रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात राजधानी एक्स्प्रेसचे इंजिन रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक ठप्प झाली. कोकण रेल्वे मार्गांवर उक्षी टनेलमध्ये आज पहाटे चार वाजता ही घटना घडली आहे. मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर कोचीवली एक्सप्रेस, नागकोईल एक्सप्रेस, दिवा सावंतवाडी एक्स्प्रेस, मंगला एक्सप्रेस विविध स्थानकात थांबवण्यात आल्या. याचा फटका प्रवाशांना बसला.
पुन्हा एकदा महाराष्ट्रात कडक निर्बंध लागू, काढला नवीन शासन आदेश, दुकानाचे नवीन टाईमटेबल https://t.co/vHc7iRVcdy
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 25, 2021
रत्नागिरी कोकण रेल्वेच्या मार्गावर रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगदयामध्ये आज (शनिवार) पहाटे ४.१५ वाजता दरड कोसळल्याने हजरत निजामुद्दीन – मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरल्याने, कोकण रेल्वे वाहतूक थांबली आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
राष्ट्राध्यक्ष जो बायडनच्या खात्यावरुन मुलाने दिले होते कॉलगर्लला १८ लाख, रात्रीची कहाणी कशी आली उघडकीस, कॉलगर्लने परत बोलावलेhttps://t.co/VwCqYkosk9
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
या घटनेनंतर कोकण रेल्वेची यंत्रणा घटनास्थळी तत्काळ रवाना झाली आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. या घटनेमध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वे चे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. पुढील काही तासात मार्ग पूर्ववत होईल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.अपघात ऐन बोगद्यात असल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प राहणार आहे.
आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन #surajyadigital #अभिवादन #जयंती #राजर्षी #छत्रपती #शाहूमहाराज #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/p7SOuEkPhY
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021
या घटनेनंतर कोकण रेल्वेची यंत्रणा घटना स्थळी तात्काळ रवाना झाली आहे आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले आहे. यामुळे कोकण रेल्वेच्या मार्गावर विविध गाड्या विविध स्थानकात थांबवण्यात आल्या आहेत. या घटने मध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. पुढील काही तासात मार्ग पूर्ववत होईल असे ही त्यांनी स्पष्ट केले आहे.
सोलापूर : सात रस्ताजवळील हॉटेल लोटस समोरील बाजूस झालेला कारचा भीषण अपघात #accident #solapur #सोलापूर #LOTS #hotel #surajyadigital #हॉटेल #सुराज्यडिजिटल #अपघातhttps://t.co/WfoafZe0CG
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 26, 2021