मुंबई महापालिकेच्या माजी महापौर श्रद्धा जाधव यांनी केले. सुरुवात आम्ही केली नाही. सुरुवात त्यांच्याकडून झाली. आम्ही शांतपणे सेना भवनजवळ असलेल्या पेट्रोलपंपावर उभे होतो. भाजपचे कार्यकर्ते सेनाभवनावर हल्ला करण्यासाठी सेना भवनात येत आहेत, अशी माहिती आम्हाला मिळाली.
…. आणि इथेच कोरोना चा अंत झाला….😢
शिवसेना-भाजप सेना भवन समोर#राडा @misadasarvankar @BJP4Maharashtra pic.twitter.com/M8ZJCbS86v
— Nivrutti Babar (@nivrutti_babar) June 16, 2021
आम्ही शांतपणे त्यांचा विरोध करत होतो. मात्र सुरुवात त्यांनी केली. त्यांच्या सुरुवातीमुळे हा सगळा प्रकार घडून आला. आम्ही आंदोलनाला नाही म्हटलंच नाही. त्यांनी आंदोलन केलं. आम्ही सेना भवनाचं रक्षण केलं. आम्ही त्यांच्यावर हल्ला केला नाही, अशी प्रतिक्रिया शिवसेनेच्या महिला आघाडीचं नेतृत्व करणाऱ्या श्रद्धा जाधव यांनी प्रतिक्रिया दिली. तसेच भाजपला यापुढेही असंच उत्तर देणार का? असं प्रश्न विचारला असता या बाळासाहेबांच्या रणरागिणी आहेत. त्यांच्यात हिंमत होती तर समोरासमोर यायचं होतं. एकेकाला फाडून काढलं असतं, अशी संतप्त प्रतिक्रिया एका महिला कार्यकर्त्याने दिली.
महापौर किशोरी पेडणेकर यांनी या प्रकाराचा संताप व्यक्त करीत शिवसेना भवन आमचं श्रद्धास्थान असून डिवचण्याचा प्रयत्न केल्यास चोख उत्तर दिले जाणार असल्याचे माध्यमांशी बोलताना म्हणाल्या.
मुंबई : सेनाभवन आमचं श्रद्धास्थान, त्याला डिवचण्याचा प्रयत्न केला तर चोख उत्तर मिळणारच : महापौर किशोरी पेडणेकर #Shivsena #भवन #mayer #mumbai #भाजपा #surajyadigital #सुराज्यडिजिटल #सेनाभवन #answers #श्रद्धास्थान #shraddhasthanhttps://t.co/1lhsfLkSOu
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021