बार्शी : येथील रेल्वे स्थानक रस्त्यावरील संभाजीनगरमधील एका अल्पवयीन मुलीचे अपहरण झाले असून तिला पुणे येथील मुलाने पळवून नेल्याचा संशय तिच्या पालकांनी शहर पोलिसांमध्ये दिलेल्या फिर्यादीमध्ये व्यक्त केला आहे.
सोलापूर : बसवर दगडफेक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा https://t.co/5HSsNrEEgQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
सिल्व्हर ज्युबिली प्रशालेमध्ये इयत्ता दहावीमध्ये शिकत असलेली ही मुलगी सध्या शाळा बंद असल्याने घरीच आहे. आठ दिवसापूर्वी ती पुणे येथील सर्फराज खान (रा. ताडीवाला रोड, येरवडा) याच्यासोबत फोनवरुन बोलत असल्याचे तिच्या पालकांना आढळून आले होते. त्यानंतर त्यांनी तिला समजावून सांगितले होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
विधानसभा तालिका अध्यक्षपदी काही क्षणा करता सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना बसण्याचा योग आला #MLA #political #surajyadigital #सुराज्यडिजिटल #politics #आमदार #प्रणितीशिंदे #विधानसभा #assembly pic.twitter.com/a9u5OpUwzI
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
3 जुलै रोजी दुपारी 11/30 वाजण्याचे सुमारास ती घरामधून डब्यातील पैसे घेवुन घरातील प्रापंचिक किरकोळ सामान आणण्याकरिता शेजारील किराणा दुकानाला गेली होती. त्यानंतर खूप वेळ झाला तरी घरी परत आली नाही. त्यामुळे तिच्या आई-वडिलांनी शोध घेतला, परंतु तिचा ठावठिकाणा मिळुन आला नाही.
आषाढी वारी : पंढरपुरात 9 दिवस 9 गावात संचारबंदी https://t.co/VxyOnsYYQH
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 5, 2021
त्यानंतर पुणे येथील येरवडा भागात असलेल्या आपल्या नातेवाईकांनाही याची कल्पना दिली. परंतू तिचा अद्याप शोध लागलेला नाही. तिस कोणीतरी अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरुन पळवून नेले आहे, अशी त्यांची खात्री झाली असून ती यापूर्वी फोनवर बोलत असलेल्या सर्फराज खान रा. ताडीवाला रोड येरवडा, पुणे याच्यावर त्यांनी संशय व्यक्त केला आहे.
मराठा आरक्षण, ओबीसींचे राजकीय आरक्षण, MPSC विद्यार्थ्याची आत्महत्या, शेतकऱ्यांचे प्रश्न आदी प्रश्नांवर विधानभवनाच्या पायऱ्यांवर घोषणा देताना आमदार #भाजपा #politics #surajyadigital #सुराज्यडिजिटल #mpsc #MarathaReservation pic.twitter.com/r6mGsEcvmq
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 5, 2021