अक्कलकोट : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंगच्या सरपंच महानंदा दुधगी, त्यांचे पती माजी सरपंच श्रीशैल दुधगी व ग्रामविकास अधिकारी डी एन नदाफ यांच्या विरोधात वळसंग पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अन्वये गुन्हा दाखल झाला आहे. सरपंच महानंदा दुधगी यांना मारहाण केल्याप्रकरणी तीन जणांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
ओबीसी राजकीय आरक्षणासाठी 26 जूनला राज्यासह सोलापुरात 20 ठिकाणी आंदोलन https://t.co/rMLnhc55l0
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, वळसंग ग्रामपंचायतीमध्ये नामदेव मारुती गायकवाड हे सफाई कामगार होते. निवृत्तीनंतर मुलगा शांतकुमार गायकवाड याला कामाला घ्यावे, अशी मागणी केली. मुलगा शांतकुमार यांनी गेल्या तीन जून रोजी मला कामाला घेतो म्हणून गेल्या दोन वर्षापासून टाळाटाळ करीत आहात, कामावर का घेत नाही, अशी विचारणा केली. यावर सरपंच महानंदा दुधगी यांनी कन्नड मधून जातीवाचक बोलले. तर त्यांचे पती श्रीशैल दुधगी यांनी तुझी वसुली व काम करण्याची लायकी नाही तू तुझ्या जातीच्या लायकीप्रमाणे रहा,नाही तर जिवंत सोडणार नाही, अशी धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
ग्रामविकास अधिकारी डी. एन. नदाफ यांनीही जातीवाचक शिवीगाळ केली.अशी फिर्याद शांतकुमार गायकवाड यांनी वळसंग पोलिस ठाण्यात दिली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
त्यानुसार सरपंच महानंदा श्रीशैल दुधगी, माजी सरपंच श्रीशैल दुधगी व ग्रामविकास अधिकारी डी. एन. नदाफ यांच्या विरोधात वळसंग पोलिस ठाण्यात अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल झाला आहे. अधिक तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. संतोष गायकवाड करीत आहेत.
भंगारवाल्याने विकत घेतली 6 हेलिकॉप्टर, जगभरात चर्चा https://t.co/1vHpEjEuTI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
दरम्यान या घटनेत परस्परावर गुन्हा दाखल झाला आहे. वळसंगच्या सरपंच महानंदा दुधगी यांना घरातून बाहेर ओढून मारहाण करून जबरदस्तीने हाताच्या बोटातील अंगठी काढून घेतल्याप्रकरणी तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
नामदेव मारुती गायकवाड, राजकुमार नामदेव गायकवाड व शांतकुमार नामदेव गायकवाड (रा. वळसंग ) असे गुन्हा दाखल झालेल्या तिघांची नावे आहेत.
भाजपाच्या शिष्टमंडळाने घेतली राज्यपालांची भेट, केली महत्त्वाची मागणी https://t.co/Qfu0Zm1r9T
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 23, 2021
याबाबत सरपंच महानंदा दुधगी यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, तिघांनी दुपारी दोनच्या सुमारास घरी आले. आम्हाला पाच लाख रुपये दे नाहीतर मुलाला कामावर तरी घे असे म्हणून घरातून ओढत बाहेर काढले. त्यानंतर मारहाण करून हाताच्या बोटातील सोन्याची अंगठी काढून घेऊन दम देऊन निघून गेल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीएसआय स्वामीराव पाटील अधिक तपास करीत आहेत.