सोलापूर : महानगरपालिकेच्या आजच्या सभेत पूर्वी घडलं नाही असं धक्कादायक राजकारण घडलं आहे. भारतीय जनता पार्टीची सत्ता पालिकेत आहे, याच सभागृहातील जेष्ठ भाजपा नगरसेवक सुरेश पाटील यांना बेशिस्तवर्तनाचा ठपका ठेवून एकमुखानं सभागृहातून दिवसासाठी निलंबीत करण्यात आलं.
शेतमजुराच्या मुलाची इस्रोमध्ये शास्त्रज्ञ म्हणून निवड https://t.co/sDpxPI3Fj6
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
विरोधी पक्षाच्या नगरसेवकांनी सुरेश पाटील यांच्या विरोधात भूमिका घेतलीच पण त्यापेक्षा आक्रमक भूमिका सभागृहातील भाजपा सदस्यांनी घेतली. घोंगडेवस्ती येथील नाल्यावरील झोपड्या अलिकडेच पालिकेनं काढल्या आहेत. कालपासून पालिकेत या भागातील नागरिक आणि काही नगरसेवक प्रशासनाविरोधात आक्रमक आहेत. हे पाडापाडीचं राजकारण भाजपामधील अंतर्गत गटबाजीतून जाणीवपूर्वक घडविण्यात आलायं. प्रशासनानं याला साथ दिली, असा आरोप काँग्रेसच चेतन नरोटे यांनी केला.
बार्शीचे आमदार राजेंद्र राऊत यांनी बोलता – बोलता केले गावरान भाषेत अनेक आरोप #surajyadigital #Barshi #सुराज्यडिजिटल #आरोप #बार्शी #MLA #rajendraraut #राजेंद्र #राऊतhttps://t.co/nHm0GLn0hk
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
यावेळी भाजपाचे सदस्य आक्रमक झाले, त्यांनी आरोप फेटाळले. ही पक्षाची भूमिका नाही असं सांगत सारं प्रकरण सुरेश पाटील यांच्या भोवती केेंद्रीत झालं. यावेळी रागातच सुरेश पाटील यांनी महापौरांच्या निषेधाच्या घोषणा दिल्या. तसेच जातीयवाद करत असल्याचा आरोप केला.
एमआयएमचे रियाज खरादी यांच्यासह काही सदस्यांनी महापौरांचा अपमान करणार्यांना निलंबीत करा, अशी मागणी कली. याला भाजपासह सर्वच सदस्यांनी पाठिंबा दिला आणि महापौरांनी एक दिवसासाठी सुरेश पाटील यांना निलंबीत केलं. प्रशासनानं लगेचच पोलीस बोलावून सुरेश पाटील यांना सभागृहाबाहेर पाठविलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मोदीच नंबर वन ! १३ देशांच्या नेत्यांवर मात करुन आघाडीवर https://t.co/4UbWNZrPGD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
सुरेश पाटील यांनी महापौरासमोरचा माईक हिसकावून घेतला. डायसवर हाताच्या मुठी बडवत त्यांनी संताप व्यक्त करत होते. महापौर पाटील यांना शांत करण्याचा प्रयत्न करीत होते. परंतु ते ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. महापौरावर त्यांनी जातीयवादाचा आरोप केला. विरोधी पक्षातील सदस्यांनी निलंबनाची मागणी लावून धरली महापौरांनी गोंधळातच सुरेश पाटील यांना निलंबित केल्याचे जाहीर केले आणि पोलिस बंदोबस्तात सभागृहाच्या बाहेर पाठवले.
दाभाडकरांना घरी नेण्याचा निर्णय नातेवाईकांचा, संघाची प्रतिमा संवर्धनासाठी मृत्यूचा वापर https://t.co/h6oBPcHHip
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
अतिरिक्त आयुक्त विजय खोराटे, नगर अभियंता संदीप कारंजे यांनी अतिक्रमण काढण्यामागची भूमिका स्पष्ट केली. महापौरांच्या डायस समोर सर्व विरोधी पक्षाचे सदस्य एकत्र आले. गोंधळ घोषणाबाजी सर्वत्र तब्बल वीस पंचवीस मिनिट गोंधळ चालू होता. त्या गोंधळातच महापौरांनी निलंबनाची कारवाई केली. सत्ताधारी पक्षाचे नगरसेवक या वेळी मात्र बघ्याची भूमिका घेताना दिसून आलं.
* कारवाईवर तीव्र नाराजी
शिवसेनेचे महेश कोठे, वंचित बहुजन आघाडीचे आनंद चंदनशिवे, काँग्रेसचे यु. एन. बेरिया, चेतन नरोटे, भाजपच्या अंबिका पाटील, एमआयएमचे रियाज खरादी, श्रीदेवी फुलारी इत्यादी सदस्यांनी प्रशासनाने केलेल्या या कारवाईवर तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रशासनाच्या या निर्दयीपणावर नगरसेवकांनी आसूड ओढले. बेघर केलेल्या या सर्व कुटुंबांना पुन्हा घरे बांधून द्या, अशी मागणी त्यांनी केली. नगरसेवक पद गेले तरी बेहत्तर परंतु गरिबांवर अन्याय होऊ देणार नाही, असा आक्रमक पवित्रा महेश कोठे यांनी घेतला.
* भाजप नगरसेवकांनी घेतली हरकत
झोपडपट्टीतील अतिक्रमण काढू नये असा शासनाचा आदेश असताना महापालिका प्रशासनाने कुणाच्या सांगण्यावरून हे कारस्थान केले असा प्रश्न बेरिया यांनी उपस्थित केला. महापालिकेला घोषित झोपडपट्टीतील अतिक्रमण काढता येत नाही, कारण तेथे राहणारे लोक हेच भोगवटदार असतात. शासनाने झोपडपट्टीधारकांना संरक्षण दिले असताना महापालिका चुकीची कारवाई करीत आहे अशी टीका चंदनशिवे यांनी केली. सत्ताधारी भाजपचा प्रशासनावर अंकुश नसल्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रत्येकाला घर देण्याची घोषणा करीत आहेत आणि त्यांच्याच पक्षाचे लोक इथे गरिबांची घरे पाडण्याचे काम करीत आहेत अशी टीका नरोटे यांनी केली. या विधानाला भाजपा सदस्यांनी हरकत घेतली.