नवी दिल्ली : जेईई मेन परीक्षेची वाट पाहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. ही परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जेईई मेनचा निकाल 14 ऑगस्टपर्यंत जाहीर होणार आहे. याआधी कोरोनामुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. दरम्यान, यावेळी देशभरातील 174 केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या जेईई मेनमध्ये, 92,695 विद्यार्थी उपस्थित राहतील.
ऑनलाईन शॉपिंगच्या मोठ्या डिस्काऊंटवर सरकारची बंदी?; फ्लॅश सेल होणार बंद https://t.co/NpAmvCvz78
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 22, 2021
यापूर्वी ही परीक्षा एप्रिलमध्ये घेण्यात येणार होती. परंतु, कोरोना आणि लॉकडाऊनच्या दुसर्या लाटेमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. कोरोनाच्या धोक्यामुळे जेईई, एनईईटीसह अनेक प्रवेश परीक्षा आणि स्पर्धा परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा विचार करता सरकारने हा निर्णय घेतला होता. कोरोनामुळे मंडळाने सर्व केंद्रे व राज्यातील दहावी आणि बारावीच्या बोर्ड परीक्षा रद्द केल्या होत्या.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
हा तर आरएसएसचा डाव ! पश्चिम बंगालमधून 2 राज्यांची निर्मिती करावी, भाजप खासदारांची मागणी https://t.co/QGhg4gYkgx
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
संयुक्त प्रवेश मंडळाने आज बुधवारी या परीक्षेची तारीख जाहीर केली आहे. मंडळाच्या म्हणण्यानुसार ही परीक्षा 17 जुलै रोजी घेण्यात येणार आहे. विशेष म्हणजे जेईई मेनचा निकाल 14 ऑगस्टपर्यंत जाहीर होणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोरोना साथीच्या आजारामुळे ही परीक्षा नुकतीच पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला होता. बर्याच काळापासून या परीक्षा आयोजित करण्याबाबत चर्चा सुरू होती.
…म्हणून शाहरुख आणि अक्षय कुमार एकत्र काम करत नाहीत https://t.co/UTHGMe0IU4
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
यावेळी देशभरातील 174 केंद्रांवर घेण्यात येणाऱ्या जेईई मेनमध्ये, 92,695 विद्यार्थी उपस्थित राहतील. संयुक्त प्रवेश मंडळाच्या म्हणण्यानुसार निकाल जाहीर झाल्यानंतर उमेदवारांचे समुपदेशन तीन टप्प्यात पूर्ण केले जाईल. 15 सप्टेंबरपर्यंत समुपदेशन प्रक्रिया पूर्ण करण्याची योजना आहे. इंजिनीअरिंगच्या प्रवेशासाठी होणाऱ्या या परीक्षेच्या तारखेची विद्यार्थी खूप दिवस प्रतीक्षा करत होती. अखेर मंडळाने परीक्षेसंदर्भात निर्णय घेतला.
कोरोना संकटात ऑलिम्पिक, दारू मिळणार नाही, अनेक भागात मादक पेयांवर बंदी #surajyadigital #बंदी #सुराज्यडिजिटल #कोरोना #olympics2021 #अॉलिम्पिक #wine pic.twitter.com/rXYA6JmKcJ
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021