मुंबई : अभिनेत्री पायल रोहतगीला अटक करण्यात आली आहे. पायलनं राहत्या सोसायटीमधील रहिवाश्यांना अश्लील भाषेत धमक्या दिल्या. त्यांना खोट्या आरोपांखाली तुरुंगात डांबण्याची धमकी दिली. तसेच सोसायटीच्या आवारात जी मुलं खेळताना दिसतील त्यांचे हात पाय तोडेन असं ती म्हणाली. असे आरोप तिच्यावर करण्यात आले आहेत. या आरोपांखाली अहमदाबाद पोलिसांनी तिला अटक केली आहे.
Actress Payal Rohatagi arrested by police for threatening her society chairperson.
— Shivangi Thakur (@thakur_shivangi) June 25, 2021
सतत वादग्रस्त विधाने करून चर्चेत राहणारी बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगी हिला अहमदाबाद पोलिसांनी अटक केली आहे. सोसायटीच्या चेअरमनला सोशल मीडियावर शिविगाळ केल्याप्रकरणी, तसेच सोसायटीतील लोकांशी वारंवार भांडणे व चेअरमनला जिवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
Actres payal Rohatagi demands bail for Innocent hindu Saint Sant Shri Asharamji Bapu and exposed that how innocent people are imprisoned in Jail??
Justice for Bapuji#अब_तो_रिहा_करो pic.twitter.com/QrDVyo9Qnu— Devangee Dabhi (@devangee_dabhi) May 15, 2021
‘आज तक’ने दिलेल्या वृत्तानुसार, पायल रोहतगी 20 जून रोजी झालेल्या सोसायटीच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सदस्य नसतानाही सहभागी झाली होती.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
मुंबई मेट्रोमध्ये भरती, मिळणार घसघशीत पगार https://t.co/1vDclXWtEa
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021
सोसायटीच्या सदस्यांनी तिला सभेमध्ये सहभागी होण्यास मनाई केल्यानंतर तिने शिविगाळ केली. तसेच सोसायटीमध्ये मुलांच्या खेळण्यावरुनही तिने रहिवाशांसोबत भांडणे केली होती. या प्रकरणी सेटेलाईट पोलिसांनी तिला अटक केली आहे.
दरम्यान, पायल रोहतगीला पोलिसांनी अटक करण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधी राजस्थानमधील बुंदी पोलिसांनी तिला मोतिलाल नेहरू, माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि इंदिरा गांधी यांच्याबद्दल वादग्रस्त टिप्पणीचा व्हिडीओ पोस्ट केल्याप्रकरणी अटक केली होती. युथ काँग्रेसचे नेते चर्मेश शर्मा यांच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली होती. यानंतर तिला राजस्थान न्यायालयाने जामिन दिला होता.
पुण्यात निर्बंध जैसे थे! शाळा-कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद https://t.co/NITuOYN58h
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021
सोशल मीडियावर चर्चेत राहण्यासाठी वाद ओढवून घेण्याची पायल रोहतगी हिची सवय आहे. याआधीही तिने सती प्रथेचे समर्थन केले होते. तसेच नोबेल विजेत्या मलाला युसुफजाईला अपशब्द बोलून आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जातीवर सवाल उपस्थित करून, तसेच कलम 370 बाबत वादग्रस्त विधान करून आणि फूट ॲप झोमॅटोला सेक्यूलर आउटलेट म्हणून वाद ओढवून घेतला होता.