रायगड : रायगड जिल्ह्यातील पर्यटनस्थळ माथेरान अनलॉक करण्यात आले आहे. जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी हा निर्णय घेतला आहे. केवळ पर्यटनावरच इथल्या नागरिकांचे संपूर्ण जीवनमान अवलंबून आहे. तसेच, येथील बहुतांश लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. लॉकडाऊनमुळे कंटाळून गेलेल्या पर्यटकांना निर्धास्तपणे माथेरानच्या सान्निध्यात भटकंती करता येणार आहे. तसेच, पर्यटकांमुळे इथल्या लोकांना रोजगार उपलब्ध होणार आहे.
देहू, आळंदीत सात दिवस वाहतूक बंद, राहणार संचारबंदी https://t.co/UEONZiOUn2
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 28, 2021
रायगड जिल्ह्यातील कोरोना रुग्णांची संख्या मंदावली असून पर्यटनस्थळ माथेरानमध्येसुद्धा बहुतांश लोकांचे लसीकरण पूर्ण झालेले आहे. केवळ पर्यटनावर इथल्या नागरिकांचे संपूर्ण जीवनमान अवलंबून असते. त्यामुळे रायगड जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी माथेरान अनलॉक करण्याचा निर्णय घेतला.
https://twitter.com/limirose/status/1409370093750947848?s=19
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
लॉकडाऊनच्या या काळातील एक प्रकारच्या निर्बंधावासात असल्याने अक्षरशः कंटाळून गेलेल्या पर्यटकांना निर्धास्तपणे माथेरानच्या सान्निध्यात भटकंती करता येणार आहे.पर्यटकांच्या आगमनामुळे इथल्या सर्वसामान्य लोकांना रोजगार उपलब्ध होणार असल्याने सर्वांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
#indiacricketwomen
भारतीय महिला संघाचा पराभव, मात्र शेफालीने रचला इतिहास https://t.co/9FxSUWQHcq— Surajya Digital (@SurajyaDigital) June 28, 2021
कोरोनाच्या कालावधीत संपूर्ण महाराष्ट्राबरोबर माथेरानही लॉकडाऊन झाले. त्यामुळे पर्यटनावर संपूर्णत: अवलंबून असणाऱ्या माथेरानकर नागरिकांचे अर्थकारण पूर्णपणे कोलमडले आहे. अतिशय सामान्य जीवन जगणारे माथेरानकर पुरते हतबल झाले असून, पर्यटन सुरु झाल्यामुळे सर्वाच्या उपजीविकेचा प्रश्न सुटेल. येथील लोकांचा रोजगार पूर्ण ठप्प झाला होता. अनलॉक झाल्यामुळे चांगल्या प्रकारे रोजगार उपलब्ध होईल, नागरिकांनीसुद्धा शासनाचे सर्व नियम, अटींचे पालन करावे, असं आदेश देण्यात आले आहेत.
The majestic Kadyavarcha Ganpati, carved out of a single boulder !
Nestled amidst the lush greenery of Matheran in Maharashtra, is a massive Murti of Bhagwan Ganesh.
Ganapati Bappa Morya🙏 pic.twitter.com/VCrcSjoyQX
— Raghu (@IndiaTales7) June 28, 2021