मुंबई : आज सकाळी ज्येष्ठ अभिनेता दिलीप कुमार यांचं निधन झालं आहे. त्यांचं पार्थिव त्यांच्या घरी आणण्यात आलं आहे. तसेच संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. तत्पूर्वी अभिनेत्री शबाना आझमी, अभिनेता धर्मेंद्र, विद्या बालन, अनुपम खेर अशा अनेक कलाकारांनी त्यांच्या घरी जाऊन त्यांचे अंत्यदर्शन घेतले.
अभिनेते दिलीपकुमार यांच्या पार्थिवाचे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अंत्यदर्शन घेतले व कुटुंबियांचे सांत्वन केले. आज सकाळी दिलीपकुमार यांचे निधन झाल्याचे वृत्त समजल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी शोकभावना व्यक्त केली तसेच त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
ज्येष्ठ अभिनेते, भारतीय सिनेसृष्टीतील कोहिनूर हरवला, दिलीपकुमार यांचे निधन, चित्रपट सृष्टीवर शोककळा https://t.co/3v2KqFjmRe
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
मुख्यमंत्र्यांनी दिलीपकुमार राहत असलेल्या खार येथील निवासस्थानी जाऊन पार्थिवाचे अंत्यदर्शनही घेतले.
यावेळी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर त्यांच्यासमवेत उपस्थित होते.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
अभिनेते दिलीप कुमार यांनी आज सकाळी खारघर येथील हिंदुजा रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते ९८ वर्षांचे होते. श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे दिलीप कुमार यांना २९ जून रोजी हिंदुजा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं.
उद्धव ठाकरे आणि शरद पवारांनी घेतलं दिलीप कुमारांचं अंत्यदर्शन #surajyadigital #DilipKumar #सुराज्यडिजिटल #दिलीपकुमार #Dilipkumarsahab pic.twitter.com/t9vQkII697
— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021
प्रकृती अस्वास्थामुळे आज सकाळी त्यांची प्राणज्योत मालवली. दिलीप कुमार यांच्या पार्थिवावर आज सायंकाळी पाच वाजता कब्रस्तानमध्ये अंत्यसंस्कार केले जातील. याच कब्रस्तानमध्ये मोहम्मद रफी,मधुबाला, मजरूह सुल्तानपुरी अन्य अनेक सेलिब्रिटींवर अंतिम संस्कार करण्यात आले आहेत.
Veteran actor Dilip Kumar's family, friends gather at his residence ahead of his State funeral, which will be held today at 5 pm in Santacruz, Mumbai. The actor passed away this morning at the age of 98. pic.twitter.com/eY9wh2XQZn
— ANI (@ANI) July 7, 2021
दरम्यान दिलीप कुमार यांचं चित्रपट सृष्टीतील योगदान पाहता त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तशा सूचना प्रशासनाला दिल्या आहेत.
ऐ भाई कोई है…
ट्रॅजेडी किंग दिलीपकुमार यांचे निधन, त्यांच्या एक गाजलेला सीनद्वारे टाईम मीडिया हाऊसच्या सुराज्य डिजिटल परिवारातर्फे अभिवादन (सौजन्य – यशराज फिल्म्स्) #surajyadigital #सुराज्यडिजिटल
#RIP #DilipKumarRIPhttps://t.co/76pO19ceBb— Surajya Digital (@SurajyaDigital) July 7, 2021