बीड : बीडमधील तरुणाला उत्तर प्रदेशात बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणी अटक झाली आहे. बेकायदेशीर धर्मांतर प्रकरणात युपी पोलिसांनी तिघांना अटक केलीय. त्यात बीडच्या इरफान पठाण याचा समावेश आहे. यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडालीय. या प्रकरणात इरफानचा खरोखर समावेश आहे की नाही हे समोर आलेलं नाहीये. अटक केलेले तरुण विशिष्ट कोडवर्डचे वापर करत होते. 6 कोडवर्ड डी कोड केले आहेत. मात्र, सातवा कोडवर्ड डी कोड झालेला नाही.
ठाकरे सरकारची मोठी घोषणा, 400 कोटींचं व्याज माफ https://t.co/U1RJz5Hfpn
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 29, 2021
मिळालेल्या माहितीनुसार, अटक करण्यात आलेले तरुण हे विशिष्ट अशा कोडवर्डचे वापर करत होते. एकूण सात कोडवर्डपैकी एटीएसने सहा कोडवर्ड डी कोड केले आहेत. मात्र, अद्याप सातवा कोडवर्ड डी कोड झालेला नाहीये. या प्रकरणात हवाला रॅकेटही असल्याचं वृत्त समोर येत आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
* पंतप्रधान मोदींनी केले होते कौतुक
गुजरातमधील अहमदाबाद येथे आयोजिक करण्यात आलेल्या एका कार्यक्रमात इरफान पठाण याने केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या अटक केलेल्या इरफान पठाणचे कौतुक केलं होतं. इरफानच्या नातेवाईकांनी सांगितले की, व्यासपीठावर सर्वांच्या समोर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इरफान पठाण याचं कौतुक करत शुभेच्छा दिल्या होत्या. या संदर्भातील व्हिडीओ सुद्धा त्याच्या नातेवाईकांनी शेअर केला आहे.
* कोण आहे हा इरफान पठाण
इरफान हा मूळचा बीड जिल्ह्यातील परळी तालुक्यातील शिरसाळा या ठिकाणचा आहे. तो सध्या दिल्ली या ठिकाणी वास्तव्यास आहे. इरफान खां पठाणचा जन्म 1886 मध्ये परळीच्या सिरसाळामध्ये झाला. प्राथमिक शिक्षण परळीच्या जिल्हा परिषद शाळेत झाले. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण वैद्यनाथ महाविध्यालयात झाले. बारावीनंतर इरफान मुंबईला शिक्षणासाठी गेला. 2013 पासून केंद्र सरकारच्या चाईल्ड वेलफेअरमधील साईन लँग्वेज साठी काम करत होता. 2015 साली परळीतील मुली सोबत इरफानचे लग्न झाले. फेब्रुवारी 2020 मध्ये अहमदाबादमध्ये नरेंद्र मोदी यांनी इरफान च्या कामाचे कौतुक केले होते.