मुंबई : भारत आणि इंग्लंड महिला संघामध्ये पहिला वनडे सामना खेळला गेला. या सामन्यात भारतीय महिला संघाचा पराभव झाला. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना इंग्लंडसमोर 202 धावांचे आव्हान ठेवले होते. इंग्लंडने 8 गडी राखून हे आव्हान पूर्ण केले. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली.
26 Jun 2021 Bristol(UK). ENG vs INDIA 1st ODI. India 201/8 (Mithali Raj 72, Punam Raut 32, Deepti Sharma 30,Sophie Ecclestone 3/40). England 202/2(34.5 overs) (Tammy Beaumont 87*,Nat Sciver 74* and Heather Knight 18) pic.twitter.com/rGR0VT1mZC
— Indian Women's Cricket Fans Network (@IWCFG) June 27, 2021
मात्र भारतीय महिला क्रिकेटपटू शेफाली वर्माने इतिहास रचला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षीय शेफालीने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात डेब्यू केला. यासह क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (वनडे, टेस्ट, टी-20) सर्वात कमी वयात खेळणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली. 17 वर्ष आणि 150 दिवसांनी ती पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली.
भारतीय महिला क्रिकेटपटू शेफाली वर्माने रविवारी इतिहास रचला. वयाच्या अवघ्या 17 व्या वर्षीय शेफालीने इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय सामन्यात डेब्यू केला. यासह ती क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये (वनडे, टेस्ट, टी-20) सर्वात कमी वयात खेळणारी ती पहिली भारतीय खेळाडू ठरली.
ESPCRICINFO:Shafali Verma and her debut dates. pic.twitter.com/qV7ROZYKgg
— Indian Women's Cricket Fans Network (@IWCFG) June 27, 2021
भारत आणि इंग्लंड महिला क्रिकेट संघात ब्रिस्टलमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात यजमान इंग्लंडने भारताचा आठ गडी राखून पराभव केला. यासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली. भारतीय संघाने प्रथम खेळताना 50 षटकांत केवळ 201 धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल इंग्लंडने लक्ष्याचा पाठलाग करताना दोन विकेट गमावत 15 ओव्हर्स राखून विजय मिळवला.
Two players are making their ODI debuts 👇
🏴 Sophia Dunkley
🇮🇳 Shafali Verma#ENGvIND pic.twitter.com/BxWZ74ukug— ICC (@ICC) June 27, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल‘ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
इंग्लंडकडून टॅमी ब्यूमॉन्टने नाबाद 87 आणि नताली स्कायव्हरने नाबाद 74 धावांची निर्णायक खेळी केली. टॅमीने तिच्या खेळीत 11 चौकार आणि दोन षटकार ठोकले तर नतालीने 10 चौकार आणि एका षटकार लगावला. इंग्लंडकडून लॉरेन हिलने 16 आणि हेदर नाइटने 18 धावा केल्या. भारताकडून झुलन गोस्वामी आणि एकता बिष्टने प्रत्येकी एक विकेट घेतली. दोन्ही संघांमधील दुसरा एकदिवसीय सामना 30 जून रोजी टॉन्टनमध्ये खेळला जाईल.
England win the toss and will bowl first!
ODI debuts for both Sophia Dunkley and Shafali Verma. If the Test is anything to go by, this should be a good one.
📱https://t.co/GzvLkcFm1S#bbccricket #ENGvIND pic.twitter.com/JCyCMsf88Y
— Test Match Special (@bbctms) June 27, 2021
टीम इंडियाची कर्णधार मिताली राजने आज आपल्या कारकीर्दीच्या 22 व्या वर्षात प्रवेश केला. तिने आज शानदार अर्धशतक झळकावलं. मितालीच्या खेळीच्या जोरावर टीम इंडियाने इंग्लंडसमोर 202 धावांचे लक्ष्य ठेवलं होतं. मितालीने 108 चेंडूत 72 धावा केल्या. तर पूनम राऊतने 32 तर दिप्ती शर्माने 30 धावांची खेळी केली. याशिवाय पूजा वस्त्राकरने आणि शेफाली वर्मा यांनी 15-15 धावा केल्या. इंग्लंडकडून सोफी इक्लेस्टनने तीन तर कॅथरीन ब्रंट आणि ॲन्या सुब्रसोल यांनी प्रत्येकी दोन विकेट घेतल्या.
Shafali Verma and Sophia Dunkley make their ODI debuts today 👊https://t.co/79lXecYBtJ | #ENGvIND pic.twitter.com/YvIlmNL5Ly
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) June 27, 2021
शेफाली वयाच्या 17 वर्ष आणि 150 दिवसांनी तिचा पहिला एकदिवसीय सामना खेळण्यासाठी मैदानात उतरली. मात्र पहिल्या सामन्यात ती जास्त वेळ खेळपट्टीवर टिकू शकली नाही. ती केवळ 15 धावा करुन बाद झाली. याशिवाय शेफालीने वयाच्या 15 वर्ष 239 दिवसाची असताना पहिला टी 20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. तसेच 17 वर्ष आणि 139 दिवसांची असताना तिने कसोटी सामन्यात पदार्पण केले होते. शेफालीने आतापर्यंत 22 टी -20 आंतरराष्ट्रीय सामने आणि एक कसोटी सामना खेळला आहे. यासह शेफालीने अवघ्या 17 व्या वर्षी आपल्या कामगिरीने क्रिकेट विश्वाचं लक्ष आपल्याकडे वेधलं आहे.
Sophia Dunkley and Shafali Verma – two of the stars of the recent #ENGvIND Test – make their ODI debuts today at Bristol. pic.twitter.com/dJ1LQR9F3U
— Wisden (@WisdenCricket) June 27, 2021
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या एकदिवसीय सामन्यात इंग्लंडच्या महिला क्रिकेट संघाची कर्णधार हेदर नाइटने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. शेफाली वर्माने भारताकडून पदार्पण केले तर शिखा पांडे आणि तानिया भाटिया यांनी संघात पुनरागमन केले. त्याचवेळी सोफिया डन्कले इंग्लंडकडून पदार्पण केले. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाची सुरुवात खराब झाली. डेब्यू सामन्यात शेफालीने 14 चेंडूत तीन चौकारांच्या मदतीने 15 धावा केल्या.
A proud moment for our thunderbolt @TheShafaliVerma as she is presented with #TeamIndia 🧢 131 from captain @M_Raj03. Here's hoping she has a smashing debut.💪 #ENGvIND pic.twitter.com/ZsmL9Jb68Y
— BCCI Women (@BCCIWomen) June 27, 2021