पुणे : कोरोनामुळे बारावीच्या परीक्षा रद्द करण्यात आल्या. त्यानंतर आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्याची माहिती आहे. त्यातच आज (रविवार) महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बारावी निकालासंदर्भात फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे.
डिझेलचा टँकर झाला पलटी; डिझेलसाठी लोकांची झाली गर्दी, डिझेल गोळा करण्यासाठी ड्रम, कॅन
घेऊन धावपळ
https://t.co/oUMbGHXRna— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021
महाराष्ट्र सरकारनं कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बारावीच्या परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून बारावीचा निकाल जाहीर करण्यासाठीचा फॉर्म्युला अंतिम टप्प्यात असल्यची माहिती आहे. शिक्षण मंडळाकडून रविवारी म्हणजेच 20 जूनला महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बारावी बोर्ड परीक्षांचा निकाल जाहीर करण्याचा फॉर्म्युला जाहीर होण्याची शक्यता असल्याची माहिती आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत बारावी निकालासंदर्भात फॉर्म्युला ठरण्याची शक्यता आहे. बारावीच्या विद्यार्थ्यांचं नेमकं मुल्यांकन कसं करायचं यासाठी यापूर्वी राज्य मंडळाच्या बैठका झाल्या. उद्या उच्च पदस्थ अधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आलीय. त्या बैठकीत फॉर्म्युल्यावर अंतिम निर्णय होईल.
राज्य सरकार वारकऱ्यांना झुलवत ठेवतंय, रोहित पवार हे शरद पवारांचे सुधारित व्हर्जन – गोपीचंद पडळकर https://t.co/d3kwoSWUum
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021
बारावी निकालासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार अकरावी परीक्षेच्या गुणांना सर्वाधिक वेटेज दिलं जाणार असल्याची माहिती आहे. बारावी निकाल जाहीर करण्यासाठी दहावीच्या निकालासाठी जे सूत्र अवलंबण्यात आलं त्यानुसार फॉर्म्युला अंतिम केला जाणार असल्याची माहिती आहे.
“देशान स्विकारलंय; मोदींनंतर ठाकरे हाच राष्ट्रीय ब्रँड" https://t.co/0MWMh3sgUQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 19, 2021