नवी दिल्ली : सीबीएसई 12 वी निकालाचा फॉर्म्यूला ठरलाय. या निकाल प्रकरणी एका समितीनं सुप्रीम कोर्टाला आपला अहवाल सादर केला. 10 वीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण घेतले जातील, तसेच, 11 वीच्या 5 विषयांचे सरासरी गुण घेतले जातील आणि 12 वी पूर्व बोर्ड परीक्षा आणि प्रॅक्टिकलचे गुण घेतले जाईल. 10 वीचे 30% गुण, 11 वीच्या गुणातील 30% आणि 12 वी च्या 40% गुणांवर आधारित निकाल ठरेल. 30:30:40 असा हा फॉर्म्युला आहे.
प्रेग्नंट नीना गुप्तांना 'या' अभिनेत्याने घातली होती लग्नाची मागणी https://t.co/oClO8HIkyG
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 16, 2021
31 जुलैला निकाल जाहीर होईल. तसंच दहावीच्या 5 विषयांपैकी 3 विषयांचे सर्वोत्कृष्ट गुण घेतले जातील, त्याचप्रमाणे अकरावीच्या पाच विषयांचे सरासरी गुण घेतले जातील आणि 12 वी पूर्व बोर्ड परीक्षा आणि प्रॅक्टिकलचे गुणे घेतले जाईल. दहावीचे 30% गुण, अकरावीच्या गुणातील 30% आणि 12 वी च्या 40% गुणांवर आधारित निकाल लावण्यात येतील.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
स्मृतीदिन …राजमाता जिजाऊंना मानाचा मुजरा ! #surajyadigital #जिजाऊ #राजमाता #मुजरा #सुराज्यडिजिटल #स्मृतिदिन pic.twitter.com/c1h4O7LIZu
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
सीबीएसई 12 वी निकाल प्रकरणी नियुक्त केलेली 13 सदस्यीय समितीनं गुरुवारी सुप्रीम कोर्टाला आपला अहवाल सादर केला आहे. या समितीनं मार्कशीट तयार करण्यावर अहवाल तयार केला आहे. सादर केलेल्या अहवालानुसार, बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यांकन निकषांची शिफारस करण्यासाठी 30:30:40 फॉर्म्युलाचा बाजूनं आहे. म्हणजेच दहावी आणि अकरावीच्या अंतिम निकालास 30% वेटेज दिले जाईल. इयत्ता 12 वीच्या पूर्व बोर्ड परीक्षेला 40% वेटेज दिले जाईल, हे सूत्र निकालाचे असणार आहे.
CBSE told the Supreme Court that the Class XII results will be decided on the basis of performance in Class 10 (30% weightage), Class 11 (30% weightage) & Class 12 (40% weightage). https://t.co/EYCaCWZpi4
— ANI (@ANI) June 17, 2021
सीबीएसईने स्पष्ट केलं की, बारावीचा अंतिम निकाल दहावी, अकरावी आणि बारावीच्या पूर्व बोर्डच्या निकालाच्या आधारावर तयार केला जाईल. तसंच ज्या मुलांना परीक्षा द्यावयाची आहे त्यांच्यासाठी नंतर स्वतंत्र व्यवस्था केली जाईल.
दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती, केंद्र सरकारच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह https://t.co/UTo5CWPnwM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021