उस्मानाबाद : महाराष्ट्रातील उस्मानाबादमध्ये फोन, टीव्ही, आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन जाणारा ट्रक पलटी झाला. यानंतर लोकांनी यातील अनेक वस्तूची लूट केली आहे. लोकांनी लुटलेल्या वस्तू परत मिळाव्यात म्हणून पोलिसांनी जवळच्या भागात शोध मोहीम सुरू केल्याचे एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. तसंच आम्ही आतापर्यंत लंपास केलेल्या वस्तूंपैकी 40% वस्तू मिळवण्यात यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले.
मोठा बँक घोटाळा, माजी आमदाराला अटक https://t.co/9ZCHnvlOZN
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
पोलिसांच्या आवाहनानंतर काही जणांनी वस्तू परत केल्या. त्यानंतर उर्वरित वस्तू शोधण्यासाठी पोलीस गावात हिंडू लागले. 70 लाखांच्या वस्तू लुबाडल्याचा दावा केला जात असून त्यापैकी सुदैवाने 40 टक्के वस्तू परत मिळाल्याची माहिती आहे. सर्च ऑपरेशन अजूनही सुरु असल्याचं वरिष्ठ पोलीस अधिकारी मोतीचंद राठोड यांनी सांगितलं.
अपघातानंतर मदतीला धावून जाणारे हात कमी, आणि त्यांना लुबाडणारे हात जास्त असल्याचं चित्र हल्ली अनेक वेळा पाहायला मिळतं.
माल वाहतूक करणाऱ्या ट्रकला अपघात झाला, तर मदतीऐवजी लूट होण्याच्या घटना समोर आल्या आहेत.
आंदोलन सुरूच राहणार, पुणे ते मंत्रालय लाँगमार्च शेवटचे अस्त्र – संभाजी छत्रपती, पंतप्रधानांनी ठरवलं तर मराठा आरक्षण मिळू शकतं – छत्रपती शाहू महाराजhttps://t.co/tcQwWuKja4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
नुकताच उस्मानाबादमध्ये ट्रक उलटून अपघात झाला. या ट्रकमधील मोबाईल फोन, एलईडी टीव्ही अशा 70 लाख रुपये किमतीच्या इलेक्ट्रिक उपकरणांची लूट झाल्याचा दावा केला जात आहे.
उस्मानाबाद ट्रक उलटल्यानंतर त्यातील इलेक्ट्रिक उपकरणांची लूट झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पादचारी आणि गावकऱ्यांनी तब्बल 70 लाख रुपये किमतीचा ऐवज चोरुन नेल्याचा दावा केला जात आहे. ही उपकरणं परत मिळवण्यासाठी पोलिसांची पथकं रवाना करण्यात आली.
कोल्हापूर मराठा आरक्षण आंदोलन – अपडेट्स #updates #कोल्हापूर #MarathaReservation #मराठा #आरक्षण pic.twitter.com/mnX6OZZ5nI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
सोमवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास सोलापूर-औरंगाबाद हायवेवर उस्मानाबादजवळ हा अपघात झाला होता. “ट्रकमध्ये मोबाईल फोन, कॉम्प्युटर, एलईडी टीव्ही, खेळणी अशी विद्युत उपकरणे होती. अपघातानंतर ती रस्त्यावर पडली, तेव्हा गावकऱ्यांची त्या वस्तू उचलण्यासाठी झुंबड उडाली. काही जणांनी कंटेनरचा दरवाजा उघडून वस्तू लांबवल्या. स्थानिक पोलीस आणि दंगल नियंत्रण पथकाला बोलवावं लागलं.” अशी माहिती ट्रक चालकाने दिली.
चिमुकल्या वेदिकाला मिळालं 16 कोटीचं इंजेक्शन https://t.co/zeYHCtF1yh
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021