सोलापूर : मराठा समाजाचा आरक्षण सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवल्यानंतर मराठा समाज मोठ्या प्रमाणात आक्रोश करत असल्याचं संपूर्ण महाराष्ट्रभर पाहायला मिळत आहे. आज सोलापूर मध्ये मराठा आक्रोश मोर्चा आयोजित करण्यात आला होता.
या मोर्चासाठी छत्रपती संभाजीराजे भाजपा नेते नारायण राणे व छत्रपती उदयनराजे यांनादेखील आमंत्रित करण्यात आलं होतं. पण यापैकी कोणीही आंदोलनाला उपस्थित राहिले नाही. त्यामुळे नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडलं. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर शहरांमध्ये आज संचारबंदी लागू करण्यात आली होती.
मराठा आक्रोश मोर्चा : आमदार आवताडे, कल्याणशेट्टी, मोहिते – पाटील यांनी केले ठिय्या आंदोलन https://t.co/3Az6IYo8sf
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021
मराठा आरक्षण मिळावे यासाठी सोलापुरात आज, 4 जुलै रोजी मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. मोठ्या संख्येने आंदोलक यात सहभागी झाले. सोलापुरातील छत्रपती संभाजी महाराज चौक येथून जिल्हाधिकारी कार्यालयपर्यंत हा मोर्चा निघाला. नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. या मोर्चाच्या निमित्तानं शहरात येणारे सर्व मार्गवर नाकेबंदी करण्यात आली होती तर मराठा आक्रोश मोर्चाला सोलापूर शहर पोलीसांनी परवानगी नाकारली होती. मात्र असं असलं तरी मराठा आक्रोश मोर्चा काढणारच अशी भूमिका आयोजकांनी घेतली होती. त्यानुसार आजचा मोर्चा निघाला.
या मोर्चाला नरेंद्र पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, खासदार डॉ. जयसिद्धेश्वर शिवाचार्य,आमदार विजयकुमार देशमुख, आमदार राम सातपुते,आमदार राजेंद्र राऊत, राजेंद्र मिरगणे, महापौर श्रीकांचना यन्नम, पंढरपूरचे आमदार समाधान अवताडे,रणजितसिंह मोहिते पाटील,प्रशांत परिचारक माजी मंत्री लक्ष्मणराव ढोबळे उपस्थित होते.
कोरोनाचा संसर्ग पाहता प्रशासनाच्यावतीने या मोर्चाला परवानगी नाकारण्यात आली होती. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी लागू करण्यात आली होती. सोलापूर शहरात नागरिकांनी विनाकारण बाहेर फिरू नये, असे आवाहन पोलिसातर्फे करण्यात आले होते. दुसरीकडे मोर्चाच्या पार्श्वभूमीवर तगडा बंदोबस्त शहर आणि ग्रामीण हद्दीत तैनात करण्यात आला होता.
सोलापूर – …संभाजीमहाराजांचं आक्राळ विक्राळ रुप दाखवायला लावू नका #surajyadigital #MarathaReservation #सुराज्यडिजिटल #solapur #संचारबंदी #सोलापूर pic.twitter.com/AmyXa4zgpS
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021
सोलापूर शहर आणि ग्रामीण मध्ये जवळपास 4 हजार पोलीस कर्मचारी आणि अधिकाऱ्यांचा फौजफाटा तैनात करण्यात आला होता. तर शहरात येणारे सर्व प्रमुख मार्ग पोलिसांच्या वतीने सील करण्यात आले होते. मोर्चा ज्या मार्गाने जाणार आहे त्या संपूर्ण मार्गावर सीसीटीव्ही लावण्यात आले होते. या बंदोबस्तामध्ये सोलापूर शहर आणि ग्रामीण पोलीस, एसआरपीएफच्या तुकड्या, होमगार्ड, सातारा, सांगली, उस्मानाबाद इत्यादी ठिकाणाहून पोलिसांची अतिरिक्त कुमक मागवण्यात आली होती.
मराठा आक्रोश मोर्चा : आमदार आवताडे आणि पोलीसात शाब्दिक खडाजंगी https://t.co/Tu0Vo2QeGv
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021
* पुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढला जाईल – नरेंद्र पाटील
नरेंद्र पाटील म्हणाले की, आजच्या मोर्चात सहभागी झालेल्या एकही तरुणावर गुन्हा दाखल करू नका. गुन्हा दाखल करायचा असेल तर माझ्यावर करा. ब्रिटिश काळात जसे पोलीस वागायचे तसे आता पोलिसांनी तसेच केले. आजचा मोर्चा यशस्वी झाला, अपेक्षेपेक्षा अधिक संख्येने मराठा बांधव उपस्थित राहिला. आम्ही कुणालाही टार्गेट करत नाही, आम्ही कुणाला टोला लगावला नाही. उदयनराजे, संभाजीराजे, शिवेंद्रसिंहराजे यांना निमंत्रण दिलं होतं. काही कामानिमित्त आले नसतील, पण त्यांच्या शुभेच्छा आमच्या सोबत आहेत. यापुढचा मोर्चा प्रशासनाला न सांगता काढला जाईल, असंही ते म्हणाले.
सोलापूर : मराठा आक्रोश मोर्चातील काही क्षणचित्रे, पोलिसांत आणि आंदोलकांमध्ये तणाव #solapur #MarathaReservation #सोलापूर #surajyadigital #सुराज्यडिजिटल pic.twitter.com/nJcSZeRZYr
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021