मुंबई : शिवसेनेत सध्या दोन गट तयार झाल्याचा गौप्यस्फोट सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी केला. एक गट मिलिंद नार्वेकरांचा तर दुसरा गट संजय राऊतांचा आहे. संजय राऊतांना शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत राहावे, असे वाटते तर नार्वेकरांना शिवसेनेने भाजपासोबत जावे असे वाटते आहे. कोणतीही विचारधारा आणि तत्व नाहीत. राजकारण पाहता शिवसेना-भाजपा पुन्हा एकत्र येण्याची चिन्हे दिसत आहेत, असेही त्या म्हणाल्या.
पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा, एम. योगा ॲपची घोषणा https://t.co/emKNW5HK0u
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
प्रताप सरनाईक लेटरबॉम्बवर सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. प्रताप सरनाईक यांनी लिहिलेल्या पत्राची लिंक पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या भेटीत आहे, असा दावा अंजली दमानिया यांनी केला आहे. त्यामुळे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
शिवसेना नेत्याचा लेटरबॉम्ब; तुटण्याआधी भाजपशी जुळवून घेण्याचे आवाहन https://t.co/iIDYRWAct6
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 20, 2021
अंजली दमानिया यांनी एका इलेक्ट्रॉनिक माध्यमाशी बोलताना हा दावा केला आहे. डिजिटल विश्वात कोणी पत्रं लिहितं का? आपण व्हॉट्सअॅप वापरतो, फोन करतो, मेसेज करतो. मात्र, पत्रं लिहिलं जातयं आणि ते मीडियात येतंय हे हस्यास्पद आहे. या पत्रात दोन मुद्दे आहेत. एक म्हणजे शिवसेनेचा छळ केला जातोय आणि दुसरा मुद्दा म्हणजे शिवसेना-भाजपची विचारांची जवळीक होती हा आहे. या पत्राचे तार थेट मोदी-ठाकरे भेटीशी संबंधित आहेत, असा दावा करतानाच मोदींबरोबर भेट घेतल्यानंतर उद्धव ठाकरेंची देहबोली बदलली आहे. ते भाजपवर तीव्र शब्दात टीका करताना दिसत नाहीत, असं त्यांनी स्पष्ट केलं.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
काय गंमत आहे पहा,
जे सरनाईक आपल्या नेत्याशी (ठाकरेंशी) फोन वर किंवा whatsapp वर सहज बोलू शकतात, ते या डिजिटल काळात पत्र लिहितात. हे तुम्हाला पटतय का? त्यात, ते पत्र मीडिया मध्ये कुठून व कसं येतं? भाजपशी जुळवून घ्या? का? म्हणजे आम्ही पैसे खायला मोकळे होऊ? काय किळसवाणे राजकारण
— Mrs Anjali Damania (@anjali_damania) June 20, 2021
शिवसेनेत दोन गट असल्याचा दावाही दमानिया यांनी केला. शिवसेनेत दोन गट आहेत. एक मिलिंद नार्वेकरांचा आणि दुसरा संजय राऊतांचा. राऊतांना शिवसेनेने राष्ट्रवादीसोबत राहावसं वाटतं. तर नार्वेकरांना शिवसेनेने भाजपसोबत राहावं असं वाटतं. यांच्याकडे तत्वही नाहीत आणि विचारधाराही नाही. केवळ पैसा यांच्यासाठी महत्त्वाचा आहे, अशी टीका त्यांनी केली.
विरोधी पक्षाची उद्या सर्वात मोठी बैठक, राष्ट्रमंच नावानं नवी आघाडी, राष्ट्रपती निवडणुकीसाठी पवारांची दिल्लीवारी
https://t.co/ByywQV7hxJ— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
प्रताप सरनाईक यांनी पत्र लिहिलं असलं तरी त्यांच्या विरोधात सबळ पुरावे आहेत. त्यातून ते बाहेर पडू शकत नाहीत, असा दावाही त्यांनी केला. मात्र, आता या मुद्दयावरून भाजप राजकारण करण्याच्या तयारीत आहे. चुटकी सरशी सरकार बनवू असं विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस वारंवार सांगत आहेत. त्यामुळे सेना-भाजप पुन्हा एकत्र होईल असं दिसत आहे, असंही त्या म्हणाल्या.
योग दिवस स्पेशल : मराठमोळ्या अभिनेत्रीनं सर्वांचंच लक्ष वेधलं https://t.co/mcoiD0Gj2u
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021