नवी दिल्ली : अनेकदा ट्वीटरवरील सेलीब्रेटींचे किंवा युजर्सचे फॉलोवर्स अचानक कमी होताना दिसतात. यामागचं कारण स्वत: ट्विटरनेच सांगितलं आहे. अचानक फॉलोवर्स कमी होण्यामागे ट्विटरने स्पॅम प्रोफाईल हटवणं हे कारण सांगितलं आहे. स्पॅम रोखण्यासाठी आणि सर्व अकाउंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितपणे असं केलं जातं. ऑफलाईन प्रोजेक्ट करणारे किंवा तात्पुरते ईमेल आयडीसह तयार केलेली ट्रोलींग अकाउंट्सची ट्विटर नेहमी तपासणी करतं.
दोन डोसमधील अंतर दुप्पट करण्याची शिफारस केलीच नव्हती, केंद्र सरकारच्या निर्णयावर आता प्रश्नचिन्ह https://t.co/UTo5CWPnwM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
गेल्या वर्षी ट्विटरने बहुतेक देशांमध्ये एसएमएस सेवेद्वारे ट्विटर बंद करण्याचा निर्णय घेतला होता. याच दरम्यान ही सेवा हटवल्यामुळे काही युजर्सला आपल्या फॉलोवर्समध्ये कमी आल्याचं पाहायला मिळालं. अशी निष्क्रिय अकाउंट्स काढून टाकल्यास वापरकर्त्यांच्या ट्विटर प्रोफाईलवर अधिक सक्रिय आणि प्रामाणिक फॉलोवर्स राहतील, असं कंपनीने म्हटलं आहे.
जपानमध्ये बौद्ध देवीच्या 57 मीटर उंच पुतळ्यावर लावला 35 किलोचा मास्क #mask #budha #japan #मास्क #surajyadigital #सुराज्यडिजिटल #बुद्ध #बौद्ध #देवी pic.twitter.com/U4MnfVFA9X
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बॉलिवूड अभिनेते अनुपम खेर यांनी ट्विटरवर त्यांचे जवळपास 80 हजार फॉलोवर्स केवळ 36 तासांत कमी झाल्याचा दावा केला आहे. 2018 मध्ये बिग बी, अमिताभ बच्चन यांनीही त्यांचे फॉलोवर्स अचानक कमी झाल्याचं म्हटलं होतं. ही सेलिब्रिटींची गोष्ट झाली, परंतु तुम्हालाही वाटतंय तुमचेही ट्विटर अकाउंटचे फॉलोवर्स अशाप्रकारे कमी झाले आहेत, तर यामागे एक कारण आहे. यामागचं कारण स्वत: ट्विटरनेच सांगितलं आहे. गेल्या काही दिवसांपासून अनेक युजर्सनी त्यांचे फॉलोवर्स अचानक कमी होत असल्याची तक्रार केली.
बार्शीच्या तरुणाने शोधला इन्स्टाग्रामचा बग; फेसबुकने जाहिर केले 'इतके' लाख https://t.co/1CJaaNK0xQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021
अचानक फॉलोवर्स कमी होण्यामागे ट्विटरने स्पॅम प्रोफाईल हटवणं हे कारण सांगितलं आहे. एका पोस्टमध्ये ट्विटरने सांगितलं, की कंपनी अकाउंट्सला पासवर्ड किंवा फोन नंबरने वेरिफाय करण्यासाठी सांगते. स्पॅम रोखण्यासाठी आणि सर्व अकाउंट्स सुरक्षित ठेवण्यासाठी नियमितपणे असं केलं जातं. याचा अर्थ असा, की ट्विटर अशा खात्यांची तपासणी करतं, जे एकतर ऑफलाईन प्रोजेक्ट करतात किंवा तात्पुरते ईमेल आयडीसह तयार केलेली ट्रोल अकाउंट्स म्हणून कार्य करतात.
सीबीएसई 12 वी निकाल, असा आहे 30:30:40 हा फॉर्म्युला, 31 जुलैला होईल निकाल जाहीर https://t.co/6GTNLxz77y
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 17, 2021