मुंबई : उत्तर प्रदेशातील मिर्झापूर येथे असलेल्या विंध्यवासिनी देवीच्या मंदिरात जाऊन दर्शन घेण्यावरून पोलिस आणि अभिनेता अमिताभ बच्चन यांचे पुजारी यांच्यात वाद झाला. या वादानंतर पोलिसांनी पुजा-याला चोप दिला. यामुळे येथील पुजारी नाराज झाले आहेत. मारहाण केल्याच्या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर खूपच व्हायरल झाला आहे.
विरोधी पक्षाची उद्या सर्वात मोठी बैठक, राष्ट्रमंच नावानं नवी आघाडी, राष्ट्रपती निवडणुकीसाठी पवारांची दिल्लीवारी
https://t.co/ByywQV7hxJ— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
रविवारी कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने विंध्यवासिनी देवीचे मंदिर दर्शासाठी बंद असते. परंतु चंदौलीचे जिल्हा न्यायमूर्ती आणि त्यांचे कुटुंबाला देवीचे दर्शन घ्यायचे होते. त्यामुळे पोलिसांनी मंदिर उघडले. मंदिर उघडल्यानंतर अमिताभ बच्चन यांचे पुजा-यांनी देखील त्यांच्याकडे आलेल्या यजमान भाविकांना घेऊन दर्शनासाठी देवळात आले. त्यावेळी पोलिसांनी पुजारी आणि त्यांच्यासोबत आलेल्यांना अडवले. त्यावेळी त्यांचा वाद झाला आणि पोलिसांनी पुजा-याला मारहाण केली.
शिवसेनेत दोन गट, एक राष्ट्रवादीसोबत दुसरा भाजपसोबत; मोठा गौप्यस्फोट https://t.co/RMkfX8MMUM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
या घटनेनंतर मारहाण झालेले पुजारी अमित पांडे यांच्या भावाने सांगितले की, पोलिस अनेकदा अशा प्रकारे वागतात. त्यांच्याविरोधात तक्रार करायला गेलेल्या पुजा-यांनाच खोट्या गुन्ह्यांमध्ये अडकवतात. मारहाण झालेले पुजारी हे अमिताभ बच्चन यांच्यासह काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांच्या परिवाराचेही पुजारी आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
योग दिवस स्पेशल : मराठमोळ्या अभिनेत्रीनं सर्वांचंच लक्ष वेधलं https://t.co/mcoiD0Gj2u
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
दरम्यान, उत्तर प्रदेश सरकारने कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेअंतर्गत शनिवारी आणि रविवारी विंध्यवासिनी देवीचे मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे. इतर दिवशीही सर्वसामान्य लोकांसाठीही देखील दर्शन घेण्यास मनाई आहे. मंदिरातील पुजा-यांनाच केवळ आत प्रवेश करण्यास परवानगी आहे.
https://twitter.com/pandeyshiviani/status/1406594573019668483?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1406594573019668483%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Ftelegram.org%2Fembed
* पोलिस प्रशासनाचे म्हणणे
जिल्ह्याचे अप्पर पोलिस अधिक संजय वर्मा यांनी सांगितले की, चंदौलीचे जिल्हा न्यायाधीश आणि त्यांच्या कुटुंबातील इतर सदस्यांनाही देवीचे दर्शन घेऊ दिले नाही. एका पुजा-याने देवीचे दर्शन घडवून आणले. परंतु तेव्हा अमित पांडे त्यांच्या यजमान भाविकांना घेऊन देवीच्या दर्शनासाठी नेते होते, तेव्हा पोलिसांनी त्यांना अडवले. त्यावरून पोलिस आणि पांडे यांच्यात वाद झाला. याप्रकरणी तपास लवकरच सुरू केला जाईल.
तोकडे कपडे घालाल तर पुरुषांवर परिणाम होणारच – इम्रान खान https://t.co/nLrfKJJdh4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021