सोलापूर / सांगली : राज्य शासनाने पायी वारीला परवानगी नाकारल्याने आमदार गोपीचंद पडळकर यांनी टीका केली आहे. राज्य शासन वारकऱ्यांच्या बैठका घेत त्यांना झुलवत ठेवत आहे. बार, दारु मालकांचे धंदे सुरु करताना सरकारने अशा बैठका घेतल्या होत्या का? हे वसुली सरकार महापुरुषांच्या जयंत्या, पुण्यतिथी, हिंदू सण-समारंभावेळीच कोरोनाचे निमित्त काढते आहे. बहुजनांच्या भावनांच्या विरोधात जात सरकारने परवानगी नाकारली, असं त्यांनी म्हटलं आहे.
WTC – न्यूझीलंडने टॉस जिंकला, भारताची प्रथम फलंदाजी, विराटने धोनीचा मोडला पराक्रम, रोहितचा मोठा पराक्रम #WTC21 #wtc #surajyadigital #सुराज्यडिजिटल #NewZealand #indian #भारत #cricket pic.twitter.com/zMF4Ecr1Gp
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021
एकीकडे राज्यावर कोरोनाचे संकट ओढावलेले असतानाच दुसरीकडे वारकरी संप्रदायाचा आग्रह असूनही यंदा पायी वारी नाही अशी ठाम भूमिका राज्य सरकारने घेतली आहे. असे असताना आता मोजक्या वारकऱ्यांसह 3 जुलै रोजी आळंदी येथून पायी वारीला सुरुवात होणार असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपणही यात एक दिवस सहभागी होणार असल्याचे वक्तव्य केल्यामुळे वारकरी संप्रदायात संभ्रम वाढला आहे.
“देशान स्विकारलंय; मोदींनंतर ठाकरे हाच राष्ट्रीय ब्रँड" https://t.co/0MWMh3sgUQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021
राज्यातील सरकार दारू दुकाने सुरु करताना बैठक घेत नाही, बार सुरु करताना बैठक घेत नाही. बहुजन समाजाची शेकडो वर्षाच्या वारी परंपरेसाठी सारख्या बैठक घेते आणि शेवटी परवानगी नाकारते अशा शब्दात राज्यातील ठाकरे सरकारला निशाणा करीत वारी व्हावी म्हणुन छत्रपती संभाजी महाराजांनी वारीला औरंगजेबाच्या काळात सरंक्षण दिले होते.
हे सोनिया सेनेचे अध्यक्ष नाव महाराजांचे घेतात, काम मात्र औरंगजेबाचे करतात, असा टोला लगावला.
डिझेलचा टँकर झाला पलटी; डिझेलसाठी लोकांची झाली गर्दी, डिझेल गोळा करण्यासाठी ड्रम, कॅन
घेऊन धावपळ
https://t.co/oUMbGHXRna— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021
कोरोनाचे सर्व नियम पाळून शिस्तीने पायी वारीसाठी वारकरी तयार असतानासुद्धा हे ठाकरे सरकार कुणाच्या दबावाखाली या शेकडो वर्ष चालत आलेल्या हिंदू परंपरेत ख्वाडा घालत आहे? असा सवाल करत काही वारकरी 3 जुलै रोजी आळंदी येथून पायी वारीला सुरुवात करणार आहे. आपणही एक दिवस यात सामील होणार असल्याचे सांगताना आळंदी ते पंढरपूर निघणाऱ्या माझी वारी माझी जबाबदारी यात सहभागी होणार असा संदेश सोशल मीडियातून गोपीचंद पडळकर यांनी दिला आहे.
* रोहित पवार हे शरद पवारांचे सुधारित व्हर्जन
आमदार पडळकर यांनी कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या कामगिरीवर टीका करतानाच ते शरद पवारांचे सुधारित व्हर्जन असून शरद पवारांप्रमाणेच ते पुढील पिढयांना मातीत घालवतील असा घणाघात केला आहे. पडळकर आज कर्जतच्या दौऱ्यावर होते. श्रीगोंदा, कर्जतला हक्काचं पाणी मिळवून देण्यात अपयश आलेले रोहित पवार हे कामात कधीकधी तर क्षेय घेण्यात मात्र सर्वात आधी असतात, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
तसेच ‘रोहित पवार हे शरद पवार यांचं सुधारित व्हर्जन आहे. गेल्या पाच पिढ्यांची शरद पवारांनी माती केली. आता पुढच्या पाच पिढ्यांची रोहित पवारांमुळे माती होईल,’ असा आरोप पडळकरांनी केला आहे. आता पडळकरांनी केलेल्या टीकेला रास्त्रवडीचे नेते काय उत्तर देतात हे पाहावे लागणार आहे.
राज्यात पावसाचा जोर वाढला; कोल्हापूर सांगलीला पुराचा धोका https://t.co/UPBX7l94Ug
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021