साउथॅम्प्टन : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये आज पाचव्या दिवशी भारताने न्यूझीलंडला तीन धक्के दिले आहेत. तसेच लंचपर्यंत त्यांच्या 5 बाद 135 धावा झाल्या आहेत. पावसाने व्यत्यय आणलेल्या या सामन्यात पहिल्या आणि चौथ्या दिवशीचा खेळ झाला नाही. दरम्यान भारताने पहिल्या डावात 217 धावा केल्या आहेत. तर आज लंचपर्यंत न्यूझीलंड 82 धावांनी पिछाडीवर आहे.
Lunch on day five in Southampton 🍲
India end the session on a high after a quality display from their pacers.#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/tmuMmIG3e5 pic.twitter.com/7JwiQTNC6s
— ICC (@ICC) June 22, 2021
पावसाचा खेळ असाच सुरु राहिला तर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या पहिल्या वहिल्या फायनलमध्ये आपल्याला भारत-न्यूझीलंड संयुक्तपणे जेतेपद मिळवताना पाहायला मिळेल. पाचव्या दिवशीही पावासाने हजेरी लावली. पावसाच्या व्यत्ययामुळे विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचे जवळपास तीन दिवस वाया गेले आहेत. पहिला आणि चौथा दिवस पुर्णपणे पावसामुळे वाया गेला तर अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवशी 64 आणि तिसऱ्या दिवशी 76 षटकांचा खेळ झाला. कोसोटीचा निकाल उर्वरित दोन दिवसांवर आहे.
A look at the session timings for Day 5.
A total of 91 overs to be bowled
Session 1 – 1130 – 1330 ( 4 – 6 PM IST)
Session 2 – 1410 – 1610 (6.40 – 8.40 PM IST)
Session 3 – 1630 – 1830 ( 9 – 11 PM IST)#WTC21 Final https://t.co/wlJhZMKIWN— BCCI (@BCCI) June 22, 2021
तिसऱ्या दिवसाखेरीस न्यूझीलंडची स्थिती 101 वर 2 बाद होती. त्यानंतर चौथ्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द झाल्यानंतर पाचव्या दिवशीचा खेळ चार वाजता सुरु केला गेला आहे. बराच काळ प्रतिक्षेनंतर अखेर मोहम्मद शमीने 64 व्या ओव्हरमध्ये रॉस टेलरला, त्यानंतर लगेचच 70 व्या ओव्हरमध्ये इशांतने हेन्री निकोल्सला आणि पुन्हा शमीने 71 व्या ओव्हरमध्ये बीजे वॉटलिंगला बाद केल. दरम्यान दिवसांच पहिलं सेशन संपून दुसऱ्या सेशनला सुरुवात झाली आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन अष्टपैलू खेळाडू कॉलीन डी ग्रँडहोमसोबत फलंदाजी करत होता. लंचपर्यंत त्यांच्या 5 बाद 135 धावा झाल्या आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पाचव्या दिवशीच्या खेळात भारतीय गोलंदाजांच्या भेदक माऱ्यासमोर न्यूझीलंडच्या फलंदाजाची भंबेरी उडाली. ईशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने न्यूझीलंडला दिलेल्या धक्क्यांमुळे लंचपूर्वीच न्यूझीलंडचा अर्धा संघ तंबूत परतला. त्यानंतर शमीने आपला भेदक मारा सुरुच ठेवला. त्याने चार गड्यांना तंबूत धाडले असून वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पाच बळींचा टप्पा पूर्ण करण्याची त्याला संधी आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन मैदानात असून त्यांच्या सर्व आशा त्याच्यावर असतील.
A crucial breakthrough for India as we approach lunch!
Ishant Sharma gets Henry Nicholls with a peach of a delivery from round the wicket.
🇳🇿 are 134/4#WTC21 Final | #INDvNZ | https://t.co/LVaCJMvNwM pic.twitter.com/VNtCdw5FcT
— ICC (@ICC) June 22, 2021
पावासाच्या व्यत्ययामुळे विश्व कसोटी अंजिक्यपद स्पर्धेचे जवळपास तीन दिवस वाया गेले आहेत. पहिला आणि चौथा दिवस पुर्णपणे पावसामुळे वाया गेला तर अंधुक प्रकाशामुळे दुसऱ्या दिवशी 64 आणि तिसऱ्या दिवशी 76 षटकांचा खेळ झाला. कोसोटीचा निकाल उर्वरित दोन दिवसांवर आहे. पाचव्या दिवशीही पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे सामना उशीराने सुरु झाला. भारतीय वेळेनुसार चार वाजता सामन्याला सुरुवात झाली. आज दिवसभरात 91 षटकं होण्याची शक्यता बीसीसीआयने व्यक्त केली होती.
टोकयो ऑलिम्पिक : बेड्सचे फोटो पाहून खेळाडू म्हणाले कंडोम वाटप निरुपयोगी https://t.co/pgzA3BpUS5
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 22, 2021