सोलापूर : परिवहन समितीचे माजी चेअरमन तथा लिंगायत नेते विजयकुमार हत्तुरे यांनी रासपचे प्रदेश उपाध्यक्षपदाचा त्याग करून काँग्रेस पक्षात प्रवेश केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी हत्तुरे यांना मुंबईतील टिळक भवनात प्रवेश दिला.
राहुलजींना पीएम करणार, देशात काँग्रेसशिवाय पर्याय नाही म्हणूनच स्वबळाचा नारा… – नाना पटोले #Congress #CongressParty #surajyadigital #काँग्रेस #स्वबळ #नारा #काँग्रेस #सुराज्यडिजिटल #पीएम #राहुलगांधी #PMhttps://t.co/JN1cdMVD44
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
देशाचे माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, पक्षप्रभारी आ.एच के.पाटील,महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईचे अध्यक्ष भाई जगताप, मंत्री यशोमती ठाकुर, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, युवक अध्यक्ष सत्यजित तांबे यांची उपस्थिती होती.
लिंगायत धर्मगुरू शरणबसवलिंग महास्वामीजी ( सोलापूर ), लिंगायत जगद्गुरु चन्नबसवानंद महास्वामीजी ( बंगळुरु ) यांच्या मार्गदर्शनानुसार माजी गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या संमतीने विजयकुमार हत्तुरे आणि डाॅ.बसवराज बगले यांनी गांधी भवनात प्रदेशाध्यक्ष पटोले यांच्याशी चर्चा केली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीची सुवर्णसंधी; थेट मुलाखत घेऊन निवड #surajyadigital #bank #BANKOFINDIA #मुलाखत #सुराज्यडिजिटल #opportunity #नोकरी pic.twitter.com/PzFG0k0ohT
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021
राजकीय संघटनात्मक बाबीविषयी धोरण ठरल्यानंतर टिळक भवनात काँग्रेस पक्षात प्रवेश केला. लिंगायत समाजाच्या विविध मागण्यांसाठी काँग्रेसच्या माध्यमातून आपण पाठपुरावा करून सर्व समावेशक काम करण्याची आणि संघटनेला प्राधान्य देऊन पक्ष बळकट करण्याची ग्वाही यावेळी विजयकुमार हत्तुरे यांनी दिली.
यावेळी जगतज्योती महात्मा बसवेश्वरांची प्रतिमा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयासाठी भेट देण्यात आली. सोलापूर जिल्हा काँग्रेसचे समन्वय डाॅ. बसवराज बगले, उद्योजक संतोष फताटे यांचीही उपस्थिती होती.
शिवसेनेत दोन गट, एक राष्ट्रवादीसोबत दुसरा भाजपसोबत; मोठा गौप्यस्फोट https://t.co/RMkfX8MMUM
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 21, 2021