मुंबई : बॉलिवूडचं प्रसिद्ध कपल अभिनेता आमिर खान आणि पत्नी किरण राव यांनी नुकताच घटस्फोट जाहीर केला आहे. त्यामुळे चाहत्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. आमिरने आधी रिना दत्ता हिच्याशी विवाह केला होता. त्यांना एक मुलगा आणि मुलगी ही आहे. 2002 साली ते विभक्त झाले. त्यानंतर किरण आणि आमिर एकत्र आले. या दोघांमध्ये 8 ते 9 वर्षांचे अंतर आहे. पाणी फाउंडेशनसाठी त्यांनी एकत्र काम केलं आहे.
Amir khan is so perfectionist that he marries and mutually gets divorce easily without any complications.
Very soon we will hear good news about his new marriage with next 15 years validity.— Preet (@pinkythename) July 3, 2021
अभिनेता आमिर खान आणि किरण राव यांनी घटस्फोटाचा निर्णय जाहीर केला आहे. यानंतर सोशल मीडियामध्ये चर्चांना उधाण आले आहे. काही दिवसांपूर्वी आमिरचे नाव अभिनेत्री फातिमा सना शेखसोबत जोडले गेले होते. आता आमिरच्या घटस्फोटाची बातमी समोर येताच फातिमा आणि आमिर यांच्या नावाची चर्चा पुन्हा सुरू झाली आहे. फातिमाने दंगल या सिनेमात आमिरसोबत अभिनय केला होता.
ईडीची कारवाई; अभिनेता दिनो मोरया, अहमद पटेल यांच्या जावयाची संपत्ती जप्त
https://t.co/xh1mmvfUdg— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021
अभिनेता आमिर खान आणि त्याची पत्नी किरण राव यांनी एकमेकांपासून वेगळं होण्याचा निर्णय घेतला आहे. 15 वर्षांनी त्यांनी विभक्त होण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी घटस्फोटाविषयी अधिकृत स्टेटमेंटही जारी केलं आहे. मात्र, मुलासाठी आम्ही समर्पित पालक म्हणून कायम राहणार आहोत. आम्ही मुलगा आझादचा एकत्र सांभाळ करू, असंही त्यांनी म्हटलं आहे. मात्र, आझादचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला होता.
दु:खद घटना ! कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, पहा व्हिडिओ
https://t.co/baLwdRcUQC— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021
किरण राव आणि आमिर खान यांचा मुलगा आझाद हा सध्या दहा वर्षांचा आहे. आझादचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला होता. किरणच्या गर्भधारणेत अडचणी आल्यामुळे सरोगसीचा निर्णय या जोडप्यानं घेतला होता. त्यानंतर 2011 मध्ये आझादचा जन्म झाला होता. आता आमिर आणि किरण वेगळे होत असले तरीही आझादसाठी ते समर्पित पालक म्हणून कायम राहाणार आहेत, असं त्यांनी स्पष्ट केलं आहे.
अभिनेत्री यामी गौतमला ईडीचे समन्स; अटक होण्याची शक्यता https://t.co/BvQ2c4Jv6T
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 2, 2021
दोघांनी आपल्या स्टेटमेंटमध्ये लिहिले. आहे की, ‘आम्ही वेगळे होत आहोत. पण, मुलासाठी आम्ही समर्पित पालक म्हणून कायम राहणार आहोत. आम्ही मुलगा आझादचा एकत्र सांभाळ करू. भविष्यात आम्ही एकत्र कामदेखील करत राहू. गेल्या 15 वर्षांचा आमचा सहवास खूप चांगला होता. या पंधरा वर्षाच्या काळात आम्ही संपूर्ण जीवनाचा आनंद घेतला आहे. आमचं नातं विश्वास, आदर आणि प्रेमावर टिकून राहिलं. आता आम्ही एका नव्या जीवनाची सुरुवात करणार आहोत मात्र पती आणि पत्नी म्हणून नाही.
दु:खद घटना ! कला दिग्दर्शक राजू सापते यांची आत्महत्या, ऐका कारण, त्यांच्या तोंडून #sucide #आत्महत्या #director #दिग्दर्शक #surajyadigital #घटना #सुराज्यडिजिटलhttps://t.co/eMEKDuGlQX
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 3, 2021