सोलापूर : पूर्वीश्रमी काँग्रेसचे माजी आमदार, आता शिवसेनेकडून विधानसभा लढवलेले सोलापूरचे मातब्बर नेते दिलीप माने यांचे नाव आता विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीकडून निश्चित झाल्याचे संकेत आज मिळाले आहेत. आज तशी राजकीय घडामोडीही घडल्या आहेत.
ओबीसी राजकीय आरक्षणासाठी 26 जूनला राज्यासह सोलापुरात 20 ठिकाणी आंदोलन https://t.co/rMLnhc55l0
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
नुकतेच झालेल्या विधानसभा पोटनिवडणुकीतील हार राष्ट्रवादीची जिव्हारी लागली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीने विधान परिषदेसाठी आतापासूनच चाचपणी चालू केली आहे. त्या अनुषंगानेच आजची राजकीय घटना घडल्याचे बोलले जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आपल्या मराठवाड्याचा दौऱ्याला आज गुरुवारपासून सुरुवात झाली. या दौऱ्याला जाण्यापूर्वी ते सोलापुरात पहाटे पाचच्या सुमारास शासकीय विश्रामगृहात दाखल झाले. सकाळी नऊच्या सुमारास त्यांचा मराठवाडा दौरा सुरू झाला. शासकीय विश्रामगृहात कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
वळसंगच्या महिला सरपंचाला मारहाण, तिघांविरुद्ध गुन्हा दाखल; सरपंचसह तिघांवर अट्रोसिटीचा गुन्हा दाखल https://t.co/Z1MatnhKdC
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
विश्रामगृहाच्या बाहेर पडले मात्र दिलीप माने यांच्या गाडीमध्ये ते बसले ड्रायव्हरच्या बाजूला राष्ट्रवादीचे बळीरामकाका साठे तर जयंत पाटील यांच्या बाजूला दिलीप माने बसले. थोड्यावेळ कुणाला काही समजले नाही, मात्र हा सर्व ताफा होटगी रोडवरील दिलीप माने यांच्या “सुमित्रा” निवासस्थानाकडे रवाना झाला.
थोड्या वेळाने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचेही सुमित्रा निवासस्थानी आगमन झाले, त्यानंतर याठिकाणी माने यांच्या घरात सर्व नेत्यांनी नाश्ता व चहा घेतला त्यानंतर दिलीप माने यांनी यांनी सर्वांचा सत्कार केला. यावेळी आपले चिरंजीव पृथ्वीराजसह उत्तर तालुक्याचे ज्येष्ठ नेते काका साठे यांना फोटोमध्ये घ्यायला माने विसरले नाहीत. यावेळी महेश गादेकर, शफी इनामदार, नगरसेवक किसन जाधव, विजय जाधव, दीपक राजगे, मिलिंद गोरे यांची उपस्थिती होती.
भंगारवाल्याने विकत घेतली 6 हेलिकॉप्टर, जगभरात चर्चा https://t.co/1vHpEjEuTI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या विधानपरिषद निवडणुकीसाठी माजी आमदार राजन पाटील, उमेश पाटीलसह अनेकांनी नकार दर्शविला आहे. ही जागा राष्ट्रवादीची असल्याने राष्ट्रवादीकडून भाजप उमेदवाराविरोधात (संभाव्य उमेदवार प्रशांत परिचारक, चालू विद्यमान आमदार) तगडा उमेदवार शोधाण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडून दिलीप माने हे इच्छुक आहेत, याच पार्श्वभूमीवर जयंत पाटील यांनी माने यांच्या निवासस्थानी घेतलेल्या पाहुणचारानंतर जवळजवळ महाविकास आघाडीकडून दिलीप माने हे निश्चित झाल्याचे संकेत मिळत आहेत.
भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, केली महत्त्वाची मागणी https://t.co/Qfu0Zm1r9T
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021