साऊदम्पटन : न्यूझीलंडनं वर्ल्ड टेस्ट चॅम्पपियनशिप जिंकली. यानंतर एक फोटो तुफान व्हायरल होतोय. विराट कोहली आणि केन विल्यमसनच्या गळाभेटीचा हा फोटो प्रचंड लोकप्रिय ठरला आहे. ‘स्पिरीट ऑफ गेम’ असं या फोटोचं वर्णन होत आहे. विल्यमसन आणि कोहली प्रतिस्पर्धी टीमचा आदर करणारे कॅप्टन आहेत. त्यांच्या मनात एकमेकांविषयी मैत्री आणि आदराची भावना आहे. WTC फायनल संपल्यानंतर याचं आणखी एक उदाहरण काल संपूर्ण जगानं पाहिलं.
We have the image of the World Test Championship!
These two! ❤ pic.twitter.com/f1H1zsZr8w
— Wisden India (@WisdenIndia) June 23, 2021
विराट कोहलीने एखाद्या महत्त्वाच्या आयसीसी स्पर्धेतील ट्रॉफी जिंकण्याचं चाहत्यांच स्वप्नही अधुरं राहिल. न्यूझीलंड संघाला कर्णधार केन विल्यमसनने विजय मिळवून देत विश्वविजेता बनवलं. पण सामन्यानंतर केन आणि विराटकडून दाखवण्यात आलेल्या खेळाडू वृत्तीने सर्वांचीच मनं जिंकली दोघांचा एक फोटो प्रचंड व्हायरल होत असून नेटकरी यावर कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
WTC फायनल – भारताला मोठा धक्का; न्यूझीलंडचा विजय, न्यूझीलंडने पहिली वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप जिंकली
https://t.co/aM3c0ajm60— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पावसाच्या व्यत्ययामुळे पाच दिवसांचा सामना सहाव्या राखीव दिवशीही खेळवावा लागला. सुरुवातीपासून अटीतटीचा होणारा सामना कधी न्यूझीलंडच्या तर कधी भारताच्या तर कधी न्यूझीलंडच्या पारड्यात झुकत होता. मात्र अखेरच्या दिवशी भारतीय फलंदाजाना मोठे लक्ष्य न देता आल्याने 139 धावांचे लक्ष्य न्यूझीलंडने केवळ दोन विकेट गमावत सर केले आणि विजयश्री मिळवला. सामन्यानंतर ‘भारतीय कर्णधार विराट कोहलीने देखील न्यूझीलंडचा संघ चांगला खेळला त्यामुळे ते विजयास पात्र आहेत’ असं म्हणाला.
सामना संपताच मैदानावर उपस्थित केन विल्यमसनने कोणतही दमदार सेलेब्रेशन न करता केवळ सहखेळाडू रॉस टेलरला मिठी मारुन हसला. तसेच प्रतिस्पर्धी कर्णधार विराट कोहलीलाही केनने मिठी मारुन दोघांनीही एकमेकांचे कौतुक केले. याच मिठी मारतानाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून याला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमधील सर्वांत सुंदर फोटो म्हटला जात आहे.
भंगारवाल्याने विकत घेतली 6 हेलिकॉप्टर, जगभरात चर्चा https://t.co/1vHpEjEuTI
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 24, 2021