सोलापूर : भाजपचे विधानपरिषदेचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली आहे. शरद पवार हे साडेतीन जिल्ह्यांचे स्वामी आहेत. त्यांचे तीन खासदार आहेत, त्यांना मोठं कोण मानणार तुम्ही मानणार असाल तर मला त्याचं देणंघेणं नाही, असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी शरद पवार यांच्यावर टीका केली आहे.
रात गेली हिशोबात पोरगं नाही नशिबात, सुसंस्कार मला शिकवण्याची गरज नाही – आमदार पडळकर #surajyadigital #political #सुराज्यडिजिटल #politics #Solapur #सोलापूरhttps://t.co/ylgPIglVcK
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021
गोपीचंद पडळकर सोलापूर येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. गोपीचंद पडळकर पुढे म्हणाले, ही लोकशाही आहे. या राज्यात भाजप हा सर्वात मोठा पक्ष आहे. या राज्यात सर्व ओबीसी समाजापर्यंत जाणं हे माझं काम आहे. मला ओबीसींचा नेता म्हणावं असं माझं म्हणणं नाही, असेही पडळकर यांनी यावेळी स्पष्ट केलं.
महाविकास आघाडीचं सरकार आल्यापासून समाजात तेढ वाढवण्याचा प्रयत्न करत आहे. मूठभर लोकांकडून बहुजनांचा आवाज दाबला जात आहे. ओबीसींना दिलेले संविधानिक अधिकार हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यांच्या संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गोपीचंद पडळकर यांनी तिसऱ्या आघाडीवरुन शरद पवार यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, मी लहान असल्यापासून ऐकतो आहे शरद पवार पंतप्रधान होणार. मागील 30 वर्षापासून ते भावी पंतप्रधान आहेत. त्यांना भावी पंतप्रधानपदासाठी शुभेच्छा आहेत, असा टोला गोपीचंद पडळकर यांनी लगावला.
सोलापूर : भाजपला लोक वैतागलेत, भाजपचे नगरसेवक असक्षम, कोणत्या पदाची अपेक्षा ? आमदार प्रणिती शिंदे काय म्हणतात ? #surajyadigital #politics #सुराज्यडिजिटल #राजकीय #Solapur #सोलापूर #वैतागले #MLA #pranitishindehttps://t.co/4V2CvHUKK1
— Surajya Digital (@SurajyaDigital) June 30, 2021
* मला संस्कार शिकवण्याची गरज नाही
बाळासाहेब थोरात यांची कन्या शरयू देशमुख यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर टीका केली होती. पात्रतेपेक्षा जास्त भेटलं की असं होतं, असं म्हणत शरयू देशमुख यांनी पडळकरांना संस्कार शिकवले होते. यावर बोलताना पडळकर म्हणाले, राज्यातील काही घराणे हे अतिसुसंस्कृत आहेत. मी एका शिक्षकाचा मुलगा आहे. तुमच्या विरोधात बोललो की लगेच असंस्कृतपणा दिसतो. त्यामुळे मला संस्कार शिकवण्याची गरज नाही, असे प्रत्युत्तर पडळकर यांनी दिले.