पुणे : पुणे विद्यापीठात योग शिक्षणातील मूलभूत माहिती देणारा ‘बेसिक्स ऑफ योगा’ या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सुरुवात झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ शिक्षणाबरोबरच शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी हा योग अभ्यास उपयुक्त ठरेल. 60 तासांचा हा ऑनलाईन अभ्यासक्रम यशस्वी रित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट मिळणार आहेत.
शिवसेनेत दोन गट, एक राष्ट्रवादीसोबत दुसरा भाजपसोबत; मोठा गौप्यस्फोट https://t.co/RMkfX8MMUM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
योग शिक्षणातील मूलभूत माहिती देणारा ‘बेसिक्स ऑफ योगा’ या ऑनलाईन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात यंदाच्या शैक्षणिक वर्षांपासून सुरुवात झाली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात योग दिवसाचे औचित्य साधत या अभ्यासक्रमाची घोषणा विद्यापीठाचे कुलगुरू प्रा.डॉ. नितीन करमळकर यांनी केली. यावेळी प्र-कुलगुरू डॉ. एन.एस.उमराणी, आयुष मंत्रालयातील संशोधन शास्त्रज्ञ डॉ. भूषण पटवर्धन, आंतरराष्ट्रीय योगगुरू डॉ. संप्रसाद विनोद उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; थेट मुलाखत घेऊन निवड #surajyadigital #bank #BANKOFINDIA #मुलाखत #सुराज्यडिजिटल #opportunity #नोकरी pic.twitter.com/PzFG0k0ohT
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
नवीन शैक्षणिक धोरणाला अनुसरून व पारंपरिक ज्ञान आणि वैद्यकीय शास्त्र यांची सांगड घालत हा अभ्यासक्रम तयार केला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना त्यांच्या मूळ शिक्षणाबरोबरच शरीर आणि मन निरोगी ठेवण्यासाठी हा योग अभ्यास उपयुक्त ठरेल. असेही करमळकर यांनी सांगितले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, एम. योगा ॲपची घोषणा https://t.co/emKNW5HK0u
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
डॉ.अपूर्वा पालकर म्हणाल्या, हा अभ्यासक्रम योग विषयातील मूलभूत गोष्टींची माहिती देणारा संपूर्णपणे ऑनलाईन अभ्यासक्रम आहे. या शैक्षणिक वर्षांपासून विद्यार्थी यासाठी अर्ज करू शकतील. ६० तासांचा हा अभ्यासक्रम यशस्वी रित्या पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांना दोन क्रेडिट मिळणार आहेत.
आंतरराष्ट्रीय योग दिवस, दररोज करा योग, व्हा सुंदर आणि तंदुरुस्त #सुराज्यडिजिटल #surajyadigital #तंदुरुस्त #yoga #yogaday #internationalyogaday2021 pic.twitter.com/VqgcMe2FrD
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
मन, शरीर व भावना यांच्यात समतोल साधायचा असेल तर योग आवश्यक आहे. स्वतःला ओळखून आपण आहोत तसे स्वीकारण्याची शक्ती ही योग साधनेतून मिळते तसेच शिकण्याचा आनंद जागृतही ठेवता येतो, असेही म्हणाले आहेत.
योग दिवस स्पेशल : मराठमोळ्या अभिनेत्रीनं सर्वांचंच लक्ष वेधलं https://t.co/mcoiD0Gj2u
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021