सोलापूर : कोरोनाच्या नव्या विषाणूंचा प्रादूर्भाव रोखण्याचा उपाय म्हणून शहरात पुन्हा मिनी लॉकडाऊन करण्यात आले आहे. शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व दुकाने सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चार वाजेपर्यंतच खुली राहतील. मॉल व थिएटर पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी दिले. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या महामारीमुळे लॉकडाऊनचा फेरा सुरूच आहे.
आता पुन्हा म्युकर मायकोसिससह तिसर्या लाटेचे आव्हान समोर उभा ठाकले आहे. त्यातच डेल्टा प्लस हा नवा व्हायरस आढळून आल्याने पुन्हा कडक निर्बंध करण्याची वेळ प्रशासनावर आली आहे. शासनाने यासंदर्भात नुकताच तसा निर्णय घेतला आहे.
सिद्धेश्वर एक्प्रेससह सोलापूर विभागातील पाच रेल्वेगाड्या गुरुवारपासून धावणार https://t.co/5XrIpQ1xKO
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
शहरातील हॉटेल, रेस्टाॅरंट पुन्हा एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने सायंकाळी चारपर्यंत सुरू राहतील. चार ते रात्री ११ पर्यंत केवळ घरपोच सेवा देता येईल. सार्वजनिक मैदाने सकाळी ५ ते ९ या वेळेतच सुरू राहतील. मेळावे व इतर सामाजिक कार्यक्रम एकूण क्षमतेच्या ५० टक्के क्षमतेने आणि सोमवार ते शुक्रवार सायंकाळी चारपर्यंतच करण्यात यावेत.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
भारताच्या विजयाचे शिल्पकार सॅम माणेकशॉ यांना विनम्र अभिवादन ! #शिल्पकार #surajyadigital #सुराज्यडिजिटल #india #विजय #सॅममाणेकशॉ #sammamish pic.twitter.com/mFPDpcB8L3
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021
विवाह सोहळ्यासाठी ५० जणांना परवानगी असेल. अंत्यविधीसाठी २० जणांना परवानगी असेल. जीम, सलून, ब्युटी पार्लर, कृषी उपक्रम, मद्यविक्री, फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते सायंकाळी चारपर्यंत सुरू राहतील. सायंकाळी पाचनंतर संचारबंदी असेल.
कोरोना संसर्गात तिसर्या स्तरावर असलेल्या सोलापूर जिल्ह्यात सोमवारपासून (ता. २८ ) पुन्हा कडक निर्बंध लावण्यात आले आहेत. गेल्यावर्षी अनेक दिवस लॉकडाऊन होते. पुन्हा कोरोनाची लाट कमी झाल्यानंतर जानेवारीपासून अनलॉक झाले होते. त्यानंतर पुन्हा मार्च महिन्यात दुसर्या लाटेमुळे लॉकडाऊन जारी करण्यात आले. मे महिन्यात मात्र पुन्हा लाट ओसरल्यानंतर शहरात जूनपासून निर्बंध हटविण्यात आले होते. मात्र, ग्रामीण भागात दुपारी चारपर्यंत सूट देण्यात आली होती.
सोलापूर : लॉकडाऊनमध्ये काळजी घेतली मात्र अनलॉकमध्ये बेजबाबदार का ? पहा सोलापूरची बालकलाकार ओवी तडवळकर काय सांगतीय, ऐका थोडं… #ovi #ओवी #लॉकडाऊन #surajyadigital #lockdown #Unlock #solapur #सोलापूर #care #listen #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/WcAL7qtszq
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 27, 2021