सोलापूर : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक करण्यात आली आहे. ओबीसी आरक्षण जनजागृती दौऱ्यावेळी घोंगडी बैठकीसाठी पडळकर सोलापुरात आले होते. त्यावेळी त्यांच्या ताफ्यावर दगडफेक झाली. सोलापुरातील श्री शैल्य हक्क महादेव मंदिर इथं ही घटना घडली आहे. या दगडफेकीत पडळकर यांच्या गाडीच्या काचा फुटला.
गाडीवर आज (बुधवार) रात्री 8 च्या सुमारास काही समाजकंटकांकडून मोठ्या प्रमाणात दगडफेक करण्यात आली. हा प्रकार सोलापूर शहरातील मड्डी वस्ती परिसरात घडला आहे. या घटनेमुळे ताणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. घटनेची माहिती मिळताच सोलापूर शहर पोलिस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली.
रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, सुसंस्कार मला शिकवण्याची गरज नाही – आमदार पडळकर #surajyadigital #political #सुराज्यडिजिटल #politics #Solapur #सोलापूरhttps://t.co/ylgPIglVcK
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021
गोपीचंद पडळकर हे सोलापूर दौऱ्यावर घोंगडी बैठकीसाठी आले होते. सकाळी सोलापूरामध्ये त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती. यातूनच हा प्रकार घडला असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्ह्यातील भाजपचे कार्यकर्ते पडळकर यांच्या भेटीसाठी दाखल झाले आहेत. या हल्ल्यात गोपीचंद पडळकर यांना कोणतीही इजा झाली नसून त्यांची तब्येत उत्तम आहे.
शरद पवार हे साडेतीन जिल्ह्याचे स्वामी, मला संस्कार शिकवण्याची गरज नाही
https://t.co/g7ULJteTBV— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021
पडळकर हे शरद पवार आणि पवार कुटुंबीयांवर नेहमीच आरोप करत असतात, माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवार यांच्यावर टिका केली होती.
“शरद पवार हे भावी पंतप्रधान आहेत हे मी लहानपणापासून ऐकत आलोय मात्र त्यांना त्यासाठी शुभेच्या, आणि राष्ट्रवादी ही केवळ साडेतीन जिल्ह्याची पार्टी आहे असा आरोप पडळकरांनी केला होता.”
तीन खासदार अन साडेतीन जिल्ह्याचा पक्ष असणाऱ्या ‘भावी’ पंतप्रधान शरद पवार यांना पुढील तीस वर्षांच्या ‘भावी’ पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत.@PawarSpeaks@BJP4Maharashtra pic.twitter.com/M6fUo8xVQb
— Gopichand Padalkar (Modi Ka Parivar) (@GopichandP_MLC) June 30, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पतीच्या आकस्मित निधनाने मंदिरा बेदीला धक्का; मुंबईत पार पडले अंत्यसंस्कार https://t.co/8qb7m9gFwK
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021
दरम्यान या घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळी जाऊन परिस्थितीची पाहणी केली. यानंतर पडळकर हे सात रस्ता येथील शासकीय विश्रामगृहाकडे रवाना झाले. त्या ठिकाणी त्यांच्या समर्थकांनी “एकच छंद गोपीचंद’, “भारतीय जनता पार्टीचा विजय असो’ अशी घोषणाबाजी केली.
* पडळकरांची प्रतिक्रिया
या हल्ल्यानंतर पडळकरांनी प्रतिक्रिया देताना प्रस्थापितांवर हल्लाबोल केला आहे. विचारांची लढाई विचारांनी लढायला पाहिजे. परंतु दगडफेक केली आहे. उद्या जरी गोळ्या घातल्या तरी भूमिका मांडण्यापासून थांबणार नाही, असा इशारा गोपीचंद पडळकर यांनी यावेळी दिला आहे. पडळकर मागील काही दिवसांपासून राज्यातील नागरिकांचे प्रश्न मांडत असल्याने चर्चेत आले आहेत.
पडळकर पुढे म्हणाले, या हल्ल्याच्या पाठीमागे कोणाचा हात आहे याबाबत राज्याला माहित आहे. मागील काही दिवसांपासून राज्यभर नागरिकांच्या बाजूने बोलत आहे. त्यांची बाजू मांडत आहे. प्रस्थापितांच्या विरोधात जाहीरपणे बाजू मांडल्यामुळे त्यांना आवडले नसेल. ते जे सगळे गप्पा मारतात लोकशाहीचे, फुले-शाहू-आंबेडकरांचे त्यांच हेच उत्तर आहे का ? अशा पद्धतीन उत्तर द्यायचे आहे का ? वैचारिक लढाई आहे तर विचाराने चला असे गोपीचंद पडळकर यांनी म्हटले.
सोलापूर : भाजपला लोक वैतागलेत, भाजपचे नगरसेवक असक्षम, कोणत्या पदाची अपेक्षा ? आमदार प्रणिती शिंदे काय म्हणतात ? #surajyadigital #politics #सुराज्यडिजिटल #राजकीय #Solapur #सोलापूर #वैतागले #MLA #pranitishindehttps://t.co/4V2CvHUKK1
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021