Monday, August 8, 2022
सुराज्य डिजिटल
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
  • ब्लॉग
  • अर्थाअर्थ
  • शिवार
  • Techनिक
No Result
View All Result
Surajya Digital
No Result
View All Result

आमदार पडळकरांच्या गाडीवर दगडफेक का केली ? दोघांना घेतले ताब्यात

Surajya Digital by Surajya Digital
July 4, 2021
in Hot News, सोलापूर
6
आमदार गोपीचंद पडळकरांच्या गाडीवर सोलापुरात दगडफेक
0
SHARES
3
VIEWS
Share on FacebookShare on Twitter

सोलापूर : आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगडफेक केल्याचा निषेध व्यक्‍त करीत त्यांच्या समर्थकांनी शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयावर दगडफेक केली. त्यामुळे त्या दोघांना पकडण्याचे आव्हान पोलिसांसमोर होते. दोन दिवसांपासून जोडभावी पेठ पोलिस व गुन्हे शाखेचे पोलिस त्यांच्या मागावर होते.

आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवरील हल्लाप्रकरणी या दोघांना शनिवारी गुन्हे शाखेने अटक केली. त्यांना जोडभावी पेठ पोलिसांच्या ताब्यात दिले आहे. ते दोघेही बक्षीहिप्परगा येथील एका शेतातील झाडाखाली असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर व त्यांच्या पथकातील शंकर मुळे, राजेश चव्हाण, विद्यासागर मोहिते, सुहास अर्जुन, सनी राठोड, राहूल गायकवाड, विजयकुमार वाळके यांनी संशय येणार नाही, असा शेतकऱ्यांचा वेश धारण केला. सापळा रचून त्या दोघांना शिताफीने पकडले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

”मी कोणाच्याही सांगण्यावरून नव्हे तर माझ्या स्वत:च्या प्रसिद्धीसाठीच आमदार गोपीचंद पडळकर यांच्या गाडीवर दगड टाकला’, असे संशयित आरोपी अमित सुरवसेने पोलिसांना सांगितले. तर “मला काहीच माहिती नव्हते, अमित चल म्हणाला म्हणून मी त्याच्यासोबत गेलो होतो,’ अशी कबुली नीलेश क्षीरसागर याने दिली.

यासंदर्भात आणखी तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक बाळासाहेब भालचिम दिली.

आमदार गोपीचंद पडळकर हे घोंगडी बैठकीसाठी 30 जून रोजी सोलापुरात आले होते. तत्पूर्वी, त्यांनी पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार व आमदार रोहित पवार यांच्यावर टीका केली होती. त्यावर नाराज होऊन अमितने दगडफेकीचा प्लॅन केला, असा पोलिसांना संशय आहे. त्यानुसार पोलिसांनी आता तपास सुरू केला.

दरम्यान, हल्ल्यानंतर दोघेही पसार झाले होते. सायबर क्राईमच्या मदतीने त्यांच्या मोबाईलचे लोकेशन पाहण्यात आले. पहिल्या दिवशी सावळेश्‍वर (ता. मोहोळ) टोल नाक्‍यापर्यंत तर पुन्हा त्याच परिसरात व सात रस्ता परिसरात त्यांचे लोकेशन दाखविले. आज शनिवारी (ता.3) पोलिसांना ते दोघेही बक्षीहिप्परगा येथील शेतात असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचला आणि दोघांनाही पकडले. गुन्हे शाखेचे पोलिस उपनिरीक्षक शैलेश खेडकर यांच्या पथकाने ही कारवाई केली.

घटनेनंतर अमित सुरवसे व नीलेश क्षीरसागर यांनी सोलापूर शहरातून काढला पळ काढला. सावळेश्‍वर टोल नाक्‍यावर सीसीटीव्ही असल्याने त्यांनी मार्ग बदलला. गेली दोन दिवस त्यांचा दहिटणे, बक्षिहिप्परगा व सोलापूर शहर परिसरात दुचाकीवरून वावर सुरू होता. मास्क लावून हॉटेलमधून पार्सल जेवण घेऊन जायचे. एखाद्या शेतात मुक्‍काम करायचे.

अमित सुरवसे व नीलेश क्षीरसागर हे दोघेही बक्षीहिप्परगा याठिकाणी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यामुळे संशय येऊ नये म्हणून पोलिसांनी वेशांतर केले. चक्क शेतकऱ्याचा वेष धारण करून गुन्हे शाखेचे पथक त्यांच्याजवळ पोचले. अगदी जवळ आल्यानंतर त्या दोघांना ते पोलिस असल्याचे समजले. मात्र तोपर्यंत ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले होते.

Tags: #MLA #throwstones #Padalkar's #car #Both #custody#आमदार #पडळकरांच्या #गाडीवर #दगडफेक #दोघांना #ताब्यात
Previous Post

वनिता खरातनंतर ‘सैराट’ फेम तानाजी गलगुंडेचा न्यूड फोटोशूट

Next Post

मराठा आक्रोश मोर्चा : आमदार आवताडे आणि पोलीसात शाब्दिक खडाजंगी

Surajya Digital

Surajya Digital

Next Post
मराठा आक्रोश मोर्चा : आमदार आवताडे आणि पोलीसात शाब्दिक खडाजंगी

मराठा आक्रोश मोर्चा : आमदार आवताडे आणि पोलीसात शाब्दिक खडाजंगी

Comments 6

  1. zortilonrel says:
    9 months ago

    Currently it sounds like Movable Type is the top blogging platform out there right now. (from what I’ve read) Is that what you are using on your blog?

  2. best nutribullet blenders says:
    7 months ago

    Exceptional post but I was wondering if you could write a litte more on this subject? I’d be very grateful if you could elaborate a little bit more. Thank you!

  3. chiminea buying guide says:
    7 months ago

    When visiting blogs, i always look for a very nice content like yours .    

  4. Reginia Mcshaw says:
    6 months ago

    i love food and drinks that are very tasty. i do eat a lot and drink a lot of alcohol these days.

  5. Chau Grever says:
    6 months ago

    I enjoy what you guys are up too. Such clever work and reporting! Keep up the great works guys I’ve incorporated you guys to my blogroll.

  6. Clotilde Woyahn says:
    6 months ago

    Will not simply turn a very important thing such as duty money back guarantee towards a bad thing enjoy i . d break-ins.

वार्ता संग्रह

July 2021
M T W T F S S
 1234
567891011
12131415161718
19202122232425
262728293031  
« Jun   Aug »

ट्विटर पेज

Currently Playing

About Us

SurajyaDigital
सुराज्य डिजिटल हा ब्रँड जगाच्या काना-कोपऱ्यातील सर्वंकष माहितीचा अचूक खजिना आपल्यापर्यंत पोहोंचविण्याचे काम करतोय. टाईम मीडिया हाऊसचा हा ब्रँड अल्पावधीतच मराठी वाचकांचा अत्यंत विश्वासार्ह ब्रँड बनला आहे.जगभरातील घटनांचा वेगवान आढावा घेत त्यावर भाष्य करण्याबरोबरच वाचकांच्या आवडीचे विषय, करमणूक यासारखे दृक्श्राव्य व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी सुराज्य डिजिटल कटीबद्ध आहे. अधिक माहितीसाठी संपर्क करा timemediahouse@gmail.com timemarathi@gmail.com
  • Home
  • About Us
  • Contact Us
  • Disclaimer
  • Privacy Policy

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697

No Result
View All Result
  • होम
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर

© 2021 Surajya Digital All Rights Reserved Website Design & Developed By Digi Buffalo 9028927697