मुंबई : आज योग दिवसाचं निमित्त साधून मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनीही व्यायामाचं महत्व समजावून सांगितलं. यासाठी त्यांनी स्वत: योग करतानाचे फोटोही शेअर केले आहेत. मात्र, या सर्वांमध्ये अभिनेत्री कृतिका गायकवाड सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. बंदिशाळा या चित्रपटातून नावारुपास आलेल्या कृतिकानं चक्क मुंबईच्या रस्त्यावर एशियाटिक लायब्ररी समोर योगा केला. तिने तिचे फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले आहेत.
‘युवा डान्सिंग क्वीन’ या शोमुळे कृतिकाला प्रसिद्धी मिळाली. कृतिकाने ‘बंदिशाळा’ या चित्रपटात ठसकेबाज लावणीने सर्वांचे लक्ष वेधले होते. अभिनेत्री कृतिका गायकवाड नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे सतत चर्चेत असते. आजच्या दिवसाचं निमित्त साधून मनोरंजन क्षेत्रातील कलाकारांनी देखील व्यायामाचं महत्व आपल्या चाहत्यांना समजावून सांगितलं. यासाठी त्यांनी स्वत: योग करतानाचे फोटो देखील शेअर केले.
आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त कृतिकाने खास फोटोशूट केले आहे. सर्वांत हटके फोटोशूटमुळे ती सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकासमोर, मुंबई महापालिका इमारतीसमोर, एशियाटिक लायब्ररीसमोर कृतिकाने योग करताना फोटोशूट केले आहे.
मुंबईच्या रस्त्यांवरील तिच्या या फोटोशूटला नेटकऱ्यांची पसंती मिळतेय. प्रत्येक गोष्ट कलात्मकपणे करणे म्हणजे योग, ही स्वामी कृपालूंची ओळ तिने कॅप्शनमध्ये लिहिली आहे. हे फोटो पोस्ट करत तिने चाहत्यांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
मुंबईची गोष्टच न्यारी असं म्हणत तिनं हे फोटो आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर देखील शेअर केले आहेत. या फोटोंद्वारे तिनं व्यायामाचं महत्व समजावून सांगण्याचा प्रयत्न केला आहे.
‘युवा डान्सिंग क्वीन’ या शोमुळे कृतिकाला प्रसिद्धी मिळाली. कृतिकाने ‘बंदिशाळा’ या चित्रपटात ठसकेबाज लावणीने सर्वांचे लक्ष वेधले होते.