साउदम्प्टन : पहिल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलसाठी अवघे काही तास शिल्लक आहेत. दोन्ही संघातील खेळाडू आणि संपूर्ण क्रिकेट विश्व या लढतीची वाट पाहत आहे. अशातच या लढतीच्या पहिल्या दिवशी काय चित्र असेल याचे अपडेट दोघा भारतीय खेळाडूंनी दिले आहेत.
दुर्दैवाने पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला आहे,’ असे बीसीसीआयने ट्विट करत माहिती दिली.
UPDATE – Unfortunately, play on Day 1 has been called off due to rains. 10.30 AM local time start tomorrow.#WTC21
— BCCI (@BCCI) June 18, 2021
भारत विरुद्ध न्यूझीलंड यांच्यातला वर्ल्ड टेस्ट चॅम्पिअनशीपच्या अंतिम सामन्याचा पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. सकाळपासून साऊदम्प्टनमध्ये पावसाने हजेरी लावल्यामुळे पहिल्या सत्राचा खेळ वाया गेला. यानंतर पावसाने उसंत घेतली परंतू खेळपट्टी आणि मैदान पूर्ववत करणं अशक्य असल्यामुळे अंपायरनी पहिल्या दिवसाचा खेळ रद्द केला.
The wait continues 🌧️ #WTC21 Final pic.twitter.com/kNJofd2RfK
— BCCI (@BCCI) June 18, 2021
दरम्यान आयसीसीने अंतिम सामन्याच्या प्लेइंग कंडीशन आणि नियमांची घोषणा करताना पावसामुळे दिवसाचा खेळ वाया गेल्यास एक दिवस राखून ठेवला आहे. दरम्यान साऊदम्प्टनमध्ये पुढील ४-५ दिवस पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे हा खेळ सहाव्या दिवसावर येऊन ठेपणार आहे. सामना रिझर्व्ह डे मध्ये खेळवायचा की नाही याचा निर्णय सामनाधिकारी घेणार असून ते प्रत्येक दिवसाच्या अखेरीस किती तास वाया गेले याचा अंदाज घेतली. रिझर्व्ह डे बद्दलचा निर्णय हा पाचव्या दिवशी घेतला जाणार आहे. जर यानंतरही सामना अनिर्णित राहिला तर भारत आणि न्यूझीलंड यांना संयुक्त विजेतेपद बहाल करण्यात येईल.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
WTC फायनल ब्रेकिंग- पहिलं सत्र रद्द, बीसीसीआयची मोठी घोषणा #BCCI #WTCFinal #WTC21 #surajyadigital #cricket #सुराज्यडिजिटल #Declaration pic.twitter.com/qpYj2IqF0V
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा फायनल मुकाबला आज (शुक्रवार) खेळला जाणार आहे. परंतू येथे काही वेळापुर्वी पावसाने हजेरी लावली. नंतर पंचांनी मैदानात उतरून पाहणी केली. त्यानंतर पहिल्या दिवसातील पहिल्या सत्राचा खेळ रद्द करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे. याबरोबरच नाणेफेक उशिरा होणार असल्याचे सांगितले जात आहे.
इंग्लंडमधील साऊथॅम्प्टन हॅम्पशायर बाऊलच्या क्रिकेट ग्राऊंडवर भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशीपचा अंतिम सामना खेळविला जाणार आहे.
डब्ल्यूटीसी फायनल – आज मुकाबला, असा आहे भारताचा संघ #WTCFinal #डब्ल्यूटीसी #संघ #final #मुकाबला #indianteam #सुराज्यडिजिटल #surajyadigital pic.twitter.com/P5otUDABsq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 18, 2021
भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील लढत आज (१८ जून )पासून सुरु होणार होती. ही लढत सुरू होण्याच्या आधीच एक काळजी व्यक्त केली जात होती ती म्हणजे पावसाची. झाले ही तसेच पावसाचे आगमन झाले. हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार पुढील पाच दिवस साउदम्प्टन येथे जोरदार पावसाची शक्यता आहे. त्यामुळे पहिल्या दिवसातील पहिल्या सत्राचा खेळ रद्द करण्यात आल्याची माहिती बीसीसीआयने दिली आहे.