मुंबई : महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा धोका वाढल्यामुळे पुन्हा एकदा राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. याबाबत राज्य सरकारने आज नवीन शासन आदेश काढला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या बैठकीत कडक निर्बंध लावण्याच्या निर्णयाला सर्वानुमते संमती देण्यात आली आहे. त्यामुळे आजपासून राज्यात पुन्हा निर्बंध लागू झाले आहेत.
आणीबाणीबद्दल फडणवीस काय म्हणाले ? #आणीबाणी #emergency #dark #भाजपा #Fadanvis #Politics #surajyadigital #सुराज्यडिजिटल – आणीबाणीबद्दल सुप्रिया ताईंना माहित नाही, आम्ही ती भोगलीय.https://t.co/1apNh1W51v
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021
राज्यात गुरुवारी कोविड १९ चे १० हजाराहून अधिक रुग्ण आढळले. डेल्टा प्लसचे २१ रुग्ण असून त्यातील एक दगावला. मुंबई, पालघर, सिंधुदुर्ग, जळगाव, रत्नागिरी, ठाणे याठिकाणी कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
चिंताजनक ! कोरोना डेल्टा प्लसची 21 जणांना लागण, राज्यात पहिला मृत्यू https://t.co/dgroD6KyQS
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021
राज्यातील काही जिल्ह्यांत रुग्णांमध्ये ‘डेल्टा प्लस’ व्हेरियंटचे रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून कोरोनाच्या नियमावलीमध्ये नवीन बदल करण्यात आले आहेत. आता राज्यातील सर्व जिल्हे आणि महानगरपालिकांचा समावेश तिसऱ्या गटाच्या वर ठेवण्यासंदर्भात निर्णय घेण्यात आला आहे. याआधी जाहीर केलेल्या नियमावलीनुसार ५ गटांमध्ये जिल्हे आणि महानगरपालिकांची विभागणी करण्यात आली होती.
नवीन आदेशानुसार, आर-टीपीसीआर टेस्टच्या माध्यमातून मिळालेल्या आठवड्याचा पॉझिटीव्हीटी दर पाहून निर्बंध किती वाढवायचे याचा विचार करण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.
आणीबाणीला 46 वर्ष पूर्ण, नरेंद्र मोदी आणि अमित शहांनी केले ट्वीट, भाजपमध्ये ट्वीटवर ट्वीट, 'तो' दिवस ठरला होता देशासाठी 'काळा दिवस'
https://t.co/Ax4jVtYr4j— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021
तसंच, ज्या-ज्या जिल्ह्यांमध्ये परिस्थिती बिघडलेली असले तिथे थेट निर्बंध वाढवण्याचे निर्णय जिल्हा प्रशासनाने घ्यावेत यासाठी त्यांनी राज्य प्रशासनाच्या आदेशांची वाट पाहू नये, असंही म्हटलं आहे.
* काढला असा नवीन आदेश
महाराष्ट्रात कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा शिरकाव झाल्यामुळे राज्य सरकारने अधिक खबरदारी घेतली आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटचे राज्यात २१ रुग्ण आढळले यातील एका ८० वर्षीय रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरिएंटचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने हे निर्बंध लागू केले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंधात रेस्टॉरंट, हॉटेल्स यांना ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवण्याची परवानगी आहे. विकेंड दिवशी हॉटेल सुरू राहणार नाहीत. त्यावेळी होम डिलिव्हरी करण्यास परवानगी असेल.
या आदेशात म्हटलं आहे की, आठवड्याचा पॉझिटिव्हीटी रेट आणि ऑक्सिजन बेडची व्याप्ती बदलता तिसऱ्या स्तरावरील निर्बंध महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यात लागू करण्यात आले आहेत. तिसऱ्या स्तरावरील निर्बंध आणखी कडक करायचे असल्यास स्थानिक प्रशासन त्याबाबत निर्णय घेऊ शकतं. लेव्हल ३ मध्ये अत्यावश्यक दुकानं आणि आस्थापना सर्व दिवशी दुपारी ४ वाजेपर्यंतच सुरू ठेवण्याची परवानगी आहे. तर अत्यावश्यक नसलेली दुकानं आणि आस्थापनं सोमवार ते शुक्रवार या दिवसांत ४ वाजेपर्यंत खुली ठेवू शकता.
मुंबई, नागपुरात ईडीचे छापे; अनिल देशमुख गेले कुठे? https://t.co/S5ACY7z0Fn
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021
त्याचसोबत आरोग्य कर्मचारी आणि अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना लोकल ट्रेनने प्रवास करता येईल. जीम, सलून आणि स्पा दुकानं ५० टक्के क्षमतेने संध्याकाळी ४ वाजेपर्यंत खुली ठेवता येतील.
– सरकारनं काय म्हटलंय पहा
या नव्या व्हेरियंटची प्रसार करण्याची क्षमता अधिक आहे. त्यांचा फुप्फुसावर अधिक परिणाम होतोय. या व्हायरसमुळे मोनोक्लोनल अँटीबॉडीच्या प्रतिसादात घट होतेय.
पुण्यात निर्बंध जैसे थे! शाळा-कॉलेज 15 जुलैपर्यंत बंद https://t.co/NITuOYN58h
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021