माढा : नुकत्याच दिलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार ओबीसींचे राजकीय आरक्षण धोक्यात आल्याने माढा शहरात अखिल भारतीय समता परिषद व ओबीसी आरक्षण संघर्ष समिती माढा शहर यांच्या वतीने आज मंगळवार छत्रपती शिवाजी महाराज चौकात रास्ता रोको करुन चक्का जाम आंदोलन केले.
संभाजीनगरमधील अल्पवयीन मुलीचे अपहरण, पुण्याच्या मुलावर संशय https://t.co/3Jedq22vMq
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
यावेळी महापुरूषांच्या जयघोषाने व ओबीसींच्या आरक्षणाच्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. समता परिषदेचे प्रदेश उपाध्यक्ष जयंत भंडारे, जिल्हाध्यक्ष आबासाहेब खारे, जिल्हा उपाध्यक्ष सतीश शिरसकर, पश्चिम विभाग प्रमुख कुंडलिक माळी, नगरसेवक चंद्रशेखर गोटे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिनेश गाडेकर यांनी उपस्थित समाजबाधवांना संबोधित केले.
विधानसभा तालिका अध्यक्षपदी काही क्षणा करता सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांना बसण्याचा योग आला #MLA #political #surajyadigital #सुराज्यडिजिटल #politics #आमदार #प्रणितीशिंदे #विधानसभा #assembly pic.twitter.com/a9u5OpUwzI
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
ओबिसी आयोग नेमून इमपेरिकल डाटा तातडीने जमा करून न्यायालयाकडे सुपूर्द करावा, आरक्षण स्थगिती उठेपर्यत कोणत्याही निवडणुका घेऊ नयेत, स्थानिक स्वराज्य संस्थाप्रमाणे लोकसभा व विधानसभेत ओबीसींना आरक्षण सुरू करावे, एससी एसटी चे पदोन्नतीतील बंद केलेले आरक्षण सुरू करावे, या मागण्या केल्या. कार्यवाही नाही झाल्यास आंदोलन तीव्र करण्याचा इशारा देण्यात आला.
सोलापूर : बसवर दगडफेक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा https://t.co/5HSsNrEEgQ
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 6, 2021
केंद्र व राज्य सरकार ओबीसी आरक्षण विषयावरून राजकारण करत आहे. सकल ओबीसी समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन थांबणार नाही. सर्वच पक्षात ओबीसी कार्यकर्ते असले तरी आरक्षण या मुद्द्यावर सर्वांचा एकच पक्ष असून तो प्रश्न मार्गी लावणारा पक्ष आमचा अशी ताठर भूमिका यावेळी मांडण्यात आली.
या आंदोलनास मराठा सेवा संघाचे दिनेश जगदाळे यांच्यासह माजी उपसरपंच राजेंद्र चवरे, रिपब्लिकन पक्षाचे अशोक माने, डाॅ यु एफ जानराव, राष्ट्रीय समाज पक्षाचे गोरख वाकडे, भाजपाचे विजयकुमार महासागर, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिनेश गाडेकर व पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला.
आषाढी वारी : पंढरपुरात 9 दिवस 9 गावात संचारबंदी https://t.co/VxyOnsYYQH
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 5, 2021
मंडल अधिकारी सोनवणे व जेलर गणेश खैरे यांनी निवेदन स्वीकारले. सहाय्यक पोलीस निरीक्षक श्याम बुआ यांनी यावेळी चोख बंदोबस्त लावला होता.