चेन्नई : तामिळनाडूतील विरुथुनगर जिल्ह्यातील थिरुथंगल येथील रहिवासी के. प्रवीण यांची जीभ भारतात सर्वात लांब आहे. प्रवीणने जिभेसाठी इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान पटकावलं आहे. सर्वसामान्यपणे पुरुषांच्या जिभेची लांबी सरासरी 8.5 सेंटिमीटर असते तर महिलांच्या जिभेची लांबी 7.9 सेंटिमीटर असते. दरम्यान, प्रवीणची जीभ 10.8 सेंटिमीटर लांब असून तो आपल्या जिभेच्या सहाय्याने पेटिंग देखील करतो.
अनोखी पुरुषांची वटपौर्णिमा
– पत्नी पिडितपुरुष आश्रम येथे पिंपळ पौर्णिमा साजरी केली,…अशा बायकाबरोबर सातजन्म काय सात सेकंद देखील संसार करू शकत नाही #surajyadigital #संसार #वटपौर्णिमा #vatpoornima #world #victims #सातजन्म #sevenbirthshttps://t.co/jlRiLLyqUR— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
के. प्रवीण यांची जीभ मात्र टाळूच्या मागील भागापर्यंत 10.8 सेंटीमीटर लांब आहे. तो कितीतरी वेळा आपली जीभ नाकाला टेकवू शकतो. इतकंच नव्हे तर जिभेने तो चित्र काढतो आणि लिहितोसुद्धा, असे सांगितले जात आहे. तामिळनाडूतील विरुथुनगर जिल्ह्यातील थिरुथंगल येथील रहिवासी के. प्रवीण यांची जीभ भारतात सर्वात लांब आहे . प्रवीण हा बी.ई. रोबोटिक्स शाखेचा विद्यार्थी आहे. प्रवीणने जिभेसाठी इंडियन बुक ऑफ रेकॉर्डमध्ये स्थान पटकावलं आहे. विशेष म्हणजे गिनीस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये स्थान मिळावं यासाठी प्रविण स्वतःला प्रशिक्षण देत आहे.
WTC फायनल : क्रिकेटच्या मैदानातील सर्वात सुंदर फोटो https://t.co/TXO9gKo9j0
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
सर्वसामान्यपणे पुरुषांच्या जिभेची लांबी सरासरी 8.5 सेंटिमीटर असते तर महिलांच्या जिभेची लांबी 7.9 सेंटिमीटर असते. सध्या जगातील 10.1 सेंटिमीटर अशी सर्वात मोठी जीभ असलेल्या व्यक्तीची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये झालेली आहे. प्रवीणची जीभ 10.8 सेंटिमीटर लांब असून आपल्या जिभेचा वापर करून वेगवेगळी कौशल्य दाखवतो. जिभेच्या सहाय्याने तो सुंदर चित्रे रेखाटतो, तामिळ अक्षरं लिहितो, नाकाला अनेकवेळा जिभेने स्पर्श करतो.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
WTC फायनल – भारताला मोठा धक्का; न्यूझीलंडचा विजय, न्यूझीलंडने पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली
https://t.co/aM3c0ajm60— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
प्रवीण आपल्या जिभेच्या सहाय्याने पेटिंग करण्याची अनोखी पद्धतही जाणतो. तो आपल्या जिभेचा अर्धा भाग झाकण्यासाठी हातमोज्याचा छोटा तुकडा वापरतो आणि नंतर चार्ट पेपरवर तामिळ अक्षरं लिहितो. त्याने दिवंगत राष्ट्रपती अब्दुल कलाम यांच्यासह अनेक प्रसिध्द व्यक्तींची चित्रं रेखाटली आहेत.
भंगारवाल्याने विकत घेतली 6 हेलिकॉप्टर, जगभरात चर्चा https://t.co/1vHpEjEuTI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
* एका मिनिटात 110 वेळा नाकाला स्पर्श
इंडिया बुक ऑफ रेकॉर्डसच्या म्हणण्यानुसार प्रवीण जीभ ही देशातील सर्वात मोठी म्हणजेच 10.8 सेंटिमीटर आहे. ती एका मिनिटात सरासरी 110 वेळा नाकाला स्पर्श करते. एका मिनिटात त्याच्या कोपराला सरासरी 142 वेळा स्पर्श करते. तसंच तामिळ भाषेत 1 तास 22 मिनिटं आणि 26 सेकंदात सर्व 247 अक्षरे तो जीभेच्या सहाय्याने लिहू शकतो. प्रवीणने एक मिनिटात 219 वेळा जिभेने नाकाला स्पर्श करून स्वत:चा विक्रम मोडत ग्रँड मास्टर ऑफ द आशिया बुक ऑफ रेकॉर्डस हा पुरस्कार मिळवला आहे.
जेईई परीक्षा 17 जुलैला होणार तर 14 ऑगस्टपर्यंत निकाल येणार https://t.co/QOkkhK2pFC
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
* आगामी काय आहे लक्ष्य ?
प्रवीण सांगतो, जरी माझ्या कर्तृत्वाची नोंद भारतात झालेली असली तरी मला माझं कौशल्य जगासमोर न्यायचं आहे. तामिळ भाषेची आवड असल्याने येत्या काही दिवसांत सर्व 1330 तिरुव्कुरल जिभेने लिहून गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नाव नोंदवण्याचं माझे लक्ष्य आहे. जिभेच्या सहाय्याने डोळ्यांना स्पर्श करता यावा यासाठी मी कठोर मेहनत करत आहे. यामुळे माझे नाव गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदले जाईल आणि तामिळनाडूचा सन्मान वाढेल, यासाठी त्यांनी राज्य सरकारकडे मदतीची अपेक्षा केली आहे.
हा तर आरएसएसचा डाव ! पश्चिम बंगालमधून 2 राज्यांची निर्मिती करावी, भाजप खासदारांची मागणी https://t.co/QGhg4gYkgx
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021