मुंबई : भारत आणि इंग्लंड महिला टीममध्ये खेळण्यात आलेला कसोटी सामना अनिर्णित राहिला. या सामन्यानंतर भारतीय क्रिकेटपटू स्मृती मनधनाचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर स्मृती ही बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षा सुंदर आहे. तिला यासाठी कोणतंही सौंदर्य प्रसाधन वापरण्याची गरज नाही, असं नेटिझन्सनी म्हटलं. त्यानंतर अनेकांनी तिचे वेगवेगळे फोटो शेअर केले.
भारतीय पुरुष संघ न्यूझीलंड विरुद्ध जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेचा अंतिम सामना खेळत आहे. तर तिथेच दुसरीकडे सात वर्षांनंतर कसोटी क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या भारतीय महिला क्रिकेट संघाला इंग्लंड विरुद्धचा कसोटी सामना अनिर्णित राखण्यात यश आले.
आंतरराष्ट्रीय योग दिवस, दररोज करा योग, व्हा सुंदर आणि तंदुरुस्त #सुराज्यडिजिटल #surajyadigital #तंदुरुस्त #yoga #yogaday #internationalyogaday2021 pic.twitter.com/VqgcMe2FrD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
या संघात अनेक नवीन खेळाडूंनी कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. या चुरशीच्या सामन्यानंतर भारतीय संघाची सलामीवीर फलंदाज स्म्रीती मंधाना ही चर्चेत आली आहे. पण ही चर्चा मोठ्या खेळीमुळे नसून तिच्या लूक्समुळे रंगली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
WTC टीम इंडिया 217 धावांवर ऑल आऊट https://t.co/0n9R4pQI2l
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021
स्मृती मनधनाने इंग्लंड विरुद्धच्या सामन्यात पहिल्या डावात ७८ धावा केल्या होत्या तर दुसऱ्या डावात तिला फक्त ८ धावा करण्यात यश आले.या सामन्यादरम्यानचे तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. चाहते तिच्या लूक्सची प्रशंसा करताना थांबत नाहीत. एका चाहत्याने तिला ‘बॉलीवूड अभिनेत्रीपेक्षा अधिक सुंदर’ असल्याचे सांगितले आहे. अनेक चाहत्यांनी तिच्या लूक्सची वेगवेगळ्या पद्धतीने प्रशंसा केली आहे.
या सामन्यात इंग्लंड महिला संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. पहिल्या डावात इंग्लंड संघाने ३९६ धावांचा मोठा डोंगर उभारला. त्यांनी ३९६/९ या धावसंख्येवर आपला डाव घोषित केला होता. भारतीय महिला संघ पहिल्या डावात २३१ धावा करत सर्वबाद झाला होता. पहिल्या डावात शेफाली वर्मा आणि स्म्रीती मंधानाने अर्धशतकी खेळी केली होती. स्म्रीतीने ७८ तर शेफालीने ९६ धावांची खेळी केली होती.
निर्जला एकादशी, विठूमाऊलीच्या नामघोषाने पंढरी दुमदुमली
पंढरपूर : लॉकडाऊनच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर अवघी पंढरी आज विठूमाऊलीच्या नामघोषाने दुमदुमली…कोरोनामुळे अवघी पंढरी सुनीसुनी झाली होती. (बजरंग नागणे) #surajyadigital #pandharpur #पंढरपूर #सुराज्यडिजिटल #LockDown pic.twitter.com/wvtCFaWJa1— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
भारतीय संघाच्या दुसऱ्या डावात भारताकडून शेफालीने ८३ चेंडूत ६३ धावांची खेळी केली आणि दिप्ती शर्माने १६८ चेंडूत ५४ धावांचे योगदान दिले. भारतीय संघाकडून पदार्पण करणारी स्नेहा राणाने १५४ चेंडूत नाबाद ८० धावांची खेळी केली. त्यात १३ चौकारांचा समावेश होता. भारतीय संघाला हा सामना अनिर्णित करण्यात यश आले. या सामन्याची सामनावीर म्हणून आपल्या फलंदाजीने इंग्लंडच्या गोलंदाजीची तोडफोड करणारी शेफाली वर्माला निवडण्यात आले.
शरद पवारांबाबत मोठी बातमी, दिल्लीवारीमुळे चर्चांना उधाण https://t.co/BrqFvXXnVa
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021