सोलापूर : बसवर दगड फेकून काच फोडून ३० हजार रुपयांचे नुकसान केल्याप्रकरणी दोन जणांविरुद्ध फौजदार चावडी पोलिस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
आषाढी वारी : पंढरपुरात 9 दिवस 9 गावात संचारबंदी https://t.co/VxyOnsYYQH
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 5, 2021
ही घटना रविवारी (४ जुलै) सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास ललित ट्रान्सपोर्ट बाळे सोलापूर येथे घडली.याप्रकरणी दत्तात्रय सुखदेव वाडकर (वय-४६, रा.कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर,जिल्हा सोलापूर) यांनी फौजदार चावडी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यांच्या फिर्यादीवरून अभिषेक केशव कदम (वय-२५,रा.जुनी पोलिस लाइन,मुरारजी पेठ, सोलापूर) व रमेश तुकाराम आवळे (रा.सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विरोधकांनी पायऱ्यावर भरवली अभिरुप विधानसभा, विधीमंडळ परिसरात प्रचंड गोंधळ, विरोधकांना पायऱ्यांवरुन हटवले https://t.co/nIXZAim4tp
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी हे चिंचोली एमआयडीसी सोलापूर येथील महिला कामगारांना घेऊन बस क्रमांक एम.एच.१३ ए.एक्स.९५१६ या बसमधून पुणे सोलापूर हायवे वरून सोलापूर शहराकडे येत होते. त्यावेळी या आरोपींनी मिळवून बस रस्त्यात आडवून समोरच्या काचेवर हातातील दगड फेकून दहशत निर्माण केली. बसच्या काच फोडून तीस हजार रुपयाचे नुकसान केले, असे फिर्यादीत म्हटले आहे. या घटनेची नोंद फौजदार चावडी पोलिस ठाण्यात झाली असून, याचा पुढील तपास पोसई मंद्रुपकर हे करीत आहेत.
'बँक ऑफ इंडिया'मध्ये खाते असेल तर 30 सप्टेंबरपूर्वी करा 'हे' काम #BANKOFINDIA #bank #working #surajyadigital #सुराज्यडिजिटल #30Sep pic.twitter.com/VAnZSSe9yI
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 4, 2021